प्रश्नच प्रश्न

Submitted by पराग र. लोणकर on 1 May, 2020 - 01:47

प्रश्नच प्रश्न

असंख्य प्रश्नांच्या गर्दीत
हरवून बसलोय मी
उत्तरं शोधण्याचा आता
प्रयत्नच सोडलाय मी...

हे असंच का?
ते तसंच का?
कोण कधी असं तसं
अनाकलनीय वागलंच का?

चालता बोलता हसता खेळता
क्षणात अचानक जीवन संपावे
क्षणभंगूर या जगण्यासाठी
दिवसरात्र मग का खपावे?

सुख-दु:खांचा सारा पसारा
सुखसरींचाच वर्षाव जादा
अल्पशा दु:खांची तरीही
दिवसरात्र का व्यापून छाया?

मी मी करता कधी वाटे
क‍ाहीच माझ्या हातात नाही
ही जाणिव झाल्यावर भासे
हा जन्मच मग का व्हावा?

विषाणूच्या या काळभितीने
घरांमध्ये दडून बसावे
काय चुकते, कुठे चुकते
यावर चिंतन करत रहावे..

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults