आम्हाला जपानला येवुन दीड महिना झाला. एक महिना खुप आनंदात गेला. त्यानंतर माझी मान सारखी अकडायची. खुपच त्रास होत होता. फोमच्या गादी, उशीने असेल म्हणुन मानेचे , हाताचे व्यायाम करुन बघितले. पण काहीच आराम नाही. उलट त्रास वाढतच होता. नंतर खांदा, व उजवा हात खुपच दुखायला लागला. असह्य वेदना-- सहनच होईना. येथे मेडिकल प्रॉब्लेम. काय कराव कळेना.. पेन-किलरचाहि उपयोग होईना. हातावर रॅश दिसायला लागली. शेवटी जापनीज डॉ. कडे गेलो. ते म्हणाले 'हरपिस ' आहे. ट्रीटमेंट चालु केली. आता थोडा आराम आहे. एव्हड भयानक दुखण प्रथमच अनुभवते. मानेपासुन तळ-हातापर्यंत जळाल्यासारख्या जखमा, बर्निंग-पेन. औषध चालु आहेच. आत ५ ता. ला भारतात परत जायचय वेदनेसह.. केव्हा आराम पडेल कळत नाही. मान, खांदा दुखतोच आहे. येथील डॉ. म्हणतात. पुढची ट्रीट्मेंट भारतात घ्या. काय काळजी घ्यावी लागेल/ कश्यामुळे होतो हा आजार, कुणाला कल्पना आहे का. कळल तर बर होईल.
नागिण [हरपिस ]
Submitted by प्रभा on 3 December, 2014 - 04:31
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा उष्णतेचा विकार आहे असे
हा उष्णतेचा विकार आहे असे म्हणतात. यावर हमखास केला जाणारा उपाय म्हणजे दूर्वा (गणपतीला वाहतो त्या) व तांदुळ याचा रस / लेप लावणे. आणि शक्यतो थंड पदार्थांचे सेवन करणे. उष्णता होणार/वाढणार नाही याची काळजी घ्या. बाकी जाणकार सांगतिलच.
हर्पिस झोस्टर व्हायरसमुळे
हर्पिस झोस्टर व्हायरसमुळे होतो. कधीतरी इन्फेक्शन झालेले असते व तो डॉर्मंट अवस्थेत राहत असतो. इम्युनिटी कमी झाली आणि सोबत स्ट्रेसही असेल तर रोग (नागिण) उत्पन्न होतो.
हर्पेस झोस्टर विषाणुमुळे
हर्पेस झोस्टर विषाणुमुळे होतो.
असायक्लोवीर औषध अगदी सुरुवातीला वापरले तर गुणकारी आहे.. अर्थात नंतरदेख्हेल आम्ही वापरतोच.
रॅशवर कॅलॅमिन लोशन लावावे.
नागिणीच्या न्युरोपथीसाठी विटॅमिन गोळ्या दीर्घकाळ घ्याव्यात.
महत्वाची कारणे :
स्ट्रेस , डायबेटिस , एच आय व्ही .
चेक करुन घेणे योग्य
मानेपासुन तळहात .... म्हणजे
मानेपासुन तळहात .... म्हणजे मल्टि डर्म्याटोम इन्वॉल्वमेंट आहेत्।थोडे गंभीरच असते. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. प्रयोग करु नका.
फोटॉ टाकु शकाल का ?
काउ, हर्पिस झोस्टर व्हायरस हा
काउ, हर्पिस झोस्टर व्हायरस हा कांजण्यांच्या व्हायरसच्याच टाईपचा असतो ना?
गुगल इमेज सर्चवर herpes
गुगल इमेज सर्चवर herpes zoster लिहुन सर्च करा.. त्या फोटोशी तुमचा आजार कंपेअर करुन बघा.
हो. तो कांजिण्या वेरिसेला चा
हो. तो कांजिण्या वेरिसेला चा जुळा भौ आहे.. पण खरोखर जुळा भौच आहे का तोच माणुस दुसरा वेष घालुन पुन्हा प्रकटतो , हे एक कोडे आहे
माझ्या वडिलांनाही झालेय.
माझ्या वडिलांनाही झालेय. असह्य जळजळ होतेय, अशक्तपणा आलाय.
माझ्या सासुबाईंनी तांब्याच्या भांड्यात दही घेऊन त्यात काव (गेरु) कालवायचा आणि त्याचा लेप लावायला सांगितले. काल रात्री लावले होते. थोडेसे बरे वाटले म्हणाले.
काव (गेरु) चा काय गुणधर्म असावा?
त्वचेला थोडा गारवा मिळतो.
त्वचेला थोडा गारवा मिळतो. वेदना शमतात.
महत्वाची कारणे : स्ट्रेस ,
महत्वाची कारणे :
स्ट्रेस , डायबेटिस , एच आय व्ही .>>>>>
माझ्या वडिलांना डयबेटीस आहे, बायपास १० वर्षांपुर्वी झालिये.
त्यांची गेल्या आठवड्यात कंबर खुप दुखत होती म्हणुन डॉ कडे गेले तेव्हा मांडीवर आलेले रॅश दाखवले तर डॉ म्हणाले ही नागिण आहे आणि याचे जंतू मणक्यात असतात म्हणुन्च तुमची कंबर खुप दुखत होती.
वर्षा, आग आग शांत होण्यासाठी
वर्षा, आग आग शांत होण्यासाठी लेप असेल. आमच्या ओळखीच्यातही एकांना झाली होती नुकतीच. कुठे झाली होती ते माहित नाही. २ वर्षांपुर्वी माटुंग्याच्या शेजार्यांना पोटा/पाठीवर झाली होती तेव्हा ते १ महिना सुट्टी घेऊन बसले होते. कायम उघडंच बसावं लागे त्यांना. ह्या दोघांनाही डायबेटीस किंवा एच.आय.व्ही नाही.
प्रभाताई, घाबरु नका. इथे आल्यावर औषधोपचार चालूच ठेवल्यावर बरं वाटेलच. वेदना कमी होण्यासाठीही शुभेच्छा.
थायरॉइड असल्यासही नागिण होऊ
थायरॉइड असल्यासही नागिण होऊ शकते. प्रतिकारशक्तीशी काहितरी संबंध असावा
प्रभा काळजी घ्या आणी लवकर
प्रभा काळजी घ्या आणी लवकर बर्या व्हा. माझ्या मुलीला उष्णतेने तोन्डात फोड आले होते तेव्हा काव ( गेरु ) साजुक ( घरच्या ) तुपात कालवुन लावायला सान्गीतला होता. त्याने थन्डावा मिळुन उष्णता व फोड कमी होतात.
धन्स काऊ आणि अश्विनी.
धन्स काऊ आणि अश्विनी.
मागे चिकनगुनिया नावाचा एक
मागे चिकनगुनिया नावाचा एक प्रसार झाला होता तोही अशाच लक्षणाचा होता.
खूप वाईट वाटले नवीन देशात जात नाहीतर असे काही अनुभवाला यावे. तुम्हाला लवकर बरे वाटो आणि परत तुमचे जपानमधील भवितव्यला सुखरुप सुरुवात होवो.
>> तो कांजिण्या वेरिसेला चा
>> तो कांजिण्या वेरिसेला चा जुळा भौ आहे.. पण खरोखर जुळा भौच आहे का तोच माणुस दुसरा वेष घालुन पुन्हा प्रकटतो , हे एक कोडे आहे>>
कांजिण्याचा वायरस नर्वस सिस्टिममधे जाऊन डॉर्मंट रहातो आणि पुन्हा अॅक्टिवेट झाल्यास नर्व पाथवेतुन त्वचेवर येतो असे काहीतरी आमचा डॉक सांगत होता. कांजिण्या येऊन गेल्या असतील तर इथे पन्नाशीनंतर शिंगल्ससाठी वॅक्सिन रेकमेंड करतात.
नागिण उष्णतेने होते असे मी पण
नागिण उष्णतेने होते असे मी पण ऐकले आहे. हरळीच्या (हरळच ना? एकदम कोवळे गवत) आणि ओल्या काळ्या मातीच्या लेपाने पण आराम पडतो. याने दुखणं बरं होत नाही तर सतत आग होत असते त्यावर जरा आराम पडतो. काळी माती तुळशीच्या आळ्यातली घ्यायला सांगतात पण मला वाटतं कुठलीही खतं-बितं न मिसळलेली काळी माती चालेल.
इथे अमेरिकेत लस आहे बहुतेक या विकारावर.
जेव्हा लहानपणी कांजिण्या
जेव्हा लहानपणी कांजिण्या होतात. त्याचे जंतू तुमच्या मणक्यात जाउन राह्तात...... ते मॄतवत असतात.......पण तुमची रोगप्रशक्ती कमी झाली किंवा उष्णता वाढ्ली तर ते सक्रिय होतात आणि नागिण होते....... त्यावर गोळ्या मिळ्तात...डॉक्टराना भेटून त्याना विचारून घ्या पूर्ण कोर्स घ्या......आजिबात हायगय करू नका........हा फार चिवट रोग असतो आणि वेळ घेतो बर व्हायला.........दुर्लक्ष केल तर जिवघेणा ठरू शकतो..........दुर्वाचा लेप फोडावर लावा त्याने आग कमी होते
स्वाती२, सुम बरोबर. नागीण हा
स्वाती२, सुम
बरोबर.
नागीण हा जीवघेणा अन अत्यंत गंभीर आजार आहे, असा जनरल समज आहे.
प्रत्यक्षात झोस्टर, उर्फ नागीण हा (मोस्टली) एक अत्यंत साधा आजार आहे. (मोस्टली साधा, कारण वैद्यकात काहीही १००% नसते. आम्ही डॉक्टर लोक कायम 'बहुतेकदा, कधीकधी, क्वचित,' असेच बोलतो, व सत्याला धरायचे, तर असेच बोलू शकतो.)
या पेशंटला लहानपणी कांजिण्या येऊन गेलेल्या असायला हव्या असतात. कंपल्सरी.
या कांजिण्यांचा जंतू 'डॉर्सल रूट गँग्लिऑन' नामक चेतासंस्थेच्या एका भागात 'डॉर्मंट' म्हणजे निद्रिस्त अवस्थेत वर्षानुवर्षे जिवंत राहतो. काही कारणांनी (एड्स, डायबेटीस इ.) तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली, की हा जंतू पुन्हा त्वचेवर पुरळ उत्पन्न करतो.
तर, हा आजार त्वचेचा व त्या त्वचेची संवेदना मेंदूकडे नेणार्या मज्जातंतूंचा(वायरिंगचा ) आहे.
यात नक्कीच असह्य वेदना होतात, सिंपल कारण की मेंदूकडे संवेदना पोहचविणार्या 'वायरिंग'चा फॉल्ट आहे. त्या 'डर्मॅटोम'मधे जितकी त्वचा येते, तिथे पुरळ येते अन दुखते. आगाऽग होते. भरपूर.
पण याची बेसिक ट्रीटमेंट चमडीवाला डाक्टर (स्किन स्पेशालिस्ट) करतो, हे लक्षात घ्या. शरीरावर एक पट्टा असावा अशा भागात येणार्या या भाजल्यासारख्या जखमा भीतीदायक व वेदनादायक असल्या तरी जीवघेण्या नसतात (अपवादः एड्स, यात हा आजार जीवघेणा ठरतो. इन फॅक्ट कोणतेही इन्फेक्शन जीवघेणे ठरते.)
लवकर निदान झाल्यास, काहीच त्रा न होणारा हा आजार आहे. तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य ते अँटीव्हायरस मेडिसीन प्लस वरून लावायचे औषध देतीलच.
याशिवाय, पुळ्या मिटल्यावर जे काळपट व्रण राहतात, त्यांना दररोज आंघोळीनंतर टर्किश टॉवेलने मसाज करणे/ घासणे, हा एक इलाज सांगितला जातो. याने नंतरच्या वेदना बर्याच कमी होतात.
डॉक्टरने सांगितलेल्या स ग ळ्या तपासण्या करून घेणे, इन्क्लूडिंग एड्स.
दुसरा हर्पिस सिंप्लेक्स आहे,
दुसरा हर्पिस सिंप्लेक्स आहे, शिंगल्स. याला आपण 'शीण उभरणे' असे म्हणतो. तो वेगळा विषय आहे. ;()
>>या पेशंटला लहानपणी
>>या पेशंटला लहानपणी कांजिण्या येऊन गेलेल्या असायला हव्या असतात. कंपल्सरी.>> इब्लिस, ज्यांना लहानपणी कांजण्या येऊन गेलेल्या असतात त्यांच्या शरीरात हा जंतू निद्रिस्तावस्थेत असतो आणि प्रतिकारशक्ती कमी होईल त्यावेळी डोकं वर काढतो असंच ना?
हल्ली इथे कांजण्या होऊ नयेत म्हणून वॅक्सिन देतात. अशा मुलांना हा आजार होण्याची शक्यता संभवत नाही का?
सायो, व्हॅक्सिन म्हणजे काय हे
सायो,
व्हॅक्सिन म्हणजे काय हे समजवून घ्या प्लीज.
लशीत, तो आजार उत्पन्न करणारा जंतू आपण आपल्या शरीराला, अर्धवट मेलेल्या, बेसिकली दात काढलेल्या सापाच्या स्वरूपात पेश करीत असतो.
इम्यून सिस्टीम अन पॅथोजेन्सना इम्युनिटी कशी ओळखते, (इम्यूनिटी=पोलिस, अन पॅथोजेन्स्=क्रिमिनल्स अशी कल्पना करून पहा) हा एक लै इंटरेस्टिंग विषय आहे.
तर, त्या पर्टिक्युलर लशीच्या डोसमधला जंतू 'कधीकधी' पुरेसा अर्धमेला नसेल, तर क-दा-चि-त.. त्रास देवू शकतो.
दुसरा मुद्दा,
'शेड्युल्ड' (आपल्या देशातील सरकारने अनिवार्य केलेल्या) व्हॅक्सिनेशनव्यतिरिक्त अधिकचे लसिकरण मुलांना करवू नये. आय मीन गरज नाही. इट्स लाईक बायिंग इन्स्युरन्स.
उदा. 'मेनिंजायटिस' व्हॅक्सिन. किंवा गमतीत लिहायचे तर उद्या शोध लागला तर 'सर्दीवरची' लस. या लसीकरणातून मिळणारी इम्युनिटी (संरक्षक कवच.. /पांशा उग्गं ते शनीपंजर आठवलं ;)// पांशा ) लिमिटेड, अन अनेकदा शंकास्पदही असू शकते.
पहिला मुद्दा- ओके. दुसरा
पहिला मुद्दा- ओके.
दुसरा मुद्दा- सहमत आहे.
इब्लिस, धन्यवाद. >>उदा.
इब्लिस, धन्यवाद.
>>उदा. 'मेनिंजायटिस' व्हॅक्सिन. किंवा गमतीत लिहायचे तर उद्या शोध लागला तर 'सर्दीवरची' लस. या लसीकरणातून मिळणारी इम्युनिटी (संरक्षक कवच.. /पांशा उग्गं ते शनीपंजर आठवलं ;)// पांशा ) लिमिटेड, अन अनेकदा शंकास्पदही असू शकते
>>
इथे ११-१२ वयात मेनिंजायटिसची वॅक्सिनही द्यावी लागते, बुस्टर १६ व्या वर्षी. युनिवर्सिटीत अॅडमिशन घेताना हे वॅक्सिनेशन बघतात.
मेनिंजायटिसची वॅक्सिनही
मेनिंजायटिसची वॅक्सिनही मँडेटरी आहे का? मला वाटत होतं की फ्लु सारखंच आपल्या इच्छेवर आहे. ह्म.
माझ्या लेकाला कॅम्पसवर रहायला
माझ्या लेकाला कॅम्पसवर रहायला जाताना वॅक्सिनेशनचे रेकॉर्ड द्यावे लागले होते. बहुतेक डॉर्म्समधे रहाणार म्हणून लागत असावे.
मला स्वतःला १९९८ मध्ये हा रोग
मला स्वतःला १९९८ मध्ये हा रोग झाला होता.
१. उपाययोजना : लवकरात लवकर स्किन स्पेशालिस्ट्ला दाखवा.
२. डाग घालवण्यासाठी : नागीण आटोक्यात आल्यानंतर पण सगळ्या चेहर्यावर डाग शिल्लक राहिले होते.चेहरा फारच भयानक झाला होता.
सुदैवाने त्यावेळी मी चिपळूणला रहात होतो.तिथल्या वैद्य दीक्षित यांना दाखवले.त्यांनी योग्य ती आयुर्वेदि़क ऑषधे दिली.एका महिन्यातच डाग गायब झाले.
मी इथे (माबोवर) फार कमी असतो.
त्यामुळे ह्या रोगासंदर्भात इतर काही माहिती हवी असेल तर जरूर विचारा. खाली माझा मेल आय.डी. देत आहे.
jayant.phatak@rediff.com
इब्लीस, माहितीसाठी धन्यवाद,
इब्लीस,
माहितीसाठी धन्यवाद,
नागिन वर कडुलिबाचे पान
नागिन वर कडुलिबाचे पान बाधावी, थन्डावा मिळतो, प्र्चन्ड आग असते पुळ्या झाल्यावर पण इब्लिस म्हणतात तस साधासाच आहे जिवघेणा वैगरे नाही!
ह्या माहितीला जोडून मला अजून
ह्या माहितीला जोडून मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे.
माझ्या मुलाला कांजिण्यांची लस ( साधारण वर्षभराचा असताना ? ) दिली होती तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की जर ह्याला कांजिण्या आल्या नाहीत तर आठ-नऊ वर्षांचा असताना हीच लस परत द्या.
असे किती वेळा रिपीट करावे लागते मग ? नैसर्गिकरित्या कांजिण्या आल्यास आयुष्यभराची इम्युनिटी मिळते असे वाचले होते.
Pages