नोकरी मिळवताना २) रेस्युमे सर्वसामान्य माहिती - हेडर

Submitted by विचारजंत on 23 May, 2018 - 15:11

मागील लेख
https://www.maayboli.com/node/66038
https://www.maayboli.com/node/66224

रेस्युमे मध्ये काही सर्वसामान्य माहिती द्यावी लागते. या माहिती ने नोकरी मिळण्यात फरक पडत नाही ( बर्याच अंशी ) पण हि माहिती देण्याची गरज असते , तसेच हि माहिती प्राथमिक डेटाबेस बनवायला उपयोगी असते त्यामुळे द्यावी लागते .

हे आहे

१)नाव ( पूर्ण) - हे मोठ्या फॉन्ट मध्ये बोल्ड करून लिहा

२) जन्मतारीख
३)वय ( हे जन्म् तारखे वरुन काढता येते - पण असलेले बरे)
४) लिंग
५) लग्न झाले कि नाही ? (Marital Status) , मुले

संपर्क -
६)मोबाईल फोन नंबर
७)इतर फोन नंबर ( असेल तर)
८)इ मेल
९)पत्ता ( लोकल )
१०)पत्ता ( मूळ )

सोशल मेडिया
११)लिंकडीन
१२) फेसबुक ( जरुरी नाही पण जर फेसबुक ठीक असेल तर लिंक द्यावी - अनेकदा उमेदवाराची सोशल प्रोफाईल बघतात. चुकीची प्रोफाईल बघण्य पेक्षा योग्य लिंक दिलेली बरी .)
१३) इतर सोशल नेटवर्क - जर कामाशी सम्बन्ध असेल तर. जर वाचनीय ब्लॉग लिहीत असाल तर लिंक द्यायला हरकत नाही

आता काही टिप्स

१)नाव - पूर्ण लिहा . मला एकदा एका मराठी इंटरव्युव्हर ने वडिलांचे नाव लावायला लाज वाटते का असे विचारले होते.
२)जन्मतारीख - फक्त आकड्यात लिहिल्यास गोंधळ होऊ शकतो . तारीख -अक्षरी महिना - मग वर्ष असे लिहा
३)वय - जवळची एक तारीख ( शक्य तो वाढ दिवसाची ) घेवून त्या दिवशी काय वय असेल ते लिहा उदा - . ( Age - 25 as Of July 15, 2018)
४)लिंग - खूप जण विसरतात . आपल्याला वाटते कि नावावरून कळेल कि नाही, पण इतर प्रांतातील लोक, विदेशी लोक, सोफ्टवेअर यांना कळत नाही,
५)Marital Status - Simple ठेवा – उदा - Unmarried / Married / Married with one son and one daughter

६)मोबाईल फोन नंबर - विदेशी नोकरी चा चान्स असेल तर पूर्ण लिहा - +९१- टाकून
७)इ मेल - प्रोफेशनल वाटेल असा आय डी घ्या . नाव - पुढे आकडा किंवा अर्थपूर्ण शब्द. शक्यतो जी मेल. आणि आपण काम करीत असतो तिकडचे मेल आजिबात नको! raunchyrahul, sensualdude असले आय डी मी बघितले आहेत ...
८)पत्ता ( लोकल ) पत्ता ( मूळ ) - पत्र येईल इतपत च द्या . मुलीनी डिटेल मध्ये पत्ता देवू नये. पण द्यावा . कोठले मूळ आहे वगैरे विचारले जाते अनेकदा.

सोशल मेडिया - लिंकडीन - नोकरी शोधताना अत्यंत म्ह्तेअचे सोशल नेटवर्क . या वर शक्यतो एक डिटेल प्रोफाईल टाका . नन्तर या वर एक लेखच टाकीन
फेसबुक - या वर पण डिटेल मध्ये लिहीन . फेसबुक प्रोफाईल अनेकदा बघितली जाते . जर ठीक प्रोफाईल असेल तर लिंक द्यावी या मताचा आहे.लिंक देताना ती छोटी आणि निट करता येते - तशी करावी.
https://www.facebook.com/help/329992603752372/

हि बरीच माहिती आहे जी जागा अडवते . तर मी एक फॉर्म्याट पहिले कि कमीत कमी जागेत हि सर्व माहिती बसवता येते . मला आवडले म्हणुन देत आहे .
https://photos.app.goo.gl/xPdATg7lWvPGoP2V2
ResumePic - Copy.jpg

आणि हा रेस्युमे वर रेस्युमे , बायो डेटा , करिक्युलम व्हिएटे असे काहीही टायटल देऊ नका , जागा महत्वाची आहे आणि रेस्युम हे डॉक्युमेंट पाहून रेस्युम आहे ते सहज कळते.
पुढील भागात आपण रेस्युमे चा महत्वाचा भाग म्हणजे माहिती कशी द्यावी हे बघू,
धन्यवाद
हेमंत वाघे
hemantwaghe@gmail.com
https://naukrishodh.blogspot.in

Group content visibility: 
Use group defaults

नं २ ते ५ ची काय गरज आहे? त्या माहितीवरून नोकरीची पात्रता ठरू नये हेच योग्य नाही का?
या गोष्टी रेस्युमे मध्ये काय काय अजिबात लिहू नये या हेडर खाली घालेन मी Happy

मैत्रेयी जी
मी आधीच लिहिले आहे कि - या माहिती ने नोकरी मिळण्यात फरक पडत नाही ( बर्याच अंशी ) पण हि माहिती देण्याची गरज असते , तसेच हि माहिती प्राथमिक डेटाबेस बनवायला उपयोगी असते त्यामुळे द्यावी लागते .

बर्याच अंशी का कि दुर्दैवाने या माहितीचा चाळणी लावायला उपयोग केला जातो. आणि आज ना उद्या हे कळणार असतेच . काही जॉब फक्त पुरुषासाठी किंवा स्त्रिया साठी असतात . तसेच लग्न झालेला पुरुष हि काही नोकर्यात नको असतो . आणि अनेक कंपनी फॉर्म भरून घेतात आणि यात खोटी माहिती लिहिलीत तर काढण्याची कारवाई झाली आहे.

आणि उमेदवारासाठी सगळ्यात त्रासाची गोष्ट असते इंटरव्यू च्या २ किंवा ३ राउंड झाल्यावर अशा तांत्रिक मुद्द्यावर बाद होणे . यात २-३ दिवस , त्यांचे सुट्टी सर्व काही वाया जाते . त्यामुळे अशी माहिती योग्य वेळी देणेच योग्य. हीच गोष्ट फेसबुक ची .एकाच नावाने १०-२० प्रोफाईल पण दिसतात आणि चुकीची प्रोफाईल बघून स्क्रीनिंग स्टेज लाच नाकारले जाण्याचा धोका असतो .

म्हणजे हि माहिती काही ठिकाणी स्क्रीनिंग ला वापरली जाते . तरी नसल्यास फार बिघडत नाही , पण..... आणि लिंग लिहावे करण सोफ्टवेअर ला किंवा बर्याचदा वाचणार्या माणसाला हि नावावरून काही कळत नाही .

काही जॉब फक्त पुरुषासाठी किंवा स्त्रिया साठी असतात . तसेच लग्न झालेला पुरुष हि काही नोकर्यात नको असतो >>> सिरियसली ? असे उघड उघड डिस्क्रिमिनेट करणारे जॉब असतात ? इकडे (अमेरिकेत) आणि बर्‍याच इतर देशांत हे बेकायदेशीर आहे.

भारताचं माहित नाही पण अमेरिका, कॅनडात रेझ्युमे मध्ये "जन्मतारीख, वय , लिंग, लग्न झाले कि नाही ? (Marital Status) , मुले" ही माहिती कदापि लिहू नका.
रेफरंसेस सुद्धा विचारणा केलीत तर मिळतील लिहा.
शिक्षण कुठल्या साली झालं हे ही लिहू नका म्हणतात.
पत्ता लिहायचाच असेल तर गावाचं नाव पुरे.
मी इकडे सुरुवातीला आलो तेव्हा डेट ऑफ बर्थ घातलेली तर मला रेझ्युमे ती काढून परत पाठवायला लावलेला.

लिंग, वय, मॅरीटल स्टेटस, वगैरे लिहिण्यात काही गैर वाटत नाही. ज्या कंपनीजना यावरून काही ठरवायचे असते ते आपला स्वतःचा फॉर्म भरून घेतातच. तिथे तुम्ही त्यांना सांगू शकाल का की अमुक तमुक माहीती मी देणार नाही. ते सरळ निघा म्हणतील.

यावरून एक गंमत वाटली,
ईथे मायबोलीवरही कित्येक लोकांना ईथे लिहिणार्‍या आयडीमागच्या व्यक्तीचे लिंग वय मॅरीटल स्टेटस काय खरे खोटे हे जाणून घेण्यात रस असतो. त्याचे लिखाण वाचा, विचार नाही पटले तर सोडून द्या असे करता येत नाही. मग जे लोकं कोणालातरी नोकरीला ठेवत आहेत त्यांनी हे जाणून घेण्यात रस दाखवला तर काय चुकीचे आहे? Happy

बाकी मी माझ्या रेज्युमेमध्ये या गोष्टी लिहित नाही ती गोष्ट वेगळी. पण कोणी टाकली तरी हरकत नाही ईतकेच..

अमितव +१

>>बाकी मी माझ्या रेज्युमेमध्ये या गोष्टी लिहित नाही ती गोष्ट वेगळी. पण कोणी टाकली तरी हरकत नाही ईतकेच..<<
ऋन्म्या, हायरिंग टीमकडे तुझा रेझुमे जाण्याआधी १० लोकांच्या हातातुन जातो. हायरिंग टीमला भेटण्याच्या स्टेजपर्यंत पोचल्यावर ती प्रायवेट माहिती देण्याला हरकत नाहि. रिक्रुटिंग प्रोसेस्मध्ये काहि कंपन्या हि माहिती (जेंडर, एथनिसिटि इ.) त्यांच्या पोर्टल थ्रु ध्यायला सांगतात. पण आधीपासुनच ती रेझुमेवर जाहिर करण्यात काहि हशील नाहि. भारतात कदाचित हा नॉर्म असेल...

Dob private इन्फो आहे. Resume हजार ठिकाणी फॉरवर्ड होतो, तुम्हाला तुमची पर्सनल इन्फो सगळीकडे पाठवायची आहे का?

भारतात अजून प्रायवसी रिलेटेड जागरुकपणा कमी आहे. ह्या २-५ मुद्द्यातूनच ते लक्षात येतं खरंतर.
ती सगळी इन्फो प्रायवेट असणं आणि त्या गोष्टींवरुन खरं तर नोकरी देण्या/न देण्यचा निर्णय घेणं हे एथिकली किती चुकीचं आहे हे दोन्ही पार्ट्यांना कळलं पाहिजे आधी.

कम्पनी च्या एथोस मध्ये आम्ही लिंग/ वैवाहिक स्टेट्स वरून डिस्क्रिमिनेट करणार नाही असे म्हंटले असेल (आणि त्याच MNC च्या भारताबाहेर ऑफिस मध्ये तसे खरेच करत नसतीलही कदाचित) पण भारतात काही जॉब ला बायका नकोत हा कंपन्यांचा स्टॅन्ड असतो (अर्थात तो डॉक्युमेंटेड कधीच नसतो)

उदाहरणार्थ सेल्स फिल्ड मध्ये फ्रंट लाईन सेल्स करायला मुंबई मध्ये मुलगी चालते (मुलगी, बाई नाही कारण अर्थातच घराची जबाबदरी)पण UP/दिल्ली मध्ये या प्रोफाइल मध्ये मुलीचा विचारसुद्धा होणार नाही (तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, आणि शेवटी त्याला कंपनी जबाबदार असल्याने)

तेव्हा जेंडर एक्वालिटी वगैरे गोष्टी ऑन पेपर सगळ्याच कॅम्पान्यांच्या असतात, पण प्रत्यक्ष जॉब मिळवताना या गोष्टी अडसर ठरू शकतात, आणि लेखात म्हंटल्याप्रमाणे 2 3 राउंडस होऊन बाहेर पडण्यापेक्षा आधीच बाहेर पडणे आपला वेळ वाचवण्याच्या दृष्टीने श्रेयस्कर.

भारतात अजून प्रायवसी रिलेटेड जागरुकपणा कमी आहे. ह्या २-५ मुद्द्यातूनच ते लक्षात येतं खरंतर.>>>

भारतात नाही पुर्ण Asia मध्ये (जपान सोडुन, जपान बद्दल माहित नाही) नोकरी पाहिजे असेल तर पुर्ण खाजगी माहिती Resume मध्ये असावी लागते, सिंगापुर / मलेशिया मध्ये तर स्वताचा identity number (भारतातिल आधार, अमेरिकेतिल सोशल सारखा हा नंबर आहे ) Resume मध्ये लोक टाकतात. आणि ही माहिती नसेल तर ह्या देशात मुलाखतीसाठी बोलवत नाहीत.

तेच जर अमेरिकेत नौकरी पाहिजे असेल तर ह्या सगळ्या माहितीची गरज नाही. अमेरिकेत आमची कंपनी ६२ वर्षाच्या ईजिनियर ला नौकरी देते.

भारतात अजून प्रायवसी रिलेटेड जागरुकपणा कमी आहे. ह्या २-५ मुद्द्यातूनच ते लक्षात येतं खरंतर.>>>>>>>> +1

आणि त्याच बरोबर नोकरी मिळवण्यास उत्सुक लोक प्रचंड संख्येने आहेत त्यामुळे "तुला माहिती द्यायची नाही तर गेलास उडत" अडा अप्रोच ठेवला जात असावा.
उद्या कंपन्यांनि आधारनम्बर लिहायला सांगितलं तरी लोक लिहून देतील.

If applying for Saudi job it is better to mention religion also as some jobs esp in Makka are for muslims only. Other religions are not allowed in Makka. So reqirements are different at each places. Hence it is better to provide info in 2 to 5 points as and when required. As Simba said people will write aadhar no also if required.

<< भारताचं माहित नाही पण अमेरिका, कॅनडात रेझ्युमे मध्ये "जन्मतारीख, वय , लिंग, लग्न झाले कि नाही ? (Marital Status) , मुले" ही माहिती कदापि लिहू नका. >>

------- सहमत, कॅनडात कुठेही तुम्ही apply करत असाल तर या (जन्मतारिख, लिन्ग, लग्नाबद्दल माहिती, सेक्स ओरियन्टेशन, फोटो) गोष्टी लिहू नका, कृपया....

काही ठिकाणी हे 'disqualification' ठरण्याची शक्यता आहे. कुठल्या देशात अप्लाय करत आहात त्या नुसार 2-3 resume ठेवणे उत्तम.

अमेरिकेत , कॅनडा साठी रेझ्युमे लिहिताना, जर तुम्हाला १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असेल तर नक्की किती ते लिहू नका. विशेषतः हाय टेक इंडस्ट्रीमधे असाल तर. तुम्हाला कॉल येणे ही कठीण आहे. स्वानुभवावरून सांगतो आहे. त्या ऐवजी १५+ वर्षांचा अनुभव लिहा. लिंक्डइन मधेही असेच करा. थोडक्यात ज्यावरून वयाचा अंदाज येईल ती माहीती काढून टाका. एज डिस्क्रीमिनिशेन भरपूर आहे आणि शाबित करणे अवघड असल्याने तुमची केस घेणारे वकील खूप कमी आहे. हाय टेक क्षेत्रात (उदा. सॉफ्टवेअर मधे) नवीन तंत्रज्ञानाशी निगडित कौशल्ये नाहीत असे सांगून जास्त वयाच्या लोकांना न घेणे कायदेशीर रित्या खूप सोपे आहे.

मला फेसबुक प्रोफाईल लिंक देणे सोडून बाकी मुद्दे पूर्ण पटले.
अमेरिकेत डिस्क्रिमिनेटिंग असेल तरी भारतात ९०% नोकर्‍यांच्या फॉर्म मध्ये मेरिटल स्टेटस, नंबर ऑफ चिल्ड्रन ,फॅमिली मेंबर्स वगैरे कॉलम सर्रास असतात.
जास्त वयाचे डिस्क्रिमिनेशन आयटी मध्ये भारतातही आहे. याला 'फिटमेंट इशूज' असे गोंडस नाव देऊन रिझ्युम होल्ड वर पडतो. म्हणजे बाकी सगळे व्यवस्थित आहे, स्किल्स आहेत पण हा माणूस मॅनेज्/मॅनिप्युलेट करणे कठीण पडेल या कल्पनेने.
बाकीच्यांचे वेगळा देश वाले आउटलुक पण माहितीपूर्ण.

<<< बाकी सगळे व्यवस्थित आहे, स्किल्स आहेत पण हा माणूस मॅनेज्/मॅनिप्युलेट करणे कठीण पडेल या कल्पनेने. >>>
पण भारतात लोकांना २-३ वर्षात टीम लीड आणि ५ वर्षात मॅनेजर होऊन स्वतःच मॅनिप्युलेटर बनायचं असतं, त्याचं काय करणार? ५०+ वयाचे सॉफ्टवेअर डेव्हलपर किती टक्के आहेत भारतात?

उदय जि
देशानुसार काही नॉर्म नक्कीच बदलतात . मी हे भारतातील आणि सर्वसाधारण ते मध्यम नोकऱ्या बद्दल बोलत आहे . Rare Skillset असेल तर काही लोकांना नोकरी शोधावी लागत नाही , त्यांना शोधले जाते .

कॅनडा मधील स्त्री पुरुष समानते वर आणि workforce equality मी बरेच वाचले होते. अमेरिकेला शिव्या देणारे हि अनेक जण कॅनडा ची स्तुती करत आहेत .

मी हा एक रिपोर्ट वाचला .
http://www.catalyst.org/knowledge/women-workforce-canada

आता हे आकडे बघा .

However, only 25.6% of senior managers in the private sector were women.

Currently, just seven of the 249 companies listed on the Toronto Stock Exchange's main index have a woman CEO.

Women held just 25.0% of board seats in 2016.

म्हणजे Ground Reality बरीच वेगळी असते ,

आपल्याकडे हे आकडे फार वाईट आहेत मला माहित आहे . पण जपान मधील आकडे नक्कीच आपल्या देशाहुन वाईट असावेत .
मी हे बरोबर कि चूक ते सांगत नाही पण आकडे काही सत्य दाखून देतात .
आणि हे मी सांगत आहे कारण दुर्दैवाने हा भेदभाव होतो . आणि हि माहिती इंटरव्यू त मिळू शकते . नावावरून हि अनेक गोष्टी जाणल्या जाऊ शकतात. आणि इंटरव्यू जाने हे उद्दिष्ट नसते तर नोकरी मिळणे हे उद्दिष्ट असावे लागते. अयशस्वी इंटरव्यू देण्यात वेळ जातो आणि अनेक अयशस्वी इंटरव्यू झाले तर भयंकर फ्रस्ट्रेशन येऊ शकते. चागल्या कोलेज मध्ये क्याम्पस इंटरव्यू मध्ये सातव्या आठव्या इंटरव्यू ला नर्व्हस ब्रेक डाऊन व्हायला आलेले लोक मी पाहिलेले आहेत .
हि माहिती compulsary नक्कीच नाही , पण दिली तर तुमचा महत्वाचा वेळ आणि कम्पनी चा हे वेळ वाचू शकतो .

उपयोगी माहिती. हे बहुधा मूळ लेखातील सगळे भारतातील जॉब्ज बद्दल आहे असे दिसते. तसे लिहा शक्यतो त्यात. कारण रेझ्युमे तयार करताना लोक साधारण एकच सगळीकडे वापरतात. अमेरिकेत अ‍ॅप्लाय करताना फक्त नाव, राहण्याचे गाव आणि संपर्काकरता फोन नंबर या तीनच गोष्टी "पर्सनल" माहिती मधे द्यायची गरज असते.

अमित - अ‍ॅक्च्युअली रेफरन्सेस चा उल्लेख "मागितल्यास मिळतील" छाप करायची अजिबात गरज नाही असे जाणकार सांगतात. ते गृहीत धरलेले असते.

अजून एक मला अनेकदा दिसलेले आणि खटकलेले - तुमचे गोल्स लिहायची रेझ्युमे ही जागा नव्हे. किमान सर्वात वरच्या माहितीत तरी नाही. नोकरीकरता योग्य कॅण्डिडेट शोधणार्‍याच्या दृष्टीने ती माहिती निरूपयोगी असते. विचारजंत आणखी सांगू शकतील - पण मी स्वतः पाहिलेल्या रेझ्युमेज मधून जे दिसले ते सांगतोय.

कुठल्या देशात अप्लाय करत आहात त्या नुसार 2-3 resume ठेवणे उत्तम. >>> सहमत. इतकेच नव्हे, तर जर २-३ वेगवेगळ्या "रोल्स" करता अ‍ॅप्लाय करत असाल तर तितके वेगळे रेझ्युमेज सुद्धा असायला हरकत नाही. म्हणजे माहिती तीच, पण वर्णन त्या रोल ला सुटेबल बनवायचे. प्रोफेशनल कन्सल्टंट यात मदत करतात. मात्र अशा वेळेस कोणता रेझ्युमे कोणत्या पोझिशन करता पाठवला आहे ते लक्षात ठेवणे महत्त्वाचे Happy

याला 'फिटमेंट इशूज' असे गोंडस नाव देऊन रिझ्युम होल्ड वर पडतो. >>> म्हणजे "योग नाही" ची ही प्रोफेशनल आवृत्ती दिसते Happy

>> बाकी सगळे व्यवस्थित आहे, स्किल्स आहेत पण हा माणूस मॅनेज्/मॅनिप्युलेट करणे कठीण पडेल या कल्पनेने. <<

मॅनेज्/मॅनिपुलेट करता न येणं हा मुद्दा कदाचित फक्त भारतात लागु असेल पण "टेक्निकल जॉब्स" बाबतची समिकरणं अमेरिकेत थोडी वेगळी आहेत. मॅनेज्/मॅनिपुलेट याचा अर्थ एक्स्प्लॉय्ट या अर्थाने घ्यायचा झाल्यास तसं करणं अमेरिकेत जवळ-जवळ अशक्य आहे.

एज डिस्क्रिमिनेशन होतं, पण ते बहुतांशी खालील २ कारणांमुळे:
१. सिनियॉरिटी नुसार तुमचं टेक्निकल स्किल/रीच एका लेवल नंतर मर्यादित होतं (अन्लेस यु अटेन ए फेलो लेवल इन आय्बीएम/गुगल एट्सेट्रा...) पण पगार वाढलेला असतो. तुमच्याच स्किलसेटचा पण तुमच्या पेक्षा कमी वयाचा, कमी पगाराची अपेक्षा ठेवणारा माणुस हल्ली सहज सापडतो.
२. सिनियॉरिटी नुसार माणसाकडे एक्प्रकारचा अहंगड तयार झालेला असतो. ती अ‍ॅटिट्युड घेउन हा माणुस आपल्या कंपनीच्या कल्चर मध्ये फिट इन होइल का, याची चाचपणी अगदि सुरुवातीला टेक्नॉलजीच्या (सोशल नेटवर्क, डिजीटल फुटप्रिंट इ.) सहाय्याने केली जाते. त्या प्रोसेसमध्ये एखादा ब्लॉट सापडला तर चाळणी आपोआप लागते...

सिम्बा, पहिल्या पोस्ट मधले मुद्दे कळले आणि मी समजू शकतो. शेवटी नोकरी मिळायला जे काही त्या घटकेला करण्याची गरज असते ते करावं लागतं.
पुढच्या पोस्ट मध्ये जे एम्प्लॉयर्बद्दल जे लिहिलं ती वस्तुस्थिती आहे हे ही जाणतो. आणखी विचार करता असं वाटलं की कोणी ही ट्रेंड बदलू शकलं तर मोठ्या कंपन्याच बदलू शकतात. एकदा त्यांनी असं न करण्या मागची एथिकल कारणे जाणून घेवून पुढे तशा मागण्या न करता सुद्धा चांगले कँडीडेट मिळू शकतात असा लीड बाय एग्जॅमपल अप्रोच घेतला तर पुढे इतर कंपन्या त्याचे अनुकरण करतील.
अमेरिका ह्या बाबतीत अगदी धुतल्या तांदळासारखी स्वच्छं आहे असं अजिबात नाही, फक्त प्रायवसी बाबतीत अर्थातच दोन्ही पारट्यांचे आकलन आपल्या भारतापेक्षा जास्त आहे. डेवलप्ड देश असल्यामुळे ते सहाजिक आहे.

साहिल शहा — इंट्रेस्टिंग माहिती.

<< However, only 25.6% of senior managers in the private sector were women.
Currently, just seven of the 249 companies listed on the Toronto Stock Exchange's main index have a woman CEO.
Women held just 25.0% of board seats in 2016.
म्हणजे Ground Reality बरीच वेगळी असते >>

-------- सहमत.... (कॅनडामधे) अशी तफावत आहे हे मान्य आहे, आणि तो दुर करण्याचा प्रयत्न सर्व पातळीवर करण्याचा प्रयत्न असतो. तसा तो होतो आहे हे HR यान्ना दाखवावे लागते. एकाच प्रकारच्या कामासाठी आर्हता, निकष समान असले तरी स्त्री - पुरुष यान्च्या पगारात तफावत आहे. याला अपवाद असतील...
विषय भरकटेल म्हणुन थाम्बतो.