भोरगिरीहून भिमाशंकरला जायला रुळलेली आणि लोकप्रिय वाट आहे. पण आमचा प्लॅन वेगळा होता: भोरगिरीच्या नैऋत्येला डोंगरावर येळवली नावाचं गाव आहे. मागे एकदा खेतोबाला जाताना त्या गावातूनच गेलो होतो. तर यावेळी आधी येळवली गाठायचं, आणि मग कमळजाई मंदिर, आणि मग तिथून भिमाशंकरला जायचं, असा बेत होता. नीट पायवाट आहे. गुप्त भिमाशंकर मार्गे.
पण भोरगिरीला पोचलो तेव्हा कळलं की येळवलीपर्यंत चांगला डांबरी रस्ता झाला आहे. हा अजून तरी (म्हणजे जानेवारी २०२६ मध्ये) Google Maps मध्ये दिसत नाही, पण रस्ता छान तयार झाला आहे. मग डांबरी रस्त्याने कशाला चालायचं? म्हणून ड्रायव्हरला म्हणलं चल पुढं. येळवलीला उतरलो.
भाग ४
रात्री उठून आवरलं तेंव्हा हवेत चांगलाच गारवा होता. कचकून थंडी पडली होती. रात्री १२ वाजता त्या थंडीत कुडकुडत असताना गरमागरम उपमा खायचा अनुभव चांगला उबदार होता.
भाग २
सुर्यास्तानंतर तळ्यावरून परत आलो. जेवणं उरकून लवकरच टेंटमधे गेलो. ४ जणांच्या टेंट मधे ३ बँग्लोरच्या मुलींबरोबर मी होते. लवकर झोप तर लागली पण १२ वाजता टोयलेट टेंटला भेट द्यावी लागली. अर्थात सगळ्या एकत्रच गेल्याने फार त्रासदायक वाटले नाही.
असं म्हणतात की एकदा हिमालय बघितला की त्याची ओढ लागते. मी पिंढारी ट्रेक केला, त्यानंतर दर वर्षी एक ट्रेक करु असं मी आणि नवर्याने ठरवलं खरं पण व्यायामादरम्यान पुन्हा एकदा पाय ट्विस्ट झाला आणि आधीची दुखावलेली लिगामेंट आणखी दुखावली. मग थोडे दिवसांत निर्णय घेऊन मे २०२३ मधे सर्जरी केली. ४-५ महिन्यांत पूर्ण रिकवर झाले. पुढच्या ३-४ महिन्यांत विचार करुन 'देवरियाताल चंद्रशीला' हा निसर्गरम्म, मॉडरेट लेवलचा ट्रेक ठरला. खरं तर चंद्रशीला हा हिमालयन ट्रेक्स मधला इतका कॉमन ट्रेक आहे, की मी त्यावर लिहिलेलं एकही वाक्य नविन नसेल.
हिमालय - पिंडारी - फुकरिया ते झिरो पॉइंट
आज २ जून उजाडला. आता सगळ्यांना परतीचे वेध लागले होते. टेंटची excitement संपून गादीची आठवण यायला लागली होती. पण अजुन धीर धरायला हवा होता. कारण आजचा ट्रेकिंगचा शेवटचा दिवस असला तरी longest distance कव्हर करायचं होतं. जवळपास १९ किमी.

शेवटचा ग्रुप फोटो

हिमालय - पिंडारी - खाती ते द्वाली
आज चौथा दिवस, आम्ही जास्तच उत्साहात होतो करण आज फुकरिया अर्थात बेस कॅम्पला पोचणार होतो. साधारण पाचच किमी चा रस्ता आणि जायला ३-३:३० तास लागणार होते. गरम चहा आणि नाश्ता करून आम्ही फुकरियाच्या दिशेने निघालो. आजचा दिवस आमच्या ट्रेकमधील सर्वात नयनरम्य भागांपैकी एक होता.