दाटते आहे निराशा (तरही)

Submitted by आनंदयात्री on 15 November, 2012 - 01:46

'दाटते आहे निराशा फार हल्ली' या अतिशय सहज तरीही प्रभावी ओळीबद्दल ज्यांची कुणाची असेल त्यांचे अभिनंदन! मला फार आवडली ही ओळ.. माझा हा प्रयत्न
(मूळ गझलेत चिकार शेर आहेत. त्यापैकी निवडक शेर इथे देतोय. संपूर्ण गझल ब्लॉगवर वाचता येईल)

दाटते आहे निराशा फार हल्ली
देत नाही दु:खही आधार हल्ली

बंद काचेमागचे दिसते कुणाला?
लाजही करते खुला व्यभिचार हल्ली

प्रेम, नाती, दु:ख, शपथा, मौन, ओळी
वाटती हे फक्त सोपस्कार हल्ली

मुखवटे ती घालते जुलमी सुखाचे
वेदना जगते तिची लाचार हल्ली

ठेचली जातात स्वप्ने शेकड्यांनी
धावते आयुष्य बेदरकार हल्ली

भेट अपुली हेच औषध फक्त आता
(हा नवा जडला मला आजार हल्ली)

सोसण्याची सवय झाली पाहिजे ना?
म्हणुन नाही करत मी तक्रार हल्ली

- नचिकेत जोशी

(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/11/blog-post_15.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुखवटे ती घालते जुलमी सुखाचे
वेदना जगते तिची लाचार हल्ली<< वा , मस्त

ठेचली जातात स्वप्ने शेकड्यांनी
धावते आयुष्य बेदरकार हल्ली<<< आवडला

भेट अपुली हेच औषध फक्त आता
(हा नवा जडला मला आजार हल्ली)<< वा वा

सोसण्याची सवय झाली पाहिजे ना (टायपो असावा)
म्हणुन नाही करत मी तक्रार हल्ली<< हाही शेर मस्त

गझल आवडली

धन्यवाद

शेवटचे चारही शेर सुंदर आहेत. आवडली. पण दुसर्‍या शेराच्या पहील्या ओळीबद्दल शंका आहे, जी दुसर्‍या ओळीमुळे फिटते. (कारण काच बंद असली तरी, रुढार्थाने पारदर्शक असते त्यामुळे तिच्यामागचे दिसते कुणाला हा प्रश्न म्हणून योग्य वाटत नाही. त्या ऐवजी बंद दारामागचे हे ही मीटरमध्ये बसतेच की... चुभूद्याघ्या.) गझल आवडलीच Happy

सोसण्याची सवय झाली पाहिजे ना?
म्हणुन नाही करत मी तक्रार हल्ली

क्या बात है.. मास्तर ! मस्त गझल.

शेर नंबर २, ६ व ७ असे करून पाहिले.....

बंद केलयानेच डोळे...... काय दडते?
लाजही करते खुला व्यभिचार हल्ली!

तूच ज्याचे एकटे आहेस औषध;
मज असा जडला नवा आजार हल्ली!

नोंद जो घेईल ऐसा ना कुणीही.....
त्यामुळे मी करत ना तक्रार हल्ली!

.............प्रा.सतीश देवपूरकर

खूप आवडली गझल.
भेट अपुली हेच औषध फक्त आता
(हा नवा जडला मला आजार हल्ली)

सोसण्याची सवय झाली पाहिजे ना?
म्हणुन नाही करत मी तक्रार हल्ली

खूप सुंदर.

ठेचली जातात स्वप्ने शेकड्यांनी
धावते आयुष्य बेदरकार हल्ली
>>>>>>>>>

शि सा न

छान

भेट अपुली हेच औषध फक्त आता
(हा नवा जडला मला आजार हल्ली) >>> ये ब्ब्बात्त्त्त्त्त्त्त !! एकच नंबर !

सगळेच खयाल आवडले Happy

अवान्तर :खूपदा वाचली आहे ही पोस्ट प्रतिसाद द्यायचे विरसून जातो इतका गुन्तून जातो दरवेळी
आत्ता फक्त प्रतिसादच द्यायचा वाचायची नाही असे ठरवून आलो आहे पण तरी प्रतिसाद देवून झाल्यावर पुन्हा वाचणारच आहे म्हणा!! Happy

मूळ प्रतिसादःजियो !!!!!.........यात्रीजी