नोकरी

iOS / iPhone Development च्या कोर्स संबंधी माहीती हवी आहे

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 24 May, 2013 - 04:38

नमस्कार,

मी iOS / iPhone Development चा कोर्स करायचा विचार करत आहे. मला IT मधे ५.५ वर्षे अनुभव आहे, पण १ वर्ष गॅप झाली आहे. सध्या नोकरी नाही.

सध्या ह्या क्षेत्रात - iOS - मागणी आहे असं वाटतयं. पुण्यात काही संस्थांमधे हा कोर्स शिकवतात.
कोर्स नंतर नोकरीची हमी असं आश्वासन असेल तरी नुसतं शिकून नोकरी देतील का ? जनरली अनुभव लागतो सगळ्या कंपनीजना.

माझा नोकरी शोध चालूचं आहे, पण सध्या मार्केट डाऊन आहे असं वाटतयं. त्यामुळे काही शिकावं असा विचार आहे. पण २०-२५K गुंतवायचे तर रिटर्न्स हवेत.

कोणी असा कोर्स केला असेल किंवा काही माहीती असेल तर जरूर सांगा.

शब्दखुणा: 

नोकरीच्या शोधात

Submitted by Unmesh Teli on 2 March, 2013 - 00:55

नमस्कार
मी २०११ तुकडी, मुंबई विद्यापीठातील अणुविद्युत आणि दूरसंचार अभियंता आहे (BE -EXTC ). मी Cloud Computing in (Infrastructure as a service) चा ६ महिन्याचा कोर्स केला आहे. मी आता नोकरीच्या शोधत असून या क्षेत्रातील संधीची वात बघत आहे. माझे IT Skills खालीलप्रमाणे आहेत.
Training Cloud Computing course at IIHT Cloud Solutions Ltd. from MAY 2012
• ३ month Desktop Administrator and Datacenter Experience as Intern
• Network Configuration and maintenance
• Experience on Windows Server 2008 R2

शब्दखुणा: 

सोशल स्किल्स(मराठी शब्द?) अंगी कसे बाणवावेत किंवा वाढवावेत?

Submitted by प्रिंसेस on 26 December, 2012 - 22:40

नव्या जागी मित्र मैत्रिणी कसे मिळवावेत?
आधीच ग्रुप्स असलेल्या ठिकाणी कसे मिसळावे?
नोकरी निमित्त देशोदेशीच्या लोकांशी संपर्क येतो अशावेळी बोलण्याचे विषय, संभाषणातल्या ओपनिंग लाईन्स (मराठी शब्द?) काय असावे?
आपले बोलणे प्रभावी पण नाटकी किंवा आढ्यताखोर न वाटण्यासाठी काय करता येईल?
संभाषणातील सहजता कशी आणावी?

बॉसच बोलण

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 August, 2012 - 05:05

तुम्हाला बॉसच बोलण
उगाच रोज ऐकाव लागत
शिव्या खाव्या लागतात
पर्सनल कामे करावी लागतात
आत राग येत असूनही
वर गोड गोड बोलाव लागत
त्याच दु:ख मुळीच वाटून घेवू नका
कारण बॉसलाही एक बॉस असतो
तोही नेमक हेच करत असतो
आज बोलणी खाणारा उद्या बॉस होतो
पण दट्ट्या मिळण त्याच
कधी काळी चुकत नसते
माणसाला सत्तेची सदैव भूक असते
त्याच मुख्य कारण हेच असते
जेवढे तुम्ही वर जाणार
तसे समीकरण बदलत जाते
शिव्या देणे जास्त होते
ऐकणे कमी होत जाते
पण ऐकाव्या तर लागतातच
बॉस होऊन तुम्ही जर
शिव्या देणार नसाल तर
वरून येणाऱ्या शिव्यांचे
ओझे उगाच वाढत जाते
नोकरी सोडून कुणाला
मग घरी बसावे लागते

शब्दखुणा: 

टेस्टिंग मधील नोकरी सोडून administration मधे नोकरी पत्करावी का?

Submitted by धनश्री गानु on 3 May, 2012 - 01:27

मी गेली ४.५ वर्ष "Manual Software Testing" मधे काम करते. (PLM). बाळ झाल्यावर मी नोकरी सोड्ली आहे.
आता पुन्हा नोकरी करायची आहे. वर लिहिल्याप्रमाणे या बदलासाठी खालील मुद्द्यांचा विचार मी केला आहे.
१. IT मधील नोकरीचा आता कंटाळा आहे. (कामाच्या वेळा, येणारा ताण या गोष्टी लक्षात घेता)
२. तुलनेने अड्मिन मधे काम कमी असेल. उदा: कमी वेळ, डेडलाईनची फारशी चिंता नसावी असा अंदाज, ऑफिसमधून वेळेत घरी जाता येइल.
टीपः इथे या क्षेत्रातील लोकांना कोणत्याही प्रकारे दुखवण्याचा उद्देश नाही. मला माहिती हवी आहे.
३. पगार थोडा कमी मिळेल, पण घराकडे लक्ष देता येईल.

पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.

Submitted by velekar.amit on 4 April, 2012 - 12:41

सीएसआयआर- नॅशनल इनाव्होरमेन्ट इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट
(आयएसओ ९००१:२००८ सर्टिफाईड ऑर्गनायझेशन)
(कौन्सिल ऑफ सायंटिफिक एन्ड इंडस्ट्रियल रिसर्च) खालील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.
१. Scientist [Group IV(2)] (Backlog) : १६ जागा
पगार : PB-3, रु. १५६००-३९१०० + GP रु. ६६००
वय : ३५ वर्ष
२. Sr. Technical Officer (१) [Group III(४)](Current) : 02 जागा
पगार : PB-3, रु. १५६००-३९१०० + GP रु. ५४००
वय : ३५ वर्ष
३. Technical Assistant [Group III(1)](Current) : 04 Posts
पगार : PB-2, रु. ९३००-३४८०० + GP रु. ४२००
वय : २८ वर्ष

गुलमोहर: 

प्रोफेशनल नेटवर्किंग-एक गरज

Submitted by आशूडी on 10 February, 2012 - 04:57

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रोफेशनल नेटवर्किंग करणं बर्‍याचदा आवश्यक होऊन बसतं. तुमच्या नोकरी - व्यवसायातल्या समस्या, प्रश्न यावर उपाय शोधण्याचं ते एक माध्यम बनतं. मग ते ऑनलाईन असो वा ऑफलाईन. मायबोलीवर 'मराठी उद्योजक' गृप अशाच जाणीवेतून सुरु झाला.
तुम्हाला हे खरंच आवश्यक वाटतं का? त्याचा तुम्हाला कसा उपयोग झाला? तुम्ही तुमचे 'कॉन्टॅक्ट्स' कसे बनवता, सांभाळता, वाढवता? एकमेकांच्या मदतीने नवीन नेटवर्किंगचे तंत्र आणि मंत्र शिकूया. Happy

‘अर्थार्जन करणार्‍या महिलांचे व्यावसायिक कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण' : माहिती, प्रतिबंध व उपाय

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 3 August, 2010 - 05:38

जगाच्या पाठीवर सर्वच स्त्रियांना कधी ना कधी लैंगिक शोषणाचा / उपद्रवाचा सामना करावा लागतो. अश्लील शेरे, स्पर्श, शीळ, कटाक्ष वगैरे गोष्टी तर नेहमीच्याच असतात. कदाचित त्यांना सामान्य असेही म्हणता येईल. आणि अर्थार्जन करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांनाही अशा अनुभवांना सामोरे जावे लागते. अनेकदा पुरुषप्रधान कार्यक्षेत्रात पदार्पण करताना स्त्रियांना त्याचा जास्तच उपद्रव होतो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण हे एकाप्रकारे हिंसेचेच दुसरे रूप आहे.

Pages

Subscribe to RSS - नोकरी