मी शरण तुला आली

Submitted by Meghvalli on 23 July, 2025 - 10:15

चांदण्यात चिंब भिजून, मिलनाची रात्र आली,
बाहुपाशात तुझ्या सजणा, मी गलित गात्र झाली।

ओठांचा स्पर्श मुलायम, अधरांस झाला जेव्हा,
ज्वाळांच्या उठल्या लाटा, एक विज कडाडून गेली।

कानांत तुझं गुणगुणणं, थेट हृदयास भिडलं,
शब्दार्थ लागताच, मला गोड लाज आली।

विकल्प कोणता उरला होता माझ्याकडे रे,
ती गोड मागणी अनामीक, रंध्रारंध्रांने केली।

श्वासा-श्वासातून उसळली, अग्नीची उत्क्रांती,
मी विसरून गेली मजला... मी शरण तुला आली।

बुधवार, २३/७/२५, ६:५४ PM
✍ अजय सरदेसाई – ‘मेघ’

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशेष नाही आवडली.
आली-गेली पेक्षा आले-गेले अश्या भाषेची सवय आहे एक तर.

दुसरे म्हणजे रोमँटिक भावनांची वाच्यता करताना, गलितगात्र हा शब्द वापरतात का - माहीत नाही. नसावा.

@बन्या आणि @सामो
खरच तुमचे म्हणणे लक्षात आले.
अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

संपादन नका करू. आली गेली पिली कानाला किती गोडं वाटत. अगदी गुदगुल्या होतात.
मै आयी आयी आयी ह्यावारून आलं असणार.
कविता अर्थातच आवडली.

@सामो ,@केशवकुल
अभिप्रायाबद्दल खुप आभारी आहे.
कधी कधी काय होतं की काही कवितेच्या ओळी सुचतात किंवा संकल्पना सुचते. विचार किंवा ती संकल्पना मनास इतकी भावते की ती कागदावर मांडण्याच्या नादात बाकी सगळं मागे राहुन जातं. माझं संपुर्ण शिक्षण इंग्रजीत झाल्या मुळे मराठी शब्दभांडार कदाचीत कमी पडतं आणि काहीही करुन यमक रचना जमवण्याचा उत्साह म्हणा किंवा कंपलशन म्हणा अशा भाषिक घोड चुका लेखनात घडतात.क्षमस्व.