पितृपक्ष आणि पितृतर्पण

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 13 September, 2016 - 23:57

नमस्कार

सद्गुरु, गुरुसंस्था, कुलदेवता, पितृदेवता व समस्त हिंदू बांधवांना सविनय सादर दंडवत करून अल्पशी सेवा सादर करतो..

भाद्रपद कृष्ण पक्ष अर्थात् पितृपक्ष हा पितृगणांची सेवा करायचा विशेष काल आपल्याला पूर्वसुरींनी सांगितला आहे.
या पंधरा दिवसांमध्ये आपल्या गतपितरांचे स्मरण करून प्रतिदिन श्राद्ध करावे असं सांगतात, पण आजच्या अतिशय व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात एवढा वेळ आपण देऊ शकत नाही. पण त्याला काही पर्याय मिळू शकतो का? असा विचार केल्यावर त्या पंधरा दिवसात प्रतिदिन तर्पण शक्य आहे. असं लक्षात आलं. मग तज्ञ गुरुजनांकडून तशी पुष्टी घेऊन काही लिहायचा प्रयत्न केला आहे. जे आवडेल व योग्य असेल ते परंपरेचं आणि सगळ्या चुका माझ्या. सेवा गोड मानून घ्यावी...

तर्पण करतावेळेस पित्रादिकांच्या नांवांच्या मागे शर्माणम्, वर्माणम्, गुप्तम्, दासम्, नामानम् यापैकी एक उपपद आपल्या ज्येष्ठांना किंवा नेहमीच्या गुरुजींना विचारून योजावे.
मात्रादिकांच्या नांवांच्या मागे दाम्, असे उपपद जोडावे.
गोत्राचे नांवाच्या पुढे पुरुष असेल तर गोत्रम् आणि स्त्री असेल तर गोत्राम् असे म्हणावे.

ज्यांच्या नांवाचा उल्लेख करायचा असेल त्यांचे निधन होऊन किमान एक वर्ष झालेले असावे.

हे तर्पण केले तरी तिथिला त्या दिवशी पुरोहिताला बोलावून नेहमीप्रमाणे श्राद्ध करावे. हे तर्पण श्राद्धाचा पर्याय नाही. याची विशेष नोंद घ्यावी.

श्लोक ...
तातांबात्रितयंसपत्नजननीमातामहादित्रयंसस्त्रिस्त्रीतनयादितातजननीस्वभ्रातरःसस्त्रयः।
तातांबात्मभगिन्यपत्यधवयुग्जायापितासद्गुरुःशिष्याप्ताःपितरोमहालयविधौतीर्थेतथातर्पणे।।
या क्रमाने नांवे येतील..
सुरवातीला चार त्रयी येतील तेव्हा प्रत्येक नांवाला तीन वेळा पाणी द्यावे पुढे एकदा पाणी द्यावे..
प्रत्येक नांवाआधी अस्मत् म्हणावे..

अस्मत् पितरं (वडील)...शर्माणं ...गोत्रं वसुरूपं स्वधानमस्तर्पयामि स्वधानमस्तर्पयामि स्वधानमस्तर्पयामि। असे पुढे ... ठिकाणी ते नांव घालून म्हणावे. स्वधानमस्तर्पयामि एकदा म्हटल्यावर एकदा पाणी द्यावे जिथे ३ लिहिले असेल तिथे तीनदा म्हणावे व तीनदा पाणी द्यावे..
पितामहं(आजोबा) ...शर्माणं ...गोत्रं रुद्ररूपं स्वधानमस्तर्पयामि ३
प्रपितामहं (पणजोबा)...शर्माणं ...गोत्रं आदित्यरूपं स्वधानमस्तर्पयामि ३
मातरं(आई) ...दां ...गोत्रां वसुरूपां स्वधानमस्तर्पयामि ३
पितामहीं (आजी)...दां ...गोत्रां रुद्ररूपां स्वधानमस्तर्पयामि ३
प्रपितामहीं (पणजी)...दां ...गोत्रां आदित्यरूपां स्वधानमस्तर्पयामि ३
सापत्नमातरं(सावत्र आई) ...दां ...गोत्रां वसुरूपां स्वधानमस्तर्पयामि
मातामहं(आईचे वडील) ...शर्माणं ...गोत्रं वसुरूपं स्वधानमस्तर्पयामि ३
मातुः पितामहं(आईचे आजोबा) ...शर्माणं ...गोत्रं रुद्ररूपं स्वधानमस्तर्पयामि ३
मातुः प्रपितामहं(आईचे पणजोबा) ...शर्माणं ...गोत्रं आदित्यरूपं स्वधानमस्तर्पयामि ३
मातामहीं (आईची आई)...दां ...गोत्रां वसुरूपां स्वधानमस्तर्पयामि ३
मातुः पितामहीं(आईची आजी) ...दां ...गोत्रां रुद्ररूपां स्वधानमस्तर्पयामि ३
मातुः प्रपितामहीं (आईची पणजी)...दां ...गोत्रां आदित्यरूपां स्वधानमस्तर्पयामि ३
पत्नीं(पत्नी) ...दां गोत्रां वसुरूपां स्वधानमस्तर्पयामि
या इथून पुढे ज्यांचे नांव आहे. त्यांची पत्नी किंवा स्त्री असल्यास पति निवर्तला असेल तर सपत्नीकं किंवा सभर्तारं असे म्हणावे. यासाठी कंसात (स.प.)/(स.भ.) असे लिहिले आहे. या पुढे वसुरूपं स्वधानमस्तर्पयामि किंवा वसुरूपां स्वधानमस्तर्पयामि हे पुरुष आणि स्त्रिला त्या प्रमाणे जोडावे. तसेच एकपेक्षा जास्त नांवे त्याच नात्याची असतील तर एक झाले की त्याच क्रमाने पुढले घ्यावे मग पुढील नात्याचा उल्लेख करावा.
पुत्रं (मुलगा)...शर्माणं ...गोत्रं (स.प.)वसुरूपं स्वधानमस्तर्पयामि
दुहितां (मुलगी)...दां ...गोत्रां (स.भ.) वसुरूपां स्वधानमस्तर्पयामि
पितृव्यं(काका/चुलते) ...शर्माणं ...गोत्रं (स.प.) वसुरूपं...
मातुलं(मामा) ...शर्माणं ...गोत्रं (स.प.) वसुरूपं...
भ्रातरं (भाऊ)...शर्माणं ...गोत्रं (स.प.) वसुरूपं...
पितृभगिनीं (आत्या)...दां गोत्रां (स.भ.) वसुरूपां ...
मातृभगिनीं (मावशी)...दां ...गोत्रां ....
आत्मभगिनीं(बहीण) ...दां ...गोत्रां ....
श्वशुरं(सासरे) ...शर्माणं ...गोत्रं ....
गुरुं(गुरु - ज्यांनी मुंजीत गायत्री मंत्र दिला ते) ...शर्माणं ...गोत्रं ....
विद्यागुरुं (विद्या दिलेले गुरु)...शर्माणं ...गोत्रं ....
मोक्षगुरुं (अन्य मंत्रदीक्षा देणारे)...शर्माणं ...गोत्रं ....
शिष्यं ...शर्माणं ...गोत्रां ....
आप्तं ...शर्माणं ...गोत्रं ...
आप्तां ...दां ...गोत्रां....
शेवटी खालील श्लोकाने वस्त्र पिळून पाणी देणे.
येकेचास्मत्कुलेजाताअपुत्रागोत्रिणोमृताः।
तेगृह्णन्तुमयादत्तंवस्त्रनिष्पीडनोदकम्।
नित्यसंकल्प अस्मत् समस्त पितृणां तृप्त्यर्थं समस्तपितृतर्पणं करिष्ये असा करावा.
तर्पण करतावेळेस काळे तीळ मिळाले तर उत्तम. ते पाण्यात घालून गंधफूलमाका यातील जे मिळेल ते पाण्यात घालून श्रद्धापूर्वक तर्पण करावे. व पितरांचे आशिर्वाद घ्यावेत
अघोराः सन्तु पितरः।

साभार :- आपला वेदसेवक
हेरंब उद्धव सहस्रबुद्धे
9422319584/9763826256

ता.क. हा लेख स्वतःच्या नांवे पुढे पाठवला तरी चालेल. त्या कारणाने कोणी धर्माचरण केले तर मला पितरांचे आशिर्वादच मिळतील

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy सेव्ह करुन ठेवतो आहे. उपयोगी आहे.

>>>> ची पत्नी किंवा स्त्री असल्यास पति निवर्तला असेल तर सपत्नीकं किंवा सभर्तारं असे म्हणावे. <<<
या वाक्याचा नेमका अर्थ लागला नाही.

म्हणजे दोघापैकी एकाचे नाव घेउन सपत्निक किंवा सभर्तार असे म्हणावे म्हणजे दुसर्‍याचे नाव घ्यायची गरज नाही.

असेच ना ?

संस्कृतमध्ये एवढ बोलायला कठिण जात असेल तर सरळ पितृपक्षात 'माझे जे जे पितर/आप्तेष्ट/सखेसोबती निवर्तले आहेत त्यांचे मी प्रेम आणि आदरपूर्वक स्मरण करतो/करते आणि त्यांना सद्गती मिळावी म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना करतो/करते' इतक म्हटल तरी चालेल.

भाव महत्त्वाचा. भाषा आणि क्रीयाकर्म नव्हे.

चक्रम असे सोपे बदल कर्मकांडात केले पाहिजेत. पितरांविषयी कृतज्ञता या अर्थाने मान्य व्हायला हरकत नसावी