दाटते आहे निराशा

दाटते आहे निराशा (तरही)

Submitted by आनंदयात्री on 15 November, 2012 - 01:46

'दाटते आहे निराशा फार हल्ली' या अतिशय सहज तरीही प्रभावी ओळीबद्दल ज्यांची कुणाची असेल त्यांचे अभिनंदन! मला फार आवडली ही ओळ.. माझा हा प्रयत्न
(मूळ गझलेत चिकार शेर आहेत. त्यापैकी निवडक शेर इथे देतोय. संपूर्ण गझल ब्लॉगवर वाचता येईल)

दाटते आहे निराशा फार हल्ली
देत नाही दु:खही आधार हल्ली

बंद काचेमागचे दिसते कुणाला?
लाजही करते खुला व्यभिचार हल्ली

प्रेम, नाती, दु:ख, शपथा, मौन, ओळी
वाटती हे फक्त सोपस्कार हल्ली

मुखवटे ती घालते जुलमी सुखाचे
वेदना जगते तिची लाचार हल्ली

ठेचली जातात स्वप्ने शेकड्यांनी
धावते आयुष्य बेदरकार हल्ली

भेट अपुली हेच औषध फक्त आता

Subscribe to RSS - दाटते आहे निराशा