अमेरिकेतील निवडणुका

शंभर अपराध

Submitted by अमितव on 4 August, 2016 - 14:05

शिशुपाल. कुंतीच्या बहिणीचा मुलगा, श्रीकृष्णाचा आत्तेभाऊ; जेव्हा जन्मला तेव्हा त्याला ३ डोळे आणि चार हात होते. सकाळी सकाळी त्याचा जन्म झाल्यावर त्याचे आई वडील त्याला सोडूनच देणार होते इतक्यात ‘प्रेस स्टार सिक्स टू म्युट, प्रेस पाउंड सिक्स टू अनम्युट’ असली रोजची दरबारातली उभ्या उभ्या बैठकीची अनाउन्समेंट चालू झाली. ‘मै समय हू’ आपल्या धीर गंभीर आवाजात बोलू लागला. म्हणाला की 'याच्या मरणाची वेळ अजून आलेली नाही. कुणा एका व्यक्तीने याला मांडीवर घेतल्यावर याचे जास्तीचे अवयव नाहीसे होतील, पण त्याच व्यक्तीकडून याचा मृत्यूही होईल.'

विषय: 

आमचं आम्ही बघू

Submitted by Manaskanya on 4 August, 2016 - 11:21

हल्ली एक नवीनच उद्योग लागलाय सगळ्या जगाला सारखे आम्हाला नावे ठेवतात.

आम्हाला म्हणजे अमेरिकेला हो.

काय तर म्हणे एवढ्या मोठया ३०० मिलियन लोकांच्या देशातून आम्ही दोन अफलातून उमेदवार निवडलेत

तरी माझ्या मैत्रिणीना मी आधीपासून सांगत होते हिलरी समोर Trump च असणार

पण नाही बसल्या आपल्या Cruz आणि Rubio करत.

बघा आता जिंकला का नाही Trump.

अहो किती पैसे आहे माणसाकडे. आता त्यानेच डोकंही वापरायचं. काहीतरीच तुमचं.

असा Joker आधी बघितला नाही म्हणे. मग आता बघा ना

हिलरीने म्हणे ३०००च्या वर इमेल्सचा घोळ घातला. कळत कस नाही तुम्हाला तिला क्लीन चिट मिळालीये.

अमेरिकेतील निवडणुका - २०१२

Submitted by लोला on 16 May, 2012 - 21:19

यावर्षी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होतील. रिपब्लिकन पक्षातर्फे 'मिट रॉमनी' उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील असं (जवळपास) निश्चित झालं आहे. त्यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार कोण असतील/असावेत यासाठी नुकत्याच मायबोलीवर घेतलेल्या सर्व्हेत भाग घेणार्‍यांचे आभार. मायबोलीकरांनी (प्रचंड) बहुमताने 'बॉबी जिंदल' (आर्च, आडनाव बरोबर लिहिलंय का?) यांना निवडले. त्यांच्या खालोखाल कॉंडालिझ्झा राईस (नाव ऐकलेलं आहे, द्या ठोकून!) यांना मते मिळाली.

Subscribe to RSS - अमेरिकेतील निवडणुका