पाककृती स्पर्धा १ - वरण भात- निल्स_23

Submitted by निल्स_23 on 28 August, 2025 - 13:20

हॅलो माबोकर्स,
मी रोमातली माबोकर. खरे तर मीम्स आधी पोस्ट करू का पाककृती अशा कात्रीत सापडले होते....पण म्हटले मीम्स बनवतीलच कोणीतरी......रोमातले माबोकर जेव्हा गणपतीत पाककृतीत भाग घेतात.......
मीम्स तो बनता है

खरे तर ममोताईंनी बार फारच हाय सेट केला आहे. हो ना. सो घाबरतच हि पोस्ट करते आहे.
या स्पर्धेच्या धाग्यात संयोजकांनी मिशेलिन स्टार रेस्टॉरंट मध्ये पण वाढता येईल अशी सजावट हवी लिहीले आहे....तर तोच धागा पकडून या सजावटीचा प्रयत्न केला आहे.

पदार्थ नेहमीचाच.
कृती म्हणाल तर एक वाटी तांदुळ दुप्पट पाणी घालून शिजवून घेतले.....हा झाला भात तयार.
याचसोबत तुरीची डाळ पण लावली कुकरला.
या डाळीला मस्त लसूणाची फोडणी केली, चिरलेला टाॅमॅटो आणी निवडून, धुवून, चिरून घेतलेली मेथी घालून परतून घेतली.
त्यात किंचीत हळद , तिखट आणी गोडा मसाला घालून परतले.
नंतर शिजलेली तुरीची डाळ, मीठ, पातळ, घट्ट कसे हवे त्या प्रमाणात जरा गरम पाणी घालून खळखळ उकळले.
हे वरण, भातच नाही तर भाकरीबरोबर पण छान लागते.
माझे लहानपणापासूनचे कंफर्ट फूड आहे हे.
सजावटीत कैरीच्या घरी बनवलेल्या लोणच्याचा खार, लिंबाची फोड, मेथीचे वरण म्हणून मेथीची पाने वापरलीत.
तर करून बघा एकदा नक्की.
भेटू मग आता पुढच्या स्पर्धेला.....तोपर्यंत कोमात.....आपले रोमात.
Screenshot_20250828_224226_Gallery.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर फोटो आलाय!!

रोमात असलेले पण माबोकर पण इतकी सुंदर पाककृती टाकत आहेत हे भारी आहे. आता रोमात राहू नका. लिहित रहा Happy

वरण भातात नेहमीची मूद सोडून काय सजावट करायची ही परीक्षाच आहे.
छान आहे सँडविच टाईप मिशेलिन स्टार सजावट. फोटो मस्त आलाय.

अप्रतिम!!

अगदी प्रोफेशनल शेफसारखी सजावट झाली आहे.

मस्तच!
जो बार उंच सेट झाला आहे तो उंचच ठेवला आपण Happy

मस्तच ग Happy
एकदम नियमांना धरून. प्रोफेशनल टच अगदी

ऋन्मेष +100
जबरी सजावट झालीय...एकदम professional..

Wow!! Next level आहे हे.

एवढा glamorous वरणभात पहिल्यांदाच बघितला.

वरण पण मस्त खमंग वाटतंय.

अरे वाह !!!
सुबक मांडणी आणि खुसखुशित वर्णन.

Pages