कविता म्हणजे काय असते?

Submitted by Swamini Chougule on 23 November, 2019 - 09:56

कविता म्हणजे नेमाक काय असते

कोणाच्या मनाचा ठाव असते

तर कोणाच्या मनाचा घाव असते

कोणाच्या तरी मनाचा भाव असते

कविता म्हणजे नेमक काय असते

कोणाच्या तरी मनातली व्यथा असते

तर कोणाच्या तरी आनंदाची कथा असते

कोणाच्या तरी प्रेमाची साक्ष असते

कविता म्हणजे काय असते

कधी शब्दांचा खेळ असते

कधी शब्दांची माळ असते

तर कधी शब्दांचा जाळ असते

कविता म्हणजे काय असते

कधी आसुसलेला क्षण असते

कधी भरलेले मन असते

तर कधी स्वत्वाची जाण असते

कविता म्हणजे काय असते

कधी रंगवलेले स्वप्न असते

कधी जपलेल नात असते

तर कधी पुस्तकात जपलेल एखाद फूल असते

कविता म्हणजे काय असते

कधी जखमानवर फुंकार असते

कधी हळूवार भावनांची गुंफण असते

तर कधी मनात उमटून जाणारी हलकी लकेर असते

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

छान लिहिलंय.
कविता अशी असायला हवी, अशी असली की भावते.
पण बऱ्याचदा ती निव्वळ शब्दच्छल असते,
अट्टाहासापायी ओढून ताणून केलेल्या शब्दरचनेनी बंबाळ असते, तेव्हा मात्र भावत नाही.

@ मानव पृथ्वीकर
धन्यवाद आणि सहमत सुद्धा ओढून ताणून केलेल्या कवितेत ती बात नसते जी सहज सुचली म्हणून लिहली त्यात असते