निरिक्षणे बर्फाची

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

sP2250111.jpg
वा छान दिसतोय दूरच्या डोंगरांवर बर्फ

sP2250105.jpg
पण हे काय, बर्फ इथेही आहे. आणि सुर्याला काय झालं? अवकाश निरिक्षणांचा बट्याबोळ.

sP2250124.jpg
कोवळा पण डोळ्यांना दिपवणारा सकाळचा सुर्यप्रकाश. आज तरी रात्री निरभ्र असेल आकाश?

(फेब्रु. २००९, पालोमार, कॅलिफोर्नीया)

शीर्षकावरुन मला आधी वाटलं एखाद्या प्रयोगाचीच निरीक्षणे नोंद केलीत का काय.. तापमानानुसार बर्फाचे स्थित्यंतर वगैरे वगैरे.. भीत भीतच आले Proud आणि इथे आल्यावर गोड धक्का! Happy सुंदर फोटो!

सुरेख निरीक्षणे, रच्याकने या थंडीच्या मौसमात दुसर्‍या फोटोतल्या सारखे दृष्य इथे तळेगाव- Floriculture Park रोड वरून जाताना पहायला मिळते.

त्या पांढर्‍या गाडी पाशी उभे राहून ग्लासात गरम टपरीवरला चहा प्यायला मजा येइल किनै. आम्हाला पण लिओनिड शावर नाही दिसले पावसाळी हवे मुळे.

ह्म्म्म. फोटो मस्तच पण मलाही आशूडीसारखेच वाटलेले. पांढराशुभ्र, निळसर पांढरा, हिरवट पांढरा, राखाडी पांढरा असे एकेक नमुने मांडले असतील म्हणुन आशेने आले, अर्थात ती निराशा झाली तरी पहिलाच फोटो पाहुन अगदी थंडगार वाटले.

आम्हाला पण लिओनिड शावर नाही दिसले पावसाळी हवे मुळे.
अखा.. आम्ही १७च्या दुपारी चर्चा केली आणि रात्री विसरुनच गेलो. तसेही आता नव्या मुंबैतही रात्री दिव्यांचा प्रकाश इतका वाढलाय की आकाश नुसतेच काळे दिसते. तारे लोपलेत Sad

पहिला फोटो खूप आवडला. बर्फाच्छादित डोंगरमाथ्यावरची सोनेरी उन्हे किती सुरेख दिसतायत!

वा छान दिसतोय दूरच्या डोंगरांवर बर्फ>>> ह्यापुढे 'दुरुन डोंगर साजरे' असंही चाललं असतं. Wink

चांगलेत फोटो. पण फक्त ३ नच? आशूडीच्या पोस्टला अनुमोदन.

लोकहो, धन्यवाद.

तेंव्हाचेच इतर फोटो येथे आहेतः
http://avyakta.caltech.edu:8080/photo2009/palomar2009Feb_PUB/index.html

@फारेन्डः घुमट जास्तीत जास्त सुर्यप्रकाश परावर्तीत होण्याकरता मुद्दाम पांढरा रंगवण्यात येतो (निरिक्षणांच्या वेळेस घुमटाच्या आतील तापमान हे बाहेरील तापमानाच्या जितक्या जवळ तितके चांगले). त्यावर बर्फ आहे का ते दूपारी तपासतात, आणि शक्य असेल तर त्यावरील एका छोट्या खिडकीतून (खरेतर झडपच ते, पण मोठ्या घुमटाचे झडप सुद्धा खूप मोठे आहे) साफ करण्यात येतो. घुमट गोल फिरवुन शक्य तितका खाली पण पाडल्या जातो. मात्र रात्री बर्फ पडल्यास नंतर बर्फ/पाऊस पडणे थांबले तरी निरिक्षणे बंद (कारण बर्फ वितळुन आरश्यावर पाणि पडु शकते). अपवाद एकचः जर तापमान शुन्य से. च्या खाली गेले तर तो बर्फ वितळत नाही आणि निरिक्षणे शक्य होऊ शकतात.