मग गुगलवर मराठीच का नाही?

Submitted by निनाद on 19 July, 2011 - 20:31

गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषातराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन याचिका बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे.

आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!'
पुढे मराठीचे महत्त्व विषद करण्यासाठी ते माहिती देतात,

'गुगलची भाषांतर सेवा ६४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. जगात मराठी भाषिक संख्येने पंधराव्या स्थानावर आहेत. याचा अर्थ मराठीहून संख्येने कमी असलेल्या ५० भाषांना या सेवेचा लाभ मिळतो. फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन या भाषिकांपेक्षा मराठी भाषिक अधिक आहेत.
इंडिअन रीडरशिप सव्‍‌र्हे या संस्थेनुसार भारतात वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येत हिंदीनंतर मराठी वाचकांचा क्रम लागतो. त्यानंतर मल्याळी व इंग्रजी वाचकांची संख्या आहे. मराठी भाषेत आता १० दूरदर्शन वाहिन्या सक्रिय आहेत.'

असे असूनही गुगलने मराठीला दूर का ठेवावे हे अनाकलनीय कोडे आहे.

मराठी माणसाची नाराजी गुगल पर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून त्यांनी एक ऑनलाइन याचिका बनवली आहे. या याचिकेत सही करायला विसरू नका.
दुवा: www.petitiononline.com/gmarathi
तुमच्या प्रत्येक सहीचे महत्त्व आहे, आपण सर्वांनी एकत्र येऊन काही केले तर आशा आहे. यातून गुगलला काही तरी फरक पडेल!

भरत गोठोसकर लिखित लोकसत्ता मध्ये आलेला गुगलला मराठीचे वावडे का? हा लेख.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ऑनलाईन साईन केलं , आतापर्यंत ३५४ जणांनी पेटिशन वर साईन केलीय , माबोकर ह्या कार्यात मदत करण्यासाठी नक्कीच पुढे येतील .

याच वेळी गुगलवर भाषांतराचे कार्य सुरू आहे हे दिसून येते. Marathi Linguistic Team नावाचा एक गट काम करतांना दिसून येतो आहे. या याचिकेद्वारे त्यांना अजून बळ मिळेल असे दिसते.
गटाचे काम पाहण्यासाठी किंवा त्यात सामील होण्यासाठी हे पाहा - http://groups.google.com/group/marathi-linguistic-team/about

गुगलच्या मुंबई कार्यालयात फोन करून कुणी चौकशी करू शकेल का की गुगल मराठीवर काम करणारी टीम कोणती आहे ते.
त्यांचा संपर्क मिळाला तर अनेक गोष्टींचा खुलासा होईल असे वाटते.
गुगल कार्यालयाचा मुंबईतील पत्ता २६४-२६५ वासवानी चेंबर्स पहिला मजला डॉ. अ‍ॅनि बेझंट रोड असा आहे.
फोन 6611-7200

मुंबईकर फोन करून माहिती काढणार का?

अरे वा! त्वरित प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद डुआय!
मी गुगलच्या पानावर पाहिले. भारताच्या टीममध्ये तेथे सर्व लोक फक्त अमराठीच आहेत. त्यातही दिल्ली आणि गुरगावचा जास्त भरणा आढळला.
याचाही परिणाम असेल का मराठीला डावलण्यात? पण मग गुजराती कशी काय येते काही समजत नाही.

नाही तसे नसावे. गूगल शेवटी धंदा करणारी कंपनी आहे. मार्केट रिसर्च, यूजर बेस चे प्रतिनिधी यांच्या फीडबॅक मधून हे ठरवले जाते. तसा काहीच डेटा नसेल तर पायलट म्हणून २-३ भाषा निवडण्यात आल्या असतील, त्या कोणत्या निवडाव्या यात कदाचित निवडणार्‍यांचा हात असेल. पण शक्यता कमी आहे.

आणि मराठी लोक आपले मराठीपण ठसवत नाहीत म्हणा किंवा मिरवत नाहीत म्हणा. पूर्वी लोकलमधे गुजराती लोक गुजराती पेपर, तमिळ लोक तमिळ पेपर आणि मराठी लोक इंग्रजी पेपर घेउन बसलेले दिसत Happy कंपन्यांमधेही एखाद्या 'स्टाफ' च्या हातात 'सकाळ' वगैरे दिसणे कमीपणाचे लक्षण असल्यासारखे लोक वागत. प्रत्येकाकडे टाईम्स नाहीतर एक्सप्रेस किंवा बिझिनेस स्टॅण्डर्ड सारखे Happy

आणि मराठी लोक आपले मराठीपण ठसवत नाहीत म्हणा किंवा मिरवत नाहीत म्हणा.
अगदी अगदी सहमत आहे! उदाहरण तर चपखल दिले आहे.

असो,
आज मोझिला फायरफॉक्स वर सर्व भाषांच्या डिक्शनर्‍या मोफत उपलब्ध आहेत. पण त्यात मराठी नाही. हे आपले कर्म दारिद्र्य नाही का?

या कार्यात मला रस आहे.
अजून कुणाला मदत करायला आवडेल का?
दोनचार जण मिळून तसा मराठी शब्दकोश आपण तेथे घालू शकू.

सगळ्या फाफॉ वापरणार्‍यांना लिखाण करतांना सहजतेने शुद्ध लेखन करता येईल.

नॅशनल जिओग्राफिक चॅनल तमीळ मधे दिसतो तसं या सारखीच चळवळ करुन मराठी भाषेत डब केलेले कार्यक्रम दाखवायला भाग पाडलं पाहीजे

साईन नं. ८६९ ............... सकाळीच लोकसत्तात वाचलं ह्या विषयी तुम्ही मुद्दा येथे मांडलात ते अजून चांगले केलेत.

यातून काही सकारात्मक व्हावं ही इच्छा !!!

९७१... सही केलेली आहे...

जीमेल आणि गुगल ट्रान्सलेटर ह्या APP मध्ये मराठी उपलब्ध आहे... तिचा वापर बरेच जण करतात.. दोन्ही ठिकाणी शद्ब पूर्ण करण्यासाठी पर्याय पण उपलब्ध होतात... पण भाषांतरासाठी मराठी नाही हेही खरेच आहे..

धन्यवाद मंदार! बरोबर आहे नॅशनल जिओग्राफिकला एक इमेल पाठवायला काय हरकत आहे?

हा घ्या पत्ता -
feedback@ngcindia.com

हा घ्या इ-मेल चा मॅटर
---
Dear Sir, Madam,

Your television programs are interesting. However, programs are not available in Marathi Language. Can you please broadcast programs in Marathi language and broadcast?
Did you know?

  • Marathi is a 15th biggest spoken language in world – bigger than, Korean, Italian or French users!
  • Marathi readership is second highest in India.
  • Marathi is official language of Maharashtra state.
  • There are 10 Marathi language channels operating – broadcasting in and outside India.

Considering the huge viewership you must think of dedicating a channel with Marathi language services.

Thank you.

Regards,

---
पत्राने पाठवण्यासाठी पत्ता -
Mumbai
Lubna Sayed
Star India Pvt. Limited
The Masterpiece Marol Naka,
Andheri Kurla Road,
Andheri (East)
Mumbai 400 059

TEL: 022 6722 7777
FAX: 022 6722 8888

चला मंडळी आपण एक इमेल तर नक्की पाठवू शकतो. - मी पाठवला आहेच! Happy

Pages