आनंदयात्री - नचिकेत जोशी यांचे अभिनंदन...

Submitted by सेनापती... on 13 July, 2012 - 04:57

मायबोलीवरील प्रसिद्ध भटकेश्वर श्री. आनंदयात्री उर्फ नचिकेत जोशी यांना त्यांच्या आनंदयात्रा या ब्लॉगसाठी गिरिमित्र संमेलनाने आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धेत तृतिय पारितोषिक मिळाले आहे.

उत्तेजनार्थ पारितोषिक आपले अजुन एक माबोकर 'हेम' याच्या बॉर्न पीएचडी या ब्लॉगला जाहीर झाले आहे..
परवा म्हणजे १५ जुलै रोजी कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे होणार्‍या सोहळ्यात त्यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात येईल.

मायबोलीकर म्हणुन आपण सर्व आनंदयात्री याचे मनःपुर्वक अभिनंदन करुया...

अवांतर माहिती :

स्पर्धेत प्रथम बक्षिस हे पंकज झारेकर यांच्या ब्लॉगला मिळालेले असुन द्वितिय बक्षिस देवेंद्र चुरी यांच्या दवबिंदु या ब्लॉगला मिळालेले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आया...

शाळेक 'दांड्ये' मारून 'भटकंती' सुचता तुका?... तुझ्या नादाक लागान बाकीची नवी पोरां देखिल दांड्ये मारुक सवांकली... आता तुझ्या कडे(च) 'नीट लक्ष' द्येवचो लागतलो... Proud

अभिनंदन रे...

क्या बात है नचिकेत, मनःपूर्वक अभिनंदन!!
१५ जुलै ला पार्टी आहेच म्हणजे, कुठे आणि किती वाजता जमायचे ते कळवच... Happy

बादवे, तुझ्या सह्यांकनाला ह्यातले बरचसे क्रेडित जाईल, नै का, त्यामुळे तुला मनसोक्त ट्रेकांकन करता आलंय Happy

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

अभिनंदन आनंदयात्री. Happy

पंकज झरेकर याचा ब्लॉग मी पहात असतोच त्याने काढलेल्या नितांतसुंदर फोटोंसाठी. Happy

नच्या... अभिनंदन रे.. Happy

मला ही बातमी कळली तेंव्हा खुप खुप आनंद झाला. खरेतर तुला प्रथम किंवा द्वितिय क्रमांक मिळेल असे वाटले होते पण नेव्हर माईंड. Happy असेच आनंददायी लिखाण करत राहा आणि तुझ्या लिखाणाने आम्हाला आनंदयात्रा घडवत राहा.

... माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबत आहेत. Happy

रच्याकने...
मी पण होतो स्पर्धेत सहभागी. पण मी निघालो अभागी.. मेरेको बक्षिस नही मिल्या. मिळणारही नव्हते हे मला ठावुक होते.. पण माझ्या तिनही दोस्तांना बक्षिस मिळ्या सो मी खुश तो बहोत.... वगैरे... Proud

रच्याकने...
मी पण होतो स्पर्धेत सहभागी. पण मी निघालो अभागी.. मेरेको बक्षिस नही मिल्या. मिळणारही नव्हते हे मला ठावुक होते.. पण माझ्या तिनही दोस्तांना बक्षिस मिळ्या सो मी खुश तो बहोत.... वगैरे...>>>>>>>>>>>>> सेना ३ इडियटस आठव Lol

Pages