साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)
कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
( इतिहास, धर्म, जात यांचा आधार घेऊन होणार्या अपप्रचाराला / विचित्र आंदोलनांच्या आवाहनांना / जुन्या गोष्टींच्या आधारे नवीन जातीय शेगड्या पेटवणार्यांच्या भाषणांना बळी पडणार्या माझ्या बंधूंना ...)
आम्हाला फक्त भडकायचे आहे ...
कोणावर, कशावर हे नक्की नाही ..
नक्की असायची गरज नाही ..
पण कोणावर तरी भडकायचे आहे !
भडकवणारा कोणी असेल
तेव्हढाच आम्हाला प्रिय आहे
भडकण्यातच मौज आहे
भडकण्याची सर्व मजा आहे !
सूड भावना असलीच पाहिजे
जहरी जीभ सुटलीच पाहिजे
कोणालातरी मारण्या-जाळण्याची
फुर-फुरी तर उठलीच पाहिजे
सूड घेता आला तर
जीवनाला अर्थ आहे
चूड लावला नाही तर
जीवन सारे व्यर्थ आहे