अहो डॉक्टर, काढा वेंटीलेटर
अहो डॉक्टर
काढा की माझे वेंटीलेटर
मला काही झाले नाही
बघा मी लिहीन सुद्धा लव लेटर
(कोरस: हिला द्या हो डिसचार्ज लेटर)
न मी आजारी न मी बेचैन
डोकेदुखी नाही मला न तापाची कणकण
पण मग का देता मला तुम्ही इंजेक्शन?
काढा की माझे वेंटीलेटर
थोडे औषध मी घेते थोडे तुम्हीपण घ्या ना
माझ्या हृदयाची धडधड कान देवून ऐकाना
सलाईन ऑक्सीजन दुर करा अन घ्या माझे टेंपरेचर
काढा की माझे वेंटीलेटर
आपल्या सर्वांना प्रिय असलेले कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे काल निधन झाले. त्यांच्या प्रकृती संदर्भात ज्या काही बातम्या विविध वृत्तपत्रांतून प्रकाशित झाल्या आहेत त्यामध्ये पाडगांवकर गेली काही वर्षे "नागीण" (Herpes Zoster) या विकाराने त्रस्त होते असे म्हटले गेले आहे.
नमस्कार माबोकर्स!
मला अर्जंट मदत हवी आहे.. माझ्या काकांना तोंडाचा कॅन्सर झाला आहे, गेल्या ३ महिन्यात ट्युमर काढण्यासाठी २ ऑपरेशन्स केली आहेत .. पण ३रा ट्युमरची छोटी सुरुवात झाली आहे .. मिरजेच्या डॉक्टरांनी ऑलमोस्ट नाही असेच सांगितले आहे
घरी येणारे प्रत्येकजण वेगळ्या डॉक्टरांचे सल्ले घेवुन आयुर्वेदिक, होमीओपॅथी ओषधे घ्यायला सांगत आहेत.. मेडीकल कॉउन्सेलिंग कोणाला (आत्या नि घरचे लोक) यांना पटलेले नाहीये
काकांना आधीच माईल्ड हार्ट अॅटक नि शुगर आहे.. सध्या सगळाच गोंधळ आहे कोणते उपचार सुरु ठेवावेत जेणेकरुन साईड इफेक्ट्स होणार नाहीत..
( आज 'गर्भारपण आणि आहार, या धाग्यावर एका मायबोलीकरणीचे प्रश्न वाचून हा लेख लिहित आहे.)
स्वत:चं मूल असणं ही कित्येकांची मानसिक आणि सामाजिक गरज असते. निसर्गानेही पुनरुत्पादन हे सर्व सजीवांचे एक आद्य कर्तव्य ठरवले आहे. ज्यांना कोणतेही वैद्यकीय उपचार न करता मुलं होतात त्यांना निसर्गाने आपल्याला दिलेली ही केवढी मोठी देणगी आहे याचा अंदाज येत नसेल कदाचित. पण सहजीवनानंतर काही वर्षांनंतरही एखादं मूल न होणं ज्यांनी अनुभवलंय त्यांना 'वंध्यत्व' या शब्दात किती दु:ख आणि निराशा सामावली आहे हे माहिती असेल.
१.वंध्यत्व म्हणजे काय?