खुर्ची : १

Submitted by किल्ली on 4 April, 2018 - 10:04

मिलींद ची नुकतीच ह्या आडगावात बदली झाली होती. प्रथमदर्शनी तरी त्याला गाव बरे वाटले होते. साधारण एक आठवडा मुख्य गावाच्या भागात राहून, गावकर्यांबरोबर गप्पा मारून ,बोलून आणि सोबत काम करणाऱ्या नोकरदारांची मते ऐकून त्याच्या मनात गावाबद्दल निरीक्षणे नोंदवणे सुरु झालं होत. गाव तसं फार मोठं नव्हतं. पण नुकत्याच झालेल्या झालेला औद्योगिक विकासामुळे बाहेरच्या लोकांचा वावर वाढला होता. मुळ गाव तसं ह्या उद्योगनगरी पासून अलिप्तच असायचं. कारखान्यांमध्ये, कंपन्यांमध्ये काम करायला येणारी लोकं त्याच परिसरात राहणं पसंत करायची. म्हणून तिथे आता नवीन इमारती बांधणे आणि भाड्यावर देणे किंवा सदनिका विकणे असा स्थानिकांसाठी नवा उद्योग सुरु झाला होता. बहुतेक मंडळी भाड्याने घर घेऊन राहणं योग्य समजायची. कारण ह्या आडगावात कोण स्थायिक होणार! काही वर्षं इथे नोकरी करून बदली करून घेता येईल ह्या उद्देशाने बहुतेक लोक इथे येत. गावाला समुद्रकिनारा लाभला होता. त्याचे पर्यटन स्थळासारखे रूप विकसित होत होते , हा आणखी एक फायदा! त्यामुळे सुरुवातीला ह्या विकासाबद्दल नाखूष असणारे स्थानिक लोक मिळणाऱ्या नव्या रोजगारामुळे supportive झाले होते. ह्या उद्योग नगरीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व प्रकारच्या कंपन्या आणि कारखाने होते. त्यात manufacturing , chemical , packaging , आणि थोड्याफार माहिती तंत्रज्ञान आधारित कंपन्या होत्या. त्यामुळे सर्व वयोगटातील आणि शैक्षणिक पात्रता असलेले लोक तिथे नौकरी करू शकायचे. एक वेगळीच दुनिया गावाच्या बाजूला ह्या उद्योग नगरीच्या रूपाने वसली होती. गावकरी मात्र आपण भलं , आपला काम भलं , ह्या न्यायाने इकडे विनाकारण जास्त फिरकत नसत.

आता आपणही कंपनीजवळ राहण्यासाठी शिफ्ट व्हावे असा विचार मिलींदच्या मनात बळावत चालला होता. त्याला बरीच सबळ कारणे सुद्धा होती. कंपनी जवळ राहिलो तर येणं जण सोपं होईल. थोडंफार गरजेपुरता सामान तिथेही मिळत होतच. अगदी आवश्यक कशाची गरज पडली तर गाव फार दूरही नव्हतं. शिवाय आता कंपनी मध्ये बऱ्यापैकी ओळखी झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर बाहेरून येऊन इथे काम करणाऱ्या त्याच्यासारख्याच मुलांचा एक छान कंपू तयार झाला होता. ह्या भागात भाड्याने सदनिकाही मिळत असत. त्यामुळे रूम मिळायला काही अडचण नव्हतीच. लवकरच मिलींद आणि त्याचे दोन मित्र ह्यांनी एक बऱ्यापैकी स्वस्त आणि मस्त अशी रूम शोधायाचे ठरवले.

संध्याकाळी फेरफटका मारताना शैलेशला तो जिथे चहा प्यायचा त्या टपरीवाल्याकडून एक जागा रिकामी आहे असे समजले. ती खरेतर ३ खोल्यांची एक सदनिका होती. मुलभूत सोई होत्या. एकवार खोली बघून फार विचार न करता शैलेश ने तीच जागा घेऊ असे ठरवले आणि आगाऊ पैसे देऊन बाकीच्या कंपूला चांगली जागा मिळाली ही बातमी गरम गरम सामोसे आणि वाफाळत्या चहाबरोबर ऐकवली. आम्हाला न विचारात हीच रूम का ठरवली ह्यावरून मयूर ने थोडी कुरबुर केली. पण शैलेशने रूम शोधली नसती तर आपण तिघांनी खूप घोळ घातला असता ह्यावर त्यांचं एकमत झालं आणि त्यांनी चहाकडे मोर्चा वळवला.

शिफ्ट होण्याची तारीख ठरली आणि बाकीचे दोघे आपल्या सरप्राईझ खोलीवर राहायला जाण्याच्या तयारीला लागले. बाडबिस्तरा गुंडाळून एका सुट्टीच्या दिवशी तिघेही नवीन खोलीवर राहायला आले.
"अरे वा , बाल्कनी आहे की !! आरामखुर्ची पण आहे .जबरदस्त view दिसतो. इथे बसून मस्त वेळ जाईल. पण काय हे , रंग जरा काळपट वाटत आहे रे शैल्या, बघ ना ह्या भिंती, आणि काय रे चोथ्या मजल्यावर आहे हा फ्लॅट. लिफ्ट बंद पडली तर वांदे होणारेत आपले " इति मयूर
"अबे टॅन झाल्यात त्या भिंती !! ही ही " असा म्हणून आपल्याच जोक वर मिलींद फिदीफिदी हसत आणि मयूर कडे दुर्लक्ष करत इकडेतिकडे फिरत होता.
शैलेश मात्र गुणी बाळासारखा लगेच सगळं आवरण्यात आणि सामान लावण्यात व्यस्त झाला होता.त्याने स्वयंपाक घरात बेसिक भांडी ,उपकरणे ,थोडासा किराणा आणि सुके खाद्यपदार्थ अशी आवराआवर केली
मयूर आत आला. त्याने खाण्याचे डब्बे उघडले आणि सगळ्यांना जेवायला बोलावलं. अन्नाचा सुवास दरवळला आणि सगळेच पोटपूजेला लागले.संध्याकाळ पर्यंत सगळेच व्यवस्थित सेट झाले होते. पहिला दिवस अशा प्रकारे गडबडीत सरत आला होता.
पुढे काय होणार हे माहित असलेला तो टपरीवाला चहा देणारा मात्र भयाण रीतीने फ्लॅट कडे बघून हसत होता !!!!

--------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
(क्रमशः )

खुर्ची : 2 लिन्क :
https://www.maayboli.com/node/65789

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता आपणही कंपनीजवळ राहण्यासाठी शिफ्ट व्हावे असा विचार मिलींदच्या मनात बळावत चालला होता. त्याला बरीच सबळ कारणे सुद्धा होती. कंपनी जवळ राहिलो तर येणं जण सोपं होईल. थोडंफार गरजेपुरता सामान तिथेही मिळत होतच. अगदी आवश्यक कशाची गरज पडली तर गाव फार दूरही नव्हतं. शिवाय आता कंपनी मध्ये बऱ्यापैकी ओळखी झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर बाहेरून येऊन इथे काम करणाऱ्या त्याच्यासारख्याच मुलांचा एक छान कंपू तयार झाला होता. ह्या भागात भाड्याने सदनिकाही मिळत असत.
>>> हे रिपीट झाले आहे

धन्यवाद!!
हो, पुढच्या भागाची रूपरेषा आखली आहे ..शब्दांकन बाकी आहे ..टाकेन लवकरच

खुर्ची आराम करत आहे Lol
सध्या कार्यालयीन कामकाजामुळे वेळ मिळत नाहीये.
आज संध्याकाळी लिहीन पुढची कथा.

khup chan