बर्फ

निसर्ग शिल्प !

Submitted by सायली मोकाटे-जोग on 21 April, 2024 - 23:32

टेक्सासमध्ये खूप बर्फ पडत नसला तरी ३-४ महिने थंडीचे असतात. त्यामुळे बागेचे काम दरवर्षी वसंत ऋतूत नव्याने करायला घ्यावे लागते. क्वचित हिमवर्षाव असला तरी काही आठवडे थंडीने बाग गारठून जाते. अशा काळात सकाळी लख्ख ऊन पडले की बाहेर एक चक्कर टाकायची निसर्गाची करामत पाहायला. 

एका हिवाळ्यात पाणलिलींच्या मोठ्या टबातल्या पाण्यावर बर्फाची जाडसर ताटली तयार झालेली. त्यामध्ये एक रोपाची रिकामी कुंडी आधी पडलेली असावी.
कुंडीत एक वाळकं पान होतं. त्याभोवती कुंडीच्या आकाराने बर्फ झालेल्या तबकडीचा हा नजारा… 

कोवळ्या उन्हात चमकणारे हे निसर्ग शिल्प !

~

सायली मोकाटे-जोग

गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप ट्रेकची कहाणी - पूर्वार्ध १

Submitted by आशुचँप on 31 January, 2022 - 11:12

उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ

Submitted by लसावि on 21 April, 2014 - 00:41

साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)

कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्‍या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.

विषय: 

विंटर वूड्स २०१३-१४ (अमेरिकेतील हिवाळा)

Submitted by तन्मय शेंडे on 20 February, 2014 - 23:18

अमेरिकेतील हिवाळ्याच्या काही प्रची.

प्रचि १ : स्नो बर्ड - Tufted Titmouse.
Snow_2014_1.jpgप्रचि २ : हिरन्ना .... समझ बूझ बन चरना
Snow_2014_2.jpgप्रचि ३ : white-tailed deer
ही हरणं अगदी माणसाळली आहेत, ७-८ फूट लांब असली तरी पळत नाहीत.
Snow_2014_3.jpgप्रचि ४ : Guards of winter

हिमवर्षाव.!! काश्मीर

Submitted by उदयन.. on 31 January, 2013 - 04:29

काश्मीर ला जाण्याचा योग जुळला होता... जम्मु वरुन काश्मीर ला जाताना वाटेत हिमवर्षाव झाला...
त्याचेच काही फोटो.
.
१) डोंगरावरुन ढग खाली उतरत असताना

२) ढग उतरायला सुरुवात झाली

सियाचीन ग्लेशीयर.....भाग ३

Submitted by रणजित चितळे on 4 January, 2013 - 09:15

ह्या आधीचे...

सियाचीन ग्लेशीयर ...भाग २......

Picture12.jpg
(माझ्या सहका-याने काढलेला फोटो)

ह्या वर्षीचा पहिला बर्फ- माझ्या बाल्कनीतून... (जर्मनी)

Submitted by सानी on 20 December, 2011 - 04:54

दरवर्षी हिमवृष्टी होईल की नाही, हा प्रश्नच असतो. ती नक्की व्हावी, किमान ख्रिसमसच्यावेळी तरी आसमंत शुभ्र असावा, अशी बहुतेकांची इच्छा असतेच. पण ती नेहमीच पूर्ण होते, असं नाही. ह्या बर्फाची एक गंमत म्हणजे, काल पर्यंत मागमूसही नाही आणि सकाळी उठून पहावे, तर निसर्गाने बर्फाचा पांढरा शुभ्र गालिचा अंथरलेला, असाच अनुभव नेहमी येतो. फारच मनोहर दृश्य असते ते!

गुलमोहर: 

निरिक्षणे बर्फाची

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

sP2250111.jpg
वा छान दिसतोय दूरच्या डोंगरांवर बर्फ

sP2250105.jpg
पण हे काय, बर्फ इथेही आहे. आणि सुर्याला काय झालं? अवकाश निरिक्षणांचा बट्याबोळ.

sP2250124.jpg
कोवळा पण डोळ्यांना दिपवणारा सकाळचा सुर्यप्रकाश. आज तरी रात्री निरभ्र असेल आकाश?

(फेब्रु. २००९, पालोमार, कॅलिफोर्नीया)

Subscribe to RSS - बर्फ