नोकरी मिळवताना 2.1 ) रेझ्युमे / सी व्ही / बायो डेटा

Submitted by विचारजंत on 23 May, 2018 - 03:43

आधीचा भाग - https://www.maayboli.com/node/66038

कोणतीही नोकरी शोधते वेळी रेझ्युमे / सी व्ही / बायो डेटा ही पहिली पायरी असते, आणि अतिशय महत्वाची . अति महत्वाची कारण तुम्ही कोण आहात आणि उपलब्ध जागेसाठी योग्य आहात की नाही हे कम्पनीला कळण्याचे रेझ्युमे / सी व्ही / बायो डेटा हे पहिले माध्यम असते.
( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल. )

अनेकदा आपल्याला अनुभव येतो की जाहिरातीत दिलेली जागे (पोझिशन) चे वर्णन तुम्हाला लागू पडते, पण अनेकदा अशा जागांसाठी अर्ज करूनही कोठलाच कॉल येत नाही . उलट, माहितीतील कमी पात्रता असलेल्या कोणाला तरी कॉल येतो. कधी तरी असे दिसते की अर्ज न केलेल्यासुद्धा लिंक्ड इन वरील प्रोफाइल वरून कॉल येतो. अशावेळी वशिल्याला , नशिबाला किंवा ओळखीला दोष न देता आपल्या रेझ्युमे मध्ये काही दोष आहेत का? तो बरोबर आहे का? तो वाचनीय आहे का? काही माहिती अपुरी तर नाही ना? हे शोधणे गरजेचे असते.लेखक - हेमंत वाघे

सर्वसाधारणपणे कोठल्याही जाहिरातीला शेकडो नव्हे तर हजारो अर्ज येतात. नोकरी डॉट कॉम वर जेंव्हा कन्सल्टन्ट शोध घेतात तेव्हाही असे च रिझल्ट्स मिळतात. (त्यातही अनेक रिझल्ट्स चुकीचे असतात ,चुकीच्या रेझ्युमे मुळे आलेले. तर निवड करणाऱ्याकडे चॉईस भरपूर असतो, आणि इंटरव्यू चा कॉल येण्याआधी उमेदवारा चा विचारही केला जात नाही. आणि पुढेही अनेकदा इंटरव्यू ला हाच रेझ्युमे पुढे घेऊन त्या वरून प्रश्न विचारले जातात . लेखक - हेमंत वाघे

रेझ्युमे म्हणजे काय? तर एका विशिष्ठ प्रकारे ( फॉरमॅट ) मध्ये दिलेली तुमच्याबद्दलची आणि तुमच्या व्यावसायिक आयुष्याबद्दलची माहिती ,तुमचा लेखा-जोखा. त्यात काही माहिती दिली जावी असे सर्वमान्य संकेत आहेत.

आता मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की रेझ्युमे चे जे फॉरमॅट लिहीत आहे ते काही ब्रह्मवाक्य नाही. अनेक फॉरमॅट नेट वर आहेत. तसेच काही देशात किंवा विशिष्ठ कामासाठी ठराविक एक फॉरमॅट लागते किंवा काही व्यवसायात विशिष्ठ माहिती असावीच लागते ( जसे की असलेली सर्टिफिकेशन्स , काही व्यवसायात शारीरिक क्षमता - उंची वजन वगैरे ) . हा फॉरमॅट मी या व्यवसायात राहून , अनेक अर्ज करून शिकलेला आणि कमीत कमी जागेत अधिक अधिक माहिती देता यावी म्हणून बनवलेला आहे. याउपरही आपण अनेक प्रयोग करू शकता. यात मी अनेक गोष्टींच्या मर्यादा सुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहे. लेखक - हेमंत वाघे

रेझ्युमे - सर्वसाधारण सूचना

१) A४ आकाराच्या पानात बनवावा.

२) चारी बाजूला जागा सोडावी . डाव्या बाजूला थोडीशी जास्त.

३) साधे, सरळ, सर्वत्र उपलब्ध आणि वाचनीय फॉन्ट वापरा. उदा - Arial, Calibari, MS Sans Serif इ. अनेक फॅन्सी फॉन्ट सर्वत्र उघडत नाहीत आणि फॉरमॅटिंग बिघडते.

४) एकाच फॉन्ट च्या वेगवेगळ्या साईझ ( ८,९,१०,१२ ) आणि बोल्ड - इटॅलिक मधून व्यवस्थित काम करता येते.

४) रेझ्युमे एम एस वर्ड मध्ये बनवा. त्यात थोडे तरी एडिट करता येईल असे ठेवा ( लॉक करू नका) कारण कधीकधी कन्सल्टन्ट ला काही माहिती डिलीट करून पाठवावे लागते , किंवा काही नोट्स टाकून पाठवावे लागते . पीडीएफ नको . अनेकदा त्यात काही करता येत नाही म्हणून कन्सल्टन्ट सरळ दुसरा उमेदवार बघतो. एक्सेल, पॉवर पॉईंट मध्ये तर नकोच नको.

५) हायलाईट करताना ग्रे करू नका . अनेकदा स्वस्तात प्रिंट केले , झेरॉक्स मारले तर ते खराब दिसते.

६) कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती देण्याची कला अवगत करा.

७) रेझ्युमे अनेकदा तपासून घ्या. यात स्पेलिंग मिस्टेक अजिबात नको.

लेखक - हेमंत वाघे

पुढील भागात आपण रेस्युमे चे विविध भाग आणि त्यात काय काय माहिती कशा प्रकारे द्यावी लागते हे बघू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पी डी एफ नको वाला पॉईंट एकदम पटला.
मला कोणी रेफर कर म्हणून पी डी एफ पाठवली की चिडचिड होते.
पण एका कंपनीच्या ओपनिंग मध्ये 'फक्त पी डी एफ पाठवा' असेही पाहिले.

मी तर म्हणेन की उलट पीडीएफच पाठवा कारण सहसा मग तुमच्या परस्पर कुणी तुमच्या रिझ्युमेमध्ये बदल करु शकत नाही..... Its more secured than word

@ स्वरुप साहेब

काही जणांनी रेस्युम पाठवताना पीडीएफ चांगले फोर्म्याट आहे - त्याने काय प्रोब्लेम येतात असे विचारले - तर हे माहिती असलेले इश्यू

पीडीएफ चे प्रॉब्लेम

१) बदल करता येत नाही - अनेक दा रेस्युमे मध्ये झटपट बदल करावेच लागतात - तसेच अनेकदा कन्सल्टन्ट ज्युनिअर पोझिशन ला पहिला लॉट सर्व काँटॅक्ट आणि कधीकधी नाव डिलीट रण अनेकदा त्यांना पैसे असाइनमेंट पूर्ण झाल्यावर मिळतात , आणि असाइनमेंट च्या सुरुवातीला कसे कँडिडेट असतील याचे sample पाठवाचे असते . जर काँटॅक्ट किंवा नवेनावे मिळाली तर कम्पनीने डायरेक्ट सम्पर्क केल्याच्या घटना घडल्या आहेत.

२) अनेक दा जी रेस्युम शोधणारी सॉफ्टवेअर आहेत त्यांना पीडीएफ शोधायला प्रॉब्लेम येतो .

३) अनेकदा कम्पनीसाठी कँडिडेट चे डिटेल विशिष्ट फॉर्म मध्ये किंवा एक्सेल मध्ये द्यावे लागतात. वर्ड रेस्युम झटपट टेक्स्ट मध्ये करून त्यातील माहिती लगेच त्यात भारत येते . पीडीएफ मधून कोपी पेस्ट अनेकदा प्रोब्लेम देते . आणि त्यात लॉक्ड पीडीएफ असेल तर अजूनच . आणि अनेकदा हे काम वेगात करावे लागते

तर आता तुमचा रेस्युम पीडीएफ मध्ये असेल तर काय होऊ शकते ? जर त्या वेळी सर्च मध्ये कमी कॅन्डीडेट मिळाले तर फोन करून पीडीएफ वाल्या कडून वर्ड फॉरमॅट मध्ये रेस्युमी मागवला जातो. पण जर भरपूर ठीक ठाक कॅन्डीडेट मिळाले असतील तर ? १००-२०० किंवा जास्त ? तर हे पीडीएफ रेस्युम सरळ बाजूला टाकले जातील . वाचण्याचे हि कष्ट घेतले जाणार नाही . हे असे झालेले पहिले आहे. मी जिकडे काम केले होते ते अनेकदा आलेल्या ज्युनिअर पोझिशन आमच्या पार्टनर कडे देत असत कारण हि "गधा मजुरी " करण्यासाठी आमची सिस्टीम तयार नाही . पण मी अशा पोझिशन वर काम करणाऱ्या चे काम पहिले आहे, आणि बऱ्याच जागा साठी किणी प्रमाणात रेस्युम मिळतायत तेही बघितले आहे . जाहिरातीला हि असाच प्रचंड प्रतिसाद मिळतो ( त्यात हि अर्धे रेस्युम पदाशी काहीही सम्बन्ध नसलेले असतात )जर रेस्युम वाचलाच गेला नाही तर स्वतःला सिद्ध करायला संधी कशी मिळणार ? त्यामुळे सर्वसामान्य संकेत असा आहे कि जे सर्वत्र चालते ते करा . अपवादात्मक जर कोणाला पाहिजे असेल तर तो तसे पीडीएफ मागेल . काही कम्पनी ना तर त्यांच्या फॉर्म मध्येच माहिती भरून लागते .

हा मी अति सिनिअर जागा ना रेस्युम न बनवता हि नोकरी मिळालेली पहिले आहे Wink सी इ ओ , डायरेक्टर वगैरे ना "शोधले" जाते , तिकडे असे नियम लागू पडत नाहीत.

चांगली माहिती.
अनेकदा कंपनीज कन्सल्टंट कडून सिव्ही घेतात, त्या माणसाला लिंकडइन वर संपर्क करून कनेक्ट करून प्रत्यक्ष त्याच्याकडून मागवून 'एम्प्लॉई रेफरल' किंवा 'कंपनीने स्वतः शोधले' दाखवून थर्ड पार्टी एजन्सीज चे पैसे बुडवतात.
हे सगळे घोळ माहीत नसल्याने किंवा पर्वा करत नसल्याने कँडीडेट पण निरागसपणे 4-5 जण आणि 3-4 कन्सल्टंट ना एकाच नोकरीसाठी माहिती शेअर करतात.त्यातल्या एकाला पैसे मिळतात आणि बाकीच्यांचे श्रम वाया जातात.

विचारजंत, तुमचा हा उपक्रम प्रशंसनीय आहे. बर्‍याच उमेदवारांना यामुळे फायदा होइल यात काहि शंका नाहि. याच हेतुने, रेझुमे पिडिएफ मध्ये असावा का वर्ड मध्ये याबाबतची दुसरी बाजु माडण्याचा प्रयत्न करतो, रोष नसावा.

१. पिडिएफ फाइलमधेहि बदल करता येतो, तुमच्या कडे अडोबी असेल तर. हे सॉफ्टवेर महाग असल्याने लहान-सहान रिक्रुटर्स कडे सहसा नसते. यामुळे विनाकारण तुमचा रेझुमे टँपर होण्याची शक्यता उद्भवतच नाहि. अ‍ॅड्रेस्/फोन नंबर मास्क करायचा असेल तर उमेदवाराकडे तशी विनंती करुन तो बदल करुन घेता येतो. याउलट वर्ड जवळ-जवळ सगळ्यांकडेच असल्याने रेझुमे टँपर होण्याची शक्यता बळावते. महत्वाचं म्हणजे, तुम्ही मेहनत घेउन रेझुमेचं अगदि ढाँचु (ब्लॉक्स, बुलेट्स इ.) फॉर्मॅट बनव्लं असेल तर काहि चावट रिक्रुटर्स ते फॉर्मॅट चोरुन त्यांच्या सर्कलमध्ये शेअर करायला मागेपुढे पहात नाहित. Happy
२. मला वाटतं सगळे पार्सर्स पिडिएफ फाइलचं इन्पुट घेतात.
३. अ‍ॅक्रोबॅट रिडर किंवा त्याच्या ब्राउझर प्लगीन द्वारे पिडिएफ फाइलमधुन एखादा भाग कॉपी/पेस्ट सहजरित्या करता येतो. कांटेंट हेविली फॉर्मॅटेड असेल तर डिस्टॉर्शन होउ शकतं पण तो धोका वर्ड्/एक्सेल मध्ये हि आहे. शिवाय पिडिएफ मधेहि फॉर्म क्रियेट करुन युझर इन्पुट्स कॅप्चर करायची सोय आहे, फुल ब्लोन वर्शन मधे.

पिडिएफची निर्मितीच सुलभ पोर्टेबिलिटि साठी झालेली असल्याने रेझुमेची देवाण-घेवाण याच फॉर्मॅट मध्ये व्हावी या मताचा मी आहे...

राज साहेब अर्थात तुमचा हक्क आहेच तो
पण गमत अशी आहे कि कंपनीचे रिक्रूट मेंट डीपार्टमेंट असो कि कन्सल्टन्ट एक प्रोब्लेम येतो - अतिरेकी प्रमाणात मिळणाऱ्या प्रोफाईल - आणि त्यात ५० ते ७० टक्के कचरा असू शकतो . डायरेक्टर साठी जाहिरात दिल्यावर अनेक ट्रेनी लोकांनी रेस्युम पाठवल्याचे मी स्वत: अनुभले आहे . आणि अनेकदा १ जागे साठी ३० ते ४० लायक रेस्युम शोधले कि कमी कमी होत एखादा नक्की मिळून जातो. आणि मग शेकडो प्रोफाईल असतील तर ? पहिले ठीक ४० मिळतील त्यांना सरळ घेतले जाते पुढच्या पायरी साठी .
पीडीएफ बद्दल मी सांगितले आहे ते प्रत्यक्ष जगात होते. काही मिड / सिनिअर पोझिशन साठी मी पीडीएफ प्रोफाईल एडीट केल्या आहेत आणि किती हि सरळ असो त्रास होतोच. त्यावेळी पोझिशन तशा होत्या आणि मागवण्याचा वेळ नव्हता म्हणुन हे केले . पण सर्वसामान्य जागासाठी एव्हडा वेळ नसतो आणि चोइस प्रचंड असतो . फोन करून रेस्युम मागवण्यात वेळ घालवण्यापेक्षा तेव्हढ्याच वेळात ४-५ रेस्युम प्रोसेस करून होतात. आणि भरपूर चॉईस पुढे पडलेला असतो . बऱ्याचदा नन्तर बघायला किंवा बोलवायला फोल्डर केला जातो, अशा अर्धवट , जुन्या , पीडीएफ प्रोफाइल त्यात टाकतात. पण ते बघायची पाळी आली नाही तर ? अनेकदा तर पहिल्या नजरेत काही गोष्टी दिसल्या नाहीत तर रेस्युम बाजूला टाकला जातो
अर्थात आपणास पीडीएफ मध्ये रेस्युम पाठवायचे स्वातंत्र्य आहे . आणि रिक्रुटरला हि त्याच्या सोइ ने चाळणी लावायचे , जो पर्यंत कम्पनी ला हवे तसे लोक मिळत आहेत . प्रचंड लोकसंख्येमुळे भरपूर लायक उमेदवार उपलब्ध आहेत हे सत्य आहे.पण हे आपणास हि नक्की पटेल कि जर पुढील इंटरव्यू चा कॉल च आला नाही तर नोकरी मिळणारच नाही ...

राज, तुम्ही सविस्तर लिहून माझे लिहिण्याचे कष्ट वाचवले!

मी गेली ७-८ वर्षे माझ्या टीम्ससाठी बऱ्यापैकी रिक्रूटमेंट केली आहे.... आजतागायत पर्सनल डीटेल्स मास्क केलेला/हाईड केलेला एकही Resume पाहण्यात आलेला नाहीये!
अर्थात माझा अनुभव एका ठराविक क्षेत्रातल्या ठराविक प्रकारच्या रिक्रूटमेंटचा असल्याने वरती उल्लेख केलेल्या गोष्टी होतच नसतील हे मी ठामपणे म्हणू शकत नाही

मी अनेकदा HR सोबत बसून जॉब पॉर्टल वरुन screening ही केलेले आहे.... तेंव्हाही मला पीडीएफ मधले डीटेल्स सर्चमध्ये येत नाहीत वगैरे problems आलेले आठवत नाहीत!

माझी पीडीएफला पसंती फक्त परस्पर एखाद्याला सहजी एडीट करता येत नाही, अलायन्मेंट हलत नाही, फॉर्मेटींग बिघडत नाही एव्ह्ढ्यासाठीच आहे

आणि वरती राजने म्हंटल्याप्रमाणे टेंप्लेट कॉपी करण्याचा मुद्दाही महत्वाचा आहे!
अर्थात चोरणारे काय कसेही चोरी करतातच म्हणा!

वाचतेय...
सर्वांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत...