प्रश्न

Submitted by प्रांजल केळकर on 17 July, 2016 - 05:43

कुठून आलोय कुठे चाललो काहीच काळात नाहीये.
मोठी लोक बोलतात करता धरता तो आपण फक्त बाहुल्या . खरंच अस असत???
उजाड माळरानावर चालताना मध्येच कुठेतरी डेरेदार झाडाची सावली मिळावी अस होत ?
देव मानावा की नाही? काहीच काळात नाहीये काळपाबरोबर चालत राहायच बास. आई बोलली बाप बोलला ते करायच.
बाप बोलला देव आहे मी मानायला लागलो पण अनुभूती कशी येणार???
मला देव दगडात नाही तर मानवात प्राण्यामध्ये दिसतो पण मानवात दानव सुद्धा असतो ?
प्राण्यांच बोलाल तर वाघ आपल्यासाठी देव की दानव????
बऱ्याच वेळ चालतोय पण तो देवाचा वृक्ष काही येत नाहीये अस म्हणतात की तो नक्की भेटणार, पण कधी???
माझा विश्वास अजून तरी मोडला नाहीये पण मोडला तर ?
किती काळ असच ह्या ओसाड माळरानावर चालत राहायच??? माझा अश्वथ्थामा झाला तर ?
किती प्रश्न पण त्याची उत्तर मिळत नाहीत. माउलीकडे गेलो की त्याला समोर बघून मान शांत होत खर पण ती शांती अनंत काळासाठी का राहत नाही?
मला एकानी सांगितलं माऊलीची ज्ञानेश्वरी वाच पण माझे प्रश्न आणि माऊलीच गाईड यायचा मेल बसेल? गाथेच्या शिकवणी आणि माझे प्रश्न यांचा मेळ बसेल?
मनातल्या ह्या अश्या अनंत प्रश्नांची उत्तर कधी मिळणार?? मुळात प्रश्नच का उत्पन्न होतात हाच मला प्रश्न आहे.
मन खूप अशांत आहे का? परत प्रश्न!
खरंच मोक्ष मिळतो म्हणजे काय होत? सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात की प्रश्नच नाहीसे होतात?
प्रश्न काही सुटत नाहीयेत,
परत कुठून आलोय कुठे चाललो काहीच काळात नाहीये.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबाप वाचकहो पाच वर्ष मायबोलीवर फक्त वाचन साधना केलीये आता लेखन साधना करावी म्हणतो. काही चुकल तर चुकी पदरात घ्या धन्यवाद

छानच लिहिलय की.
‘दोर को सुलझा रहा हूँ, और सिरा मिलता नही है’ अशी काहीशी अवस्था.
मला आवडले.