Submitted by आयडू on 14 February, 2016 - 12:55
Suits (legal drama -TV series) https://en.wikipedia.org/wiki/Suits_(TV_series) ही टीव्ही सिरिज २०११ पासून केबल नेटवर्क युएसे वरून प्रसारित केली जात आहे. कुणी ती पहात असेल तर त्या संदर्भात चर्चा करण्यासाठीचा हा धागा...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेच्चा कोणीच बघत नाहीसं
अरेच्चा कोणीच बघत नाहीसं दिसतय.
मी सद्ध्या ह्याचा सिझन 4 बघतेय. हार्वी आणि माइक रॉस ची फॅन झाले आहे ( जसं डोना म्हणते)
पूर्वी बघायचो. तीन चार सीझन
पूर्वी बघायचो. तीन चार सीझन बघितले. मग पुढचे सीझन एअर व्हायचे होते का जिकडे बघायचो तिकडे उपलब्ध न्हवते का अजुन काही. मग सोडुन दिलेली.
डॉना सगळ्यात भारी होती. आणि हार्वी स्पेक्टर आणि लुईस.
हो डोना/डोना मलाही आवडते.
हो डोना/डॉना मलाही आवडते. शेरलॉक होम्स सारखं तिला पटपट सगळ्या गोष्टींचे क्लू लागतात. हार्वी आणि डोना चे पूर्वीचे दिवस दाखवले तो एपिसोड आणि पाच वर्षांपूर्वी माईक आणि हार्वी च्या आयुष्यात काय घडत असतं तो एपिसोड आवडतो मला. डायलॉग एकदम चुरचुरीत आहेत स्पेशल हार्वी माईक किंवा हार्वी डोना, माईक लुईस.
लुईसचा मला खुप राग यायचा सुरवातीला पण नंतर नंतर तोही आवडायला लागला.
हि सिरीयल किती चांगली आहे overall, आत्ताच्या नेटफ्लिक्स च्या सिरीयल बघता हि अगदी सोज्वळ आहे. सगळ्या ंबरोबर बसून बघता येणारी.
डॉना आणि लुईस ही दोन आवडीची
डॉना आणि लुईस ही दोन आवडीची पात्रे. नऊ सीजन नंतर संपली ना?
नुकतीच प्राइमवर बघायला
नुकतीच प्राइमवर बघायला सुरुवात केली आहे. ६-७ भाग पाहून झालेत.
अजून तरी खूप काही भारी वाटलेली नाही... चकाचक कॉर्पोरेट लुक, फॅशन मॉडेल्ससारख्या #कायम-कॅटवॉक बाया
पण रॉस आवडला.
फॅशन मॉडेल्ससारख्या #कायम
फॅशन मॉडेल्ससारख्या #कायम-कॅटवॉक बाया >>>> इथे अॅटॉर्नी आणि त्या फर्म्समध्ये काम करणारे लोक अजूनही बर्यापैकी फॉर्मल कपडे, सुट-बूट घालतात असं बघितलं आहे. तरी ह्यातल्या सगळ्या बायांना कायम कॅटवॉक का करावा लागतो काय माहीत

मी तीन सिझन बघून सोडली. कंटाळा आला. तेच ते वाटायला लागलं.
माईक-हार्वी , माईक- रेचल, हार्वी - जेसिका ह्यांच्यातले डायलॉग आवडले होते. डॉना आणि लुईस ही 'पात्र' पण आवडली होती.
पुढे ह्यात म्हणजे ग्रेज अॅनाटॉमी मधली 'इझी स्टिव्हन्स' आली आहे !
मी तीन सिझन बघून सोडली.
मी तीन सिझन बघून सोडली. कंटाळा आला. तेच ते वाटायला लागलं.>>>
हो ना?
मीही सोडली अर्ध्यातच. मला वाटलं मीच एकटी असेन.
सुट्स पहिल्या पाच सीझनपर्यत
सुट्स पहिल्या पाच सीझनपर्यत चांगली आहे .नंतर तेच ते बघून कंटाळा येतो.
कॉर्पोरेट law मध्ये भारतात तरी इतक्या झटपट सुनावणी , फायलिंग वगैरे होत नाही. ( स्वतः कॉर्पोरेट lawyer असल्याने माहीत आहे हे)
परदेशाच माहीत नाही
मला जेसीका आणि हार्वी आवडतात
मी तीन सिझन बघून सोडली.
मी तीन सिझन बघून सोडली. कंटाळा आला. तेच ते वाटायला लागलं. >>> माझा एक डायहार्ड सूट्स-फ्यान भाऊ आहे, तो पण मला म्हणाला तीन सीझन्सपर्यंत आवडेल, तेवढंच बघ
मला ६-७ भागांमध्येच तेच तेच वाटायला लागलंय
पण पहिला सीझन तरी सगळा बघायचा असं ठरवलं आहे.
मी पण थोडी पाहुन सोडुन दिली.
मी पण थोडी पाहुन सोडुन दिली.... खूपच तेच ते पणा चालु झाला होता अन बर्यापैकी प्रेडिक्टेबल वाटायला लागली होती..... सो सोडुन दिलं बघणं
माझा चौथा सिझन चालू आहे,
माझा चौथा सिझन चालू आहे, तोचतोच पणा आहे खरा, पण अजून तरी आवडतेय मला बघायला. सद्ध्या लुईस माइक च्या सिक्रेट वरून माइक आणि रेचलला त्रास देतोय, जेसीकाला ब्लॅकमेल करतोय,. लुईस ला ज्या पद्धतीने कळतं ते आवडलं मला.
स्टाईल आणि भपकेबाजपणा
स्टाईल आणि भपकेबाजपणा ह्यामुळे पहिल्या दोनेक एपिसोड नंतर बंद केली आणि त्याबदल्यात बॉश आणि अमेरिकन्स बघितल्या.
दोन्ही खूप आवडल्या. अमेरिकन्स तर संपली पण बॉशचा सातवा सीझन अजून येणार आहे.
आपला फेवरिट हार्वी स्पेक्टर!
आपला फेवरिट हार्वी स्पेक्टर! डॉना, लुईस, माइक रॉस सगळेच आवडतात पण हार्वी सर्वात. त्याचे आणि माइक चे जनरल बॅन्टर, चित्रपटातले कोट्स वापरणे वगैरे मस्त. एकूणच एपिसोड मधे शेवटी प्रश्न सोडवलेले असले की मला बघायला आवडते. त्यामुळे ही, व्हाइट कॉलर, बर्न नोटिस वगैरे सगळ्याच आवडतात.
मात्र हार्वी जरी आवडत असला, तरी सहानुभूती लुईसलाच. त्याच्या सुरूवातीच्या काड्या जमेस धरल्या तरी त्याला मिळणारी वागणूक किंवा त्याला ऑफिस-बाह्य गोष्टींत आलेले अपयश वगैरे बघताना वाइट वाटते. मग तो कधीकधी त्यातून पुन्हा उठून उभा राहतो आणि काहीतरी जबरी कामगिरी करतो ते एपिसोड्स जबरी आहेत. "You are about to get Litt up!" मला सर्वात आवडणारे सीन्स म्हणजे त्याची त्या ज्युनियर लॉयर मुलीबरोबरची केमिस्ट्री - जी नंतर सोडून त्या रेचेल च्या वडिलांच्या फर्म मधे जाते. ती अॅक्ट्रेसही छान आहे.
मी ५-६ सीझन्स बघितले आहेत. पुन्हा सुध्दा आवडतील बघायला.
ती अॅक्ट्रेसही छान आहे.>> हो
ती अॅक्ट्रेसही छान आहे.>> हो. गोड छोकरी आहे. तिची एक सिरीज (अॅज ए लीड रोल) पहिली आहे ज्यात टाईम ट्रॅव्हल वगैरे भानगडी आहेत. त्यातही छान आहे ती.
Suite मध्ये तोच तोचपणा आहे, काही वेळा प्रेडिक्तेबल देखील आहे मात्र मालिकेचा वेग, स्क्रीनप्ले, अभिनय या बाबतीत जरा उजवी असल्याने बिंज करायला मजा आली होती हेही खरं.
३-४ सीझन नंतर बोअर होऊन
३-४ सीझन नंतर बोअर होऊन सुद्धा मी पूर्ण पाहिली .. लै फुक्कट वेळ
जेसिका आणि डोना ..आवडत्या.