पैसा

Submitted by mr.pandit on 13 March, 2018 - 09:19

उत्तर कमी प्रश्न फार
सुटणार कसे? याचा भार
ना देव ना नाती ना सोबती
पैसा जीवनी खरा आधार

खिशात पैसा असे सुख भारी
शितांच्या भुतांना येई उभारी
पैसा नसणे दु:ख ही भारी
वाढे खात्यात उपकारांची उधारी

पैसा आनंद घेऊन येतो
गर्वाची सुबत्ता भाळी आणतो
जाताना उदास करुन जातो
स्वाभिमानी धार बोथट करतो

पैसा पाहुणा येतो जातो
अगत्य याचे करा आदराने
प्रामाणिक कष्ट जिथे दिसते
त्या घराशी हा जपतो नाते

-निखिल १३-०३-२०१८

Group content visibility: 
Use group defaults