कांदीवली, बोरिवली, अंधेरी भागात नोकरीच्या संधी आहेत का?

Submitted by अस्मि_ता on 15 April, 2019 - 16:32

मी नोकरीच्या शोधात आहे. क्रुपया वरील भागात कुठे संधी असतील तर सांगणे. मी मागील 2 वर्ष करीयर ब्रेक वर आहे.
शैक्षणिक -
Diploma in Electronics Engg
Experience 8 yrs

*मला सध्या different field मधला job चालेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फारच थोडी माहिती दिलीय. पूर्ण रेझ्युमे टाकायला हरकत नव्हती (अर्थात खाजगी माहिती वगळून).

पूर्वीचा कामाचा अनुभव इलेक्ट्रिकल मधलाच होता का? असलाच तर नेमक्या कुठल्या उपशाखेत (पॉवर सर्किट्स, रोटर्स, बॅटरी सिस्टिम्स असे बरेच भाग इलेक्ट्रिकल मध्ये येतात) कुठल्या कंपनीत ?

क्षेत्राच्या बाहेरचा जॉबसुद्धा चालेल म्हणता, मग असे डिग्रीपलीकडचे कुठले स्किल्स आहेत तुमच्याकडे? त्याचा काही अनुभव ? किंवा केलेले काहीही कोर्सेस, प्रोजेक्ट, इंटर्नशिप ?

आपल्या पूर्ण अनुभवाची आणि अंगभूत स्किल्सची इत्यंभूत माहिती असल्याशिवाय कुणाला इथं काहीही सुचवता येणार नाही.

आपल्या पूर्ण अनुभवाची आणि अंगभूत स्किल्सची इत्यंभूत माहिती असल्याशिवाय कुणाला इथं काहीही सुचवता येणार नाही. +१

नोकरी नका करू, शेअर मार्केट शिका आणि मोठ्या व्हा, हे कंपनी चालवणारे हरामखोर असतात, आपल्याकडून कोटींची कामे करून घेतात आणि मोबदला हजारात देतात, गुलामसारखे रात्रंदिवस राबवून घेतात ते वेगळंच, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

पूर्वीचा कामाचा अनुभव इलेक्ट्रिकल मधलाच होता का? असलाच तर नेमक्या कुठल्या उपशाखेत (पॉवर सर्किट्स, रोटर्स, बॅटरी सिस्टिम्स असे बरेच भाग इलेक्ट्रिकल मध्ये येतात) कुठल्या कंपनीत ?
नवीन Submitted by विलभ on 16 April, 2019 - 03:59
<<

त्या ईलेक्ट्रॉनिक इंजिनियर (Diploma) आहेत, ईलेक्ट्रिकल नाहीत.
---
ईलेक्ट्रॉनिक्स मधे डिप्लोमा केलेल्या लोकांना, सध्या नोकरीच्या संधी फार कमी आहेत.

पूर्वीचा कामाचा अनुभव इलेक्ट्रिकल मधलाच होता का? असलाच तर नेमक्या कुठल्या उपशाखेत (पॉवर सर्किट्स, रोटर्स, बॅटरी सिस्टिम्स असे बरेच भाग इलेक्ट्रिकल मध्ये येतात) कुठल्या कंपनीत ? >> automotive sector - vehicle electrical and electronics. मी delivery नंतर ब्रेक घेतला आहे. मुंबई मधे automotive companies चे R&D नाहीयत. म्हणून दुसर्या field like admin, executive पण चालेल.

नोकरी नका करू, शेअर मार्केट शिका आणि मोठ्या व्हा, हे कंपनी चालवणारे हरामखोर असतात, आपल्याकडून कोटींची कामे करून घेतात आणि मोबदला हजारात देतात, गुलामसारखे रात्रंदिवस राबवून घेतात ते वेगळंच, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. >> धन्यवाद. सल्ला चांगला आहे. पण मला शेअर मार्केट जमेल अस वाटत नाही.

कांदिवली बोरिवली भागातले लोकच मुंबई शेयर मार्केट चालवतात, अन त्यावर श्रीमंतही होतात, असे ऐकून आहे.

बाकी इंजिनेरिंगमधले आमचे ते हे अगदीच अगाध असल्याने तुमच्या फिल्डमधे नक्की कसली नोकरी असते हे देखिल मला ठाऊक नाही. सो सल्ला देऊ शकत नाही, क्षमस्व.

नौकरी, हेडहोंचो, शाईन.कॉम वर सिव्ही टाकला का?लिंकडईन वर स्वतःच्या फिल्ड मधली माणसं, ग्रुप शोधून नेटवर्किंग वाढवले का?
अंधेरी सीपझ मध्ये आणि वसई मनीष इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये बऱ्याच इलेक्ट्रॉनिक कंपनीज आहेत.(होत्या).थोडं लांब जाण्याची तयारी असल्यास बोईसर MIDc मध्ये.
माझ्या बऱ्याच मैत्रिणी त्या एरियात आहेत.चौकशी करून एक दोन रेफरन्स निरोपात पाठवते.

धन्यवाद. सल्ला चांगला आहे. पण मला शेअर मार्केट जमेल अस वाटत नाही.>> रिस्क मॅनेजमेंट व्यवस्थित ठेऊन इन्व्हेस्टमेंट केली तर चांगला पैसा मिळू शकतो.

आजच एक फॉरवर्ड आले आहे. टाटा ग्रुप बद्दल. साईट योग्य वाटत आहे. इथे प्रयत्न करून बघा.

Dear ladies...

If any women you know have taken break in career and want to resume their career , but not getting a breakthrough..

Here is the chance! Tata group has programme to help such women professionals. They will be interviewed , trained and placed in different and appropriate job positions within Tata group of companies.
If anyone interested please register online
http://www.tatasecondcareer.com/

Spread the word, it might help capable and aspiring woman somewhere Happy