Submitted by Meghvalli on 21 February, 2026 - 03:32

मिठीत तुझ्या सख्या आले उमलून सर्व गात्र,
आठवते मज अजूनही ती अमृताची रात्र।
श्वास तुझा अलवार गुंजारला कानांत,
हृदयाचे स्पंदन तुझे थरथरले देहात।
गंध आपुला मिसळला अलवार एकमेकांत,
प्रणयसुख पसरले सखोल माझ्या देहविश्वात।
विरघळले तन-मन दोन्ही त्या एका आभासात,
जीवन हे कृतार्थ झाले, निवला गूढ एकांत।
हा क्षण चिरंजीव व्हावा गोठून या क्षणात,
प्रार्थना हीच मनमथाला माझ्या मनात।
शनिवार, २१/२/२६ , १२:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेश भट यांच्या , आताच
सुरेश भट यांच्या , आताच अमृताची बरसून रात गेली या गाण्याची आठवण झाली
शब्दांची मांडणी खूप आवडली . सुंदर कविता!
@कल्पनेचा कुंचला खुप खुप
@कल्पनेचा कुंचला खुप खुप धन्यवाद _/\_