'अमेरिका'

एक अमेरिकन ‘हाय -टेक’ डेअरी …

Submitted by दीपा जोशी on 17 August, 2016 - 06:26

cow1.jpgcow2.jpg
माझी मुलगी ऋचा अमेरिकेत इंडियाना राज्यातल्या पर्ड्यू विद्यापीठात पि एच डी करते . तिच्याकडे गेलो होतो तेव्हाचा हा अनुभव.

योसिमिटी व्हॅली फोटोज

Submitted by साहिल शहा on 6 August, 2016 - 09:54

मागच्या महिन्यात योसिमिटी व्हॅली मध्ये जाउन आलो. त्यावेळचे काही फोटो.

IMG_2089.jpg

सुरवात ग्लेसियर पॉईट पासुन केली. नावाप्रमाणे योसिमिटी व्हॅली च्या सगळ्या बाजुनी डोंगर आहे. त्यतिल एका डोंगरावर ग्लेसियर पॉईट आहे जिथे गाडीने जाता येते. ह्या भागावरुन योसिमिटी फॉल, mount vernon falls, नवाडा फॉल, half dome , आणि बर्याच पर्वत रांगा दिसतात.

फोटो मध्ये दोन पर्वत रांगामधिल योसिमिटी व्हॅली दिसत आहे.

IMG_2122.jpg

प्रांत/गाव: 

आमचं आम्ही बघू

Submitted by Manaskanya on 4 August, 2016 - 11:21

हल्ली एक नवीनच उद्योग लागलाय सगळ्या जगाला सारखे आम्हाला नावे ठेवतात.

आम्हाला म्हणजे अमेरिकेला हो.

काय तर म्हणे एवढ्या मोठया ३०० मिलियन लोकांच्या देशातून आम्ही दोन अफलातून उमेदवार निवडलेत

तरी माझ्या मैत्रिणीना मी आधीपासून सांगत होते हिलरी समोर Trump च असणार

पण नाही बसल्या आपल्या Cruz आणि Rubio करत.

बघा आता जिंकला का नाही Trump.

अहो किती पैसे आहे माणसाकडे. आता त्यानेच डोकंही वापरायचं. काहीतरीच तुमचं.

असा Joker आधी बघितला नाही म्हणे. मग आता बघा ना

हिलरीने म्हणे ३०००च्या वर इमेल्सचा घोळ घातला. कळत कस नाही तुम्हाला तिला क्लीन चिट मिळालीये.

Suits (TV series)

Submitted by आयडू on 14 February, 2016 - 12:55

Suits (legal drama -TV series) https://en.wikipedia.org/wiki/Suits_(TV_series) ही टीव्ही सिरिज २०११ पासून केबल नेटवर्क युएसे वरून प्रसारित केली जात आहे. कुणी ती पहात असेल तर त्या संदर्भात चर्चा करण्यासाठीचा हा धागा...

विषय: 

देशांतराच्या कथा (१): अमेरिकेतील भारतीयांचा इतिहास

Submitted by निकीत on 7 May, 2015 - 06:12
indians on komagata maru

अमेरिकेत आज सुमारे ३० लाख (~ १% लोकसंख्या) भारतीय वंशाचे लोक राहतात; उत्पन्न आणि शिक्षणाच्या बाबतीत सर्वाधिक यशस्वी स्थलांतरित म्हणून भारतीय ओळखले जातात. ते तसे का आहेत हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे; ह्या लेखात मी भारतीय लोक अमेरिकेत कसे स्थिरावले याचा थोडक्यात आढावा घेणार आहे. अमेरिकेमध्ये भारतीय स्थलांतराचा इतिहास सुमारे १५० वर्ष जुना आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नसते. स्थलांतर खऱ्या अर्थाने वाढलं ते १९६५ नंतर आणि त्याबद्दल आपण अनेक माध्यमातून वाचत / ऐकत / पाहत आलो आहोत. पण साधारण १८८० ते १९६५ हा प्रवास मोजक्याच भारतीयांचा असला तरी संघर्षपूर्ण आहे.

अमेरीका टुर

Submitted by madevi on 21 April, 2015 - 05:51

आम्हाला २१ दिवसाची अमेरीका टुर करायची आहे.मला जाणकार लोकाकडुन माहिती ह्वी आहे.
१) २१ दिवस पुरतील का?
२) महत्वाची स्थळे (नेट वर माहिती मिळेल पण इथे अगदि खरी माहिती मिळ्ते)
३) सगळ्यात महत्वाचे टुर पॅकेज घ्यावे का स्वत; करावी.( इथेच गाड आडतय)
४) लहान मुले आहेत दोन.

विषय: 
शब्दखुणा: 

अमेरिकेत एच-४ (H4) वर असताना काय करता येऊ शकते?

Submitted by माधवी. on 13 March, 2013 - 08:19

अमेरिकेत H4 वर असताना काय करता येऊ शकते याबद्दल माहिती हवी आहे.
थोडक्यात मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून काही नवीन शिकता येऊ शकते का? ' संयुक्ता' मधे एक लेख वाचला होता. त्यातून काही माहिती कळाली होती.
अजून कोणी काही माहिती शेअर केली तर निर्णय घेताना जरा सोपे जाईल. Happy

शब्दखुणा: 

अमेरिकेत पेनेसिल्वानियामध्ये दक्षिण भारतीय आजीचा खून करून १० महिन्याच्या नातीला पळवले.

Submitted by mimarathi on 25 October, 2012 - 21:29

अमेरिकेत पेनेसिल्वानियामध्ये दक्षिण भारतीय आजीचा खून करून १० महिन्याच्या नातीला पळवले. आजी नातीला सांभाळण्यासाठी भारतातून आली होती आणि जान. २०१३ मध्ये परत जाणार होती.
हा सगळा काय प्रकार असेल? आज ३ दिवसांनी नातीचा किंवा खुन्याचा काहिच तपास नाहीये.आज सकाळी हि बातमी कळल्यापासून काहीच सुचत नाहीये, विस्कॉन्सिन मध्ये गुरुद्वारा वर हल्ला झाला, आता हे घडलंय इथे राहणारे भारतीय सहसा कुणाच्या अध्यात मध्यात नसतात. वांशिक द्वेषातून तर हे झाले नसेल ? सानवी लवकर आपल्या आई बाबांना भेटो हीच प्रार्थना.....!

अधिक माहिति :

विषय: 
शब्दखुणा: 

सतरा कारभारी , एक नाही दरबारी !

Submitted by AmitRahalkar on 18 November, 2011 - 05:47

सप्टेंबर महिन्यात डाउ जोन्स इंडेक्स ने पाताळ धुन्डीत नविन मजली गाठल्या तर औक्टोबर महिन्यात परत वर उसळी मारुन नवीन उच्चांक गाठले. नोवेंबर महिन्याची सुरवात मात्र डाउ जोन्स इंडेक्स च नाही तर जग भरातील इंडेक्स साठी काही चांगली झाली नाही. युरोप मधे ग्रीस संबंधीत निर्णय घेणार्‍या सतरा लोकांच्या कमिटी ने आणि अमेरिकमधे कर्ज कपाती संबंधीत निर्णय घेणार्‍या बारा लोकांच्या कमिटी उठवलेल्या अनिश्चितते च्या धुक्या कडे पाहता वर्षाचे उरलेले दिवसही ही मार्केट्स अशीच वर खाली बागडणे सुरू ठेवतील असे दिसते !

गुलमोहर: 

'स्टेसी' - माझी अमेरिकेतील मैत्रीण

Submitted by आशयगुणे on 9 October, 2011 - 06:05

अमेरिकन माणूस हा पटकन कुणाशी बोलत नाही. पण एकदा त्याला, किव्हा तिला, तुमच्या चांगल्या असण्याबद्दल खात्री पटली की त्यांची कळी खुलते. मग ते तुमच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारतात. त्यांना तुम्ही हवे-हवेसे वाटता...तुमच्याशी सारखं काहीतरी 'share ' करावेसे वाटते.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - 'अमेरिका'