Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 11 May, 2014 - 14:38
एक एक श्वासासाठी
आई धडपडत होती
ऑक्सिजन नळीतून
प्राण खेचीत होती
आणि पोरगा तर्रसा
बार मधून आलेला
लाल डोळे केस पिंजला
दारूमध्ये झिंगलेला
घाईघाईत तिच्या
सुवर्णकर्ण फुलाना
थबकला ना दुखता
ओढून काढतांना
अर्धवट ग्लानीमध्ये
मरणाच्या दारात ती
व्यर्थ प्रतिकार डोळी
ओठी वेदनाच होती
त्या सोन्याची आता
दारूच होणार होती
आईच्या डोळी गोष्ट
स्पष्ट दिसत होती
दुर्बल ती शब्दहीन
हातही हालत नव्हते
परि डोळ्यातील भाव
त्याला सांगत होते
निदान शांतपणे
अरे मरू दे..
मग घे रे ...
काय हवे ते..
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप रे
बाप रे
वाचताना पण त्रास होतो. असं
वाचताना पण त्रास होतो.
असं कुणाच्या बाबतीतही घडू नये.
पण कवितेतील शब्दांत ताकद आहे.
धन्यवाद आशिका ,अदिति..यात
धन्यवाद आशिका ,अदिति..यात मनाचे व काल्पनिक काही नाही .समोर घडलेला प्रसंग मी फक्त शब्दबद्ध केला आहे..जीवन कठोर कधी निर्दयी होते. पण का याला उत्तर नाही .