कै च्या कै

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

Submitted by पाषाणभेद on 6 December, 2019 - 18:56

अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर

अहो डॉक्टर
काढा की माझे वेंटीलेटर
मला काही झाले नाही
बघा मी लिहीन सुद्धा लव लेटर
(कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर)

न मी आजारी न मी बेचैन
डोकेदुखी नाही मला न तापाची कणकण
पण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन?
काढा की माझे वेंटीलेटर

थोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना
माझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना
सलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर
काढा की माझे वेंटीलेटर

मी आणि माझी कविता.....

Submitted by लाजो on 13 October, 2010 - 00:36

मी आणि माझी कविता....

आजकाल सगळेच पाडतात म्हंटल आपणही एक पाडुयात,
पब्लिकला छळायची हाती आलेली संधी का बर दवडुयात .. Proud

सकाळपासुन डोक्यात गुणगुणतोय टवाळ भुंगा,
हजारएक शब्दांनी घातलाय विशाल दंगा....

हाती घेतली पेन्सिल, समोर ठेवली कोरी वही,
सग़ळ्यात प्रथम पानावर ठोकली 'लाजो' सही....

गझल करावी का? नको, ती बेफिकीरी आपल्यात नाय,
चारोळ्या करायला पब्लिकला प्रतिसादात वाव हाय.... Proud

झुरळं झाल, ढेकुणं झाला, आणि झाली गाय,
आता आपल्याला लिहायला स्पेशल प्राणीच उरला नाय.... Sad

निसर्गावर लिहु? वर्षा की मयुर? कैलास छेदु की पाषाणच भेदु?

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कै च्या कै