मराठी भाषा गौरव दिन २०२३ समारोप

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 2 March, 2023 - 21:08

मायबोलीकरांच्या सहभागाने आणि प्रोत्साहनामुळे यंदाचा मराठी भाषा गौरव दिन सोहळा दणक्यात साजरा झाला. एकूण ४ उपक्रम, ५ खेळ आणि साहित्यिकांच्या स्मरणार्थ विशेष आमंत्रित लेख यांसह भरगच्च कार्यक्रम २५ जुलै ते १ मार्च ह्या दिवसांत घेतले गेले. मराठी भाषेच्या प्रेमाखातर अनेकांनी उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रमाला शोभा आणली.

यंदाच्या उपक्रमांपैकी स.न.वि.वि. हा उपक्रम सर्वात जास्त लोकप्रिय उपक्रम ठरला. मायबोलीची पत्रपेटी उघडताच मायबोलीकरांनी लिहिलेली काही गमतीशीर, काही हृद्य, काही कल्पक, काही वैचारिक आणि काही धमाल पत्रे वाचायला मिळाली. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या उपक्रमात लिहिल्या गेलेल्या रसग्रहणामुळे अनेक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची माहिती झाली. एका चित्रपटावर दोन वेगळ्या व्यक्तींनी लिहिलेल्या रसग्रहणांत त्या चित्रपटाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पडला, हे विशेष म्हणून नमूद करावेसे वाटते. पाउले चालती या उपक्रमाला कमी प्रतिसाद मिळाला असला तरी सुंदर सचित्र धागे वाचायला मिळाले. किलबिल किलबिल चित्रे डोलती या उपक्रमात आपल्या छोट्या दोस्तांची नावीन्यपूर्ण चित्रकला बघायला मिळाली. आपल्या कानावर पडणार्‍या गाण्यांची कल्पना ही बालमनावर कशी चितारली जाते ह्याचे प्रत्यंतर त्यांनी काढलेल्या चित्रांत आले.

म्हणींचा खेळ, शब्दखेळ, शब्दशोध, शीघ्रकविता आणि मुद्रितशोधन या बाबतीतल्या सगळ्या खेळांना उत्तम प्रतिसाद लाभला. या खेळांच्या निमित्ताने मायबोलीवर आता म्हणींचा आणि शब्दकोड्यांचा मोठा खजिना तयार झाला आहे असे म्हणावयास हरकत नाही. 'शब्दशोध' या खेळासाठीचे कूटप्रश्न कुमार१ आणि मानव पृथ्वीकर यांनी रचले होते. 'स्मरण साहित्यिकांचे' या उपक्रमासाठी स्वाती_आंबोळे व टवणे सर यांनी जी .ए. कुलकर्ण्यांच्या कथांचे अंतरंग उलगडवून दाखवले. साजिरा यांनी काफ्का या महत्त्वाच्या कथा-कादंबरीकाराची ओळख मायबोलीकरांना करून दिली. या सर्वांचे मनापासून आभार. वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल, तांत्रिक साहाय्याबद्दल आणि दिलेल्या प्रोत्साहनासाठी मायबोली प्रशासनाचे आभार.

ह्या संपूर्ण सोहळ्यात भाग घेणार्‍या, चर्चा करणार्‍या, वेळप्रसंगी योग्य त्या सूचना करणार्‍या, प्रोत्साहन देणार्‍या आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणार्‍या सर्वच मायबोलीकरांचे आम्ही ऋणी आहोत. आपल्या मायबोलीचा हा उत्सव दर वर्षी वृद्धिंगत होत राहो अशी इच्छा व्यक्त करून हे संयोजकांचे मनोगत संपवतो.

- अस्मिता., किल्ली, छन्दिफन्दि, तेजो, भरत., हरचंद पालव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावा, फार छान झाला हा मभागौदि. कल्पक उपक्रम होते सगळेच. भाग घ्यायला वेळ मिळाला नाही तरी सगळे वाचत होते. Enjoyed
Great job संयोजक टिम

वावा, फार छान झाला हा मभागौदि. कल्पक उपक्रम होते सगळेच. भाग घ्यायला वेळ मिळाला नाही तरी सगळे वाचत होते. Enjoyed
Great job संयोजक टिम >>>> +१

जबरदस्त झाला यावेळचा कार्यक्रम. संयोजकांचे अभिनंदन व अनेक आभार. अगदी कल्पक उपक्रम होते. अजून बरेच वाचायचे बाकी आहे पण जे वाचले ते बहुतांश चांगले लेख होते.

बर्‍याच दिवसांनी माबोवर काहीतरी दमदार झाल्यासारखे वाटले!

उत्तम झाला हा उपक्रम. माझ्यासारख्या बऱ्याच वेळा फक्त वाचनमात्र असणाऱ्या सभासदांना पण खूप मजा आली

ज ब र द स्त !
सगळे उपक्रम कल्पन होते. एवढ्या उपक्रमात खास करून खेळांमध्ये लक्ष ठेवून प्रतिसादांन उत्तर/स्पष्टीकरण देणे सोपे काम नाही. एकंदर उपक्रम सुरू होण्यापासुन संपे पर्यंत चांगलीतच मेहनत घ्यावी लागली असेल. संयोजकांचे परत एकदा कौतुक व अभिनंदन.
काही कारणांमुळे हवे तसे सहभागी होता आले नाही, वाचायचेही बरेच शिल्लक आहे. पण यंदाचा उपक्रम विशेष लक्षात रहाण्याजोगा झाला.

जबरदस्त दणदणीत उपक्रम होता यंदाचा. सर्व संयोजकांचे खूप कौतुक, अभिनंदन आणि आभार!

अत्यंत वाचनीय प्रवेशिका आल्या आहेत. हळूहळू वाचते आहे. यानिमित्ताने जुजा आणि मातब्बर मायबोलीकर लिहीते झाले हा सुखद अनुभव होता.

खरंच खूप छान झाला कार्यक्रम. वरच्या सगळ्या प्रतिसादांना +१०००००००.
मी एकाही उपक्रमात सहभागी होऊ शकले नाही Sad पण आता वाचतेय हळूहळू. खजिनाच आहे!!

सर्व संयोजकांचे खूप कौतुक, अभिनंदन आणि आभार! फारच दर्जेदार झाला मराठी भाषा दिवस.
एरवी मायबोलीवर येणं होत नसले तरी फेब्रुवारी उजाडताच वेध लागतात इथल्या मभादि चे. चुकला फकीर मशिदीत तसं आपोआपच इकडे फेऱ्या वाढू लागतात आणि मग पुन्हा एकदा पूर्वीचे ' व्यसन ' लागते का काय अशी वेळ येते Lol यावेळी खेळात भाग घेतला नाही तरी वाचायला उत्कृष्ट साहित्य मिळालं याचा आनंद जास्त आहे. यासाठी सर्व सहभागी लोकांना मनापासून धन्यवाद!

आशूडी, लागूदे की पुन्हा व्यसन! होऊदे खर्च! Lol

संयोजक, तुम्हाला सलाम! मस्त, दणदणीत साजरा झालाय मभागौदि. वाचणार आता रोज थोडं थोडं.
या निमित्ताने या ठिकाणी साजिरा, आशूडी, स्वाती_आंबोळे वगैरे पुन्हा लिहिते झाले यासाठी त्यांचे इथेच आभार मानून या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवते. धन्यवाद.

कल्पक, भरगच्च आणि सुनियोजित उपक्रमांसाठी संयोजकांचं खूप कौतुक आणि आभार! Happy
मनोरंजन, माहिती, विचारांना चालना, बुद्धीला खाद्य यांपैकी 'जो जे वांछिल तो ते लाहो' अशा उद्देशाने सगळ्या टाइमझोन्समध्ये राबलात!
वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे महोत्सवी वातावरण होतं मांडवात आठवडाभर, खूप मजा आली.
जोरदार टाळ्या! Happy

कार्यक्रम अगदी छान झाला. संयोजकांचे अभार ! अजूनही सारे लेख वाचले नाहीत, दिवाळीचा फराळ पुरवून पुरवून खावा तसे झाले !

कार्यक्रम अगदी छान झाला. संयोजकांचे अभार ! अजूनही सारे लेख वाचले नाहीत, दिवाळीचा फराळ पुरवून पुरवून खावा तसे झाले ! >>> +१

या वेळी भाग घेता येईल का याबद्दल साशंक होतो, पण अशी काही परिस्थिती निर्माण झाली कि सक्तीने घरी बसावं लागलं आणि या महोत्सवात भाग घेता आला.

खूप छान उपक्रम आणि नियोजन. सर्वांच्या उत्साही सहभागाने रंगत आली. संयोजकांना धन्यवाद आणि कौतुक. + १००
फारच ईन्वॉल्ड वाटले सगळ्या कार्यक्रमात

एक सूचना करू का,
प्रत्येक संबंधित धाग्याआधी लांबलचक 'मराठी भाषा गौरव दिन' असा प्रीफिक्स असल्याने वाचक म्हणून खेळ, पत्रलेखन, पुस्तक परीक्षण, चित्रपट असे धागे वेगळे ओळखतांना खूप गल्लत होत होती. ह्या ऊपक्रमाचे धागे ईतर नेहमीच्या धाग्यांपेक्शा वेगळे दिसण्यासाठी ह्या लांबलचक प्रीफिक्स शिवाय दुसरा काही ऊपाय करता आला तर छान होईल.

कौतुक व सूचना यांबद्दल आभारी आहोत. मागील वर्षीच्या काही सूचना यंदा अमलात आणायचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे, यंदाच्या सर्व सूचनांचा पुढील वर्षी नक्कीच विचार व्हावा अशी पुढच्या संयोजक मंडळाला विनंती.

>>>>मनोरंजन, माहिती, विचारांना चालना, बुद्धीला खाद्य यांपैकी 'जो जे वांछिल तो ते लाहो' अशा उद्देशाने सगळ्या टाइमझोन्समध्ये राबलात!
वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे महोत्सवी वातावरण होतं मांडवात आठवडाभर, खूप मजा आली.>>>>+१००१

खूप छान झाला मभागौदि ... उपक्रम कल्पक होते सगळे..
वाचायचं बाकी आहे अजून बरचंस...

Pages