कविता

मी नसेल तेंव्हा

Submitted by प्रतिक सोमवंशी on 13 April, 2019 - 00:49

मी नसेल तेंव्हा, तुझ्या डोळ्यासमोर
गडद अंधार दाटून येईल
चाचपडशील, धडपडशील
ठेच लागल्यावर वेदनेत विव्हळशील
डोळ्यात अश्रू आले तर चटकन पुसशीलही
.
चाचपडताना, धडपडताना
कदाचित तुझा धक्का लागून
बेड जवळच्या साईडलॅम्प खालची
आपल्या दोघांची फोटो फ्रेम पडेलही
तू फक्त तिकडे जाऊ नकोस
कारण फुटलेली काच न तुटलेल नात खोल जखमा देऊन जात
.
घाबरशील, मला अंधारात शोधशीलही
पण तू माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीस
पोहोचूही शकणार नाहीस
.
कदाचित मी नसेलही, तुला सावरायला, तुला धीर द्यायला

शब्दखुणा: 

ती एक गजल आहे

Submitted by प्रतिक सोमवंशी on 31 March, 2019 - 12:26

ती एक गजल आहे
मजल दरमजल आहे

काही शेरात तिच्या
विसावला ‘फजल’ आहे

कधी अग्नी भयंकर
तर कधी जल आहे

अवखळ, उनाड, अल्लड
तरीही सेजल आहे

लपवते खूप काही
तिच्यात भूजल आहे

नाही कुणा सारखी
अशी ती घायल आहे

शब्दखुणा: 

पीतांबर

Submitted by प्रतिक सोमवंशी on 23 March, 2019 - 12:51

अंधार दाटून आला की
सावल्या खायला उठतात
त्यांचे ते घाणेरडे स्पर्श,
नखांनी माझ्या कातडीला कुडतडन
घड्याळाच्या प्रत्येक सेकंदाला
(टिक, टिक, टिक, टिक)
माझ्या देहाची रोजची होणारी विटंबना
ते अंधारात माझ्याकडे सरसावणारे हात
माझ्या गळ्याचा घेतलेला घोट
माझ्या वेणीला धरून मला फरफटत नेताना
अजून अंधारात, काळोखाच्या टोकापर्यंत
माझ्या ड्रेसचा रक्ताने माखलेला शोल्डर
बस ,बस नाही सहन होत आता
(टिक, टिक, टिक, टिक)
हे घड्याळ, ही रात्रीची वेळ, या वाईट आठवणी
मला झोपायचय, मेंदूच्या नसा फुटण्याआधी
हे कान्हा,

रिते पेले

Submitted by प्रतिक सोमवंशी on 21 March, 2019 - 02:42

वाट्याला माझ्या आले हे रिते पेले किती
स्वप्न पाण्याविन तडफडूनी हे मेले किती

उसावलेल्या धाग्यांचा गुंता सोडविताना
तलम रेशमी हे माझे फाटले शेले किती

बघतो तर दिवसाला ग्रासतो अंधार आहे
उजेडाचे दिवे भरून हे त्याने नेले किती

उगा थैमान घालतो माजलेला हा वारा
मी घातललेे साकडे याने पुरे केले किती

जागताना रात्रीला ‛प्रति' ला प्रश्न पडतो
माझ्याच डावातले फरेबी हे चेले किती
©प्रतिक सोमवंशी
insta @शब्दालय

त्याला लिहावच लागेल

Submitted by प्रतिक सोमवंशी on 20 March, 2019 - 01:57

तो एका सरळ रेषेत चालतो
मध्येच कुठे यु टर्न, कुठे टर्न टू लेफ्ट
कुठे टर्न टू राईट,
मग हळू हळू दिसू लागतात
डीव्हायडर ने वेगळे केलेले समाजाचे लवलेश
कुठे अश्रूंच्या पडलेल्या थेंबानी बनलेले
वेडेवाकडे, पुसटशे डाग
कुठे काळ्या पॅरालल चालणाऱ्या रेषेखालील
तुंबलेल्या भावनांची गटारे
कुठे वाहणाऱ्या पाण्याची बंदिस्त पाईपलाईन
तर कुठे , कुठे मागे पडत चाललेली रेलचेल
कुठे हरवतो मनाच्या नो पार्किंग स्पेस मध्ये
तिथल्या गाड्यांच्या काचेवरची धूळ झटकली जाते
सगळ क्लिअर दिसायला लागत
पुन्हा तो चालायला लागतो सगळ विसरून

वाटा

Submitted by प्रतिक सोमवंशी on 20 March, 2019 - 01:52

असलेल्या नसलेल्या सरणाच्या वाटा
भेदरलेल्या सगळ्या मरणाच्या वाटा

या मुखकमलावर किरण निजावे सारे
का ठाऊक मला या तिमिराच्या वाटा

शुभ्र असो चांडाळ जरी त्रिकोणाचा
नाही धरल्या उलट्या रोगाच्या वाटा

चाचपडत सापडली ती रेषा काळी
विरलेल्या होत्या पाषाणाच्या वाटा

आता साग्र संगीत उश्याला घेऊ
कुठवर नेऊ एकट्या जगण्याच्या वाटा

(शुभ गंगा वृत्त - गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा )

शब्दखुणा: 

उजेड

Submitted by नीधप on 13 March, 2019 - 10:56

भरपूर उजेड आहे इथे.

इतका उजेड मला झेपेल का?
इतका उजेड मला पुरेल का?

हा उजेड माझा व्हायला हवा.
करू अशी आशा?
आहे मला परवानगी?

की नकोच?
जराशी तिरीप आणि
कुणीतरी तारस्वरात भुंकू लागतो.
कुणी हिडीस नाचत ती तिरीप कापून टाकतो
बरेचसे चोची मारतात

तरीही उजेड हवाय मला.
माझा माझा.

तळघराचा तळ गाठून झाला असावा.
आता बाहेर यायचंय.

हवा, पाणी, उजेड सगळ्यांचाच असतो.
माझा वाटा हवाय.

- नी

(लिखाणातून)

शब्दखुणा: 

नाहीच कळलं....

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 9 January, 2019 - 12:38

नाहीच कळलं....

तुझ्या असण्यातून,
नसण्यातून,
वागण्यातून,
बोलण्यातून,
हसण्यातून,
चिडण्यातून,
उगाचच कशावरही रुसण्यातून,
नाहीच कळलं...

तुझ्या अर्थावरून,
निरर्थावरून ,
समजावण्यावरून,
समज देण्यावरून,
नाहीच कळलं...

तुझ्या
अवेळी येण्यावरून,
न सांगता जाण्यावरून,
मनासारखं होईपर्यंत केलेल्या हट्टावरून,
मनाविरुद्ध झालेलंही स्वीकारण्यावरून,
नाहीच कळलं..

विषय: 
शब्दखुणा: 

आपण या (कवितां) ना वाचलंत का

Submitted by हर्पेन on 5 January, 2019 - 05:28

आपण यांना वाचलंत का अर्थात मायबोलीवरच्या मला आवडलेल्या कविता

कविता हा आपल्या मायबोलीत/वरच नव्हे तर आख्ख्या जगात सगळ्यात जास्त प्रमाणावर लिहिला जाणारा साहित्य प्रकार असावा.

आजच्या घडीला मायबोलीबाहेरही प्रथितयश ठरलेल्या अनेक रचनाकारांनी, आपल्या कारकीर्दी च्या सुरुवातीच्या काळात व नंतरही अनेक रचना मायबोलीच्या व्यासपीठावरून प्रसिद्ध केल्या आहेत. कित्येक अप्रसिद्ध किंवा हौशी रचनाकारही अनेकदा असे काही लिहून जातात की लगेच तोंडून वाहवा निघावी.

कविता

Submitted by Asu on 19 December, 2018 - 13:35

*कविता*

भावनांचा बाण जेव्हा,
हृदय छेदून जातो.
रक्तरंजित जखमेतून तेव्हा
कवितेचा हुंकार येतो.

शब्दकळ्यांना झुळूक जेव्हा,
भावनांची फुंकर घालते.
कळत नकळत तेव्हा
कवितेचे फूल फुलते.

स्वयंभू अन सर्वव्यापी
फुलपाखरी मधुगंध कुपी
दु:खी, मुकी, छंदी फंदी
कविता असते ब्रम्हानंदी

कविता कधी माझी नसते
कविता कधी तुमची नसते.
हृदयाला भिडणारी,
कविता फक्त कविता असते.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता