मायबोली गणेशोत्सव २०२६

गेले करायचे राहून

Submitted by mrsbarve on 25 September, 2026 - 00:51

गेले करायचे राहून ऐवजी गेले करायचे राहून - अजून पर्यंत तरी ! असा काही तरी विषय हवा होता कारण नाहीतर , उगीच म्हातारं झाल्यासारखंच वाटतं .
किंव्हा कुढत बसल्यासारखं वाटतं बुवा. आणि आपल्याला जे ऍक्चुअली हवे असतें ते मिळवण्यासाठी आपण वेळ काढतोच आणि कष्ट घेऊन करतोच.असं मला नेहमी वाटतं .
पण कधी कधी कष्टाची तयारी असून किंवा वेळ देऊन हि एखादी गोष्ट करणे साध्य करणे जमत नाही मी म्हंटले तसे अजून पर्यंत तरी - ते म्हणजे छान गाणं म्हणायला शिकणे!

विषय: 

लेखन उपक्रम : माझा पहिला विमान प्रवास : अमितव

Submitted by अमितव on 25 September, 2026 - 00:07

******लेख बाळबोध आणि मुक्तपीठीय आहे, त्याबद्दल माफ करा ******

विषय: 

गेले करायचे राहुन - अंजली_१२

Submitted by अंजली_१२ on 24 September, 2026 - 16:25

या विषयाने थोडा विचार करायला भाग पाडले.

माझं काय करायचं राहून गेलंय आठवतेय- आणि चक्क काही सुचतच नाहीये..

सगळं जगून बिगून झालं की काय असा एक डिटॅचमेंट मोड वगैरे ऑन झाल्याची शंका यायला लागली.

विषय: 

गेले करायचे राहून - अमितव

Submitted by अमितव on 24 September, 2026 - 13:07

धाग्याचा विषय वाचला आणि मनात काय काय करायचं आहे आणि काय करायचं राहिलं आहे याची यादी सुरू झाली. पण ही बकेट लिस्ट नाही तर काय करायचं राहुनच गेलं अशी यादी आहे हे सारखं मनाला बजावत होतो. पण एखादी गोष्ट/ इच्छा मनात उत्पन्न झाली, आणि ती करायची पार राहुनच गेली असं का म्हणावं? करू की अजुन! इतकं काय वय झालेलं नाही की त्या रस्त्याने अजिबात जाणारच नाही. असं करत करत यादीतील बर्‍याच गोष्टींवर फुल्या मारल्या.

विषय: 

गेले करायचे राहून - सामो

Submitted by सामो on 24 September, 2026 - 11:06

मला सकारात्मक आणि एकदम व्हायव्हॅशिअस आणि गर्विष्ठ , स्वाभिमानी, सुगरण, नवर्‍याची लाडकी, एक चांगली आई वगैरे वगैरे व्हायचे आहे.
त्याकरता मात्र नवीन जन्मच लागणार आहे.
मला तूळ लग्न (स्वाती नक्षत्र) - आमच्या श्रीपादांचे लग्न नक्षत्र.
सिंह रास (मघा नक्षत्र)
आताचाच शुक्र (अनुराधेचा, वृश्चिकेतला) हवा आहे.
आताचेच चंद्र-शुक्र आणि नेपच्युनचा त्रिकोण हवा आहे.
-----------------------------------------------------------------------

विषय: 

लेखन उपक्रम : माझा पहिला विमान प्रवास : सामो

Submitted by सामो on 24 September, 2026 - 10:05

२००३ - मे महीना.
माझा इन्टर्व्ह्यु देउन झालेला होता. रोज सकाळी उठले की धावत जाउन ईमेल चेक करणे - का तर अमेरिकेतून तोवर रिप्लाय आलेला असतो. आणि काहीतरी २५ की २६ मेला उत्तर आले. 'सिलेक्टेड' - अमुक इतका पगार. लवकरात लवकर जॉइन व्हायचे आहे - २८ मे ला
नंतरचे २-३ दिवस प्रचंड धामधुमीचे गेले. प्रोफेशनल कपडे, प्रवासाच्या बॅग्स, डॉलर्स तर होते कारण नवरा जहाजावर जात असे. घरात युरो पासून केन, डॉलर सगळ्या करन्सीजच्या नोटा , नाणी असत.

विषय: 

उपक्रम - गेले करायचे राहुन - रीया

Submitted by रीया on 24 September, 2026 - 06:52

आयुष्यात मला खुप काही करायचं होतं. किल्ली सारखं माझं बीए करणे, टिचर बनणे राहुन गेलं, मामोंसारखी वारी करायची राहुन गेली. अबुवांसारखं आवडत्या गायकाचं कॉन्सर्ट बघायचं राहिलं, माझ्या दत्तक बाबांसारखं पाकॄ स्पर्धेत भाग घ्यायचं राहुन गेलं आहे पण मला त्यात काही फार इंटरेस्ट नाही. आशिका म्हणाली तसं काही व्यक्तींना थँक्स म्हणायचं राहुन गेलं. कविन म्हणते तसं काही गोष्टी काही वळणांवर मी सोडल्या तर काही गोष्टींनी मला सोडलं .
पण यांपैकी कशापेक्षाही जास्त दु:ख माझं एक स्वप्न पुर्ण न झाल्याचं आहे.

विषय: 

लेखन उपक्रम : माझा पहिला विमान प्रवास : मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 24 September, 2026 - 06:34

माझा पहिला विमानप्रवास

माझा पहिला विमान प्रवास हा विषय खूपच भूतकाळातला आहे. तरी पहिला म्हणून अजून लक्षात आहे. विमान काय साधा एष्टीचा प्रवास ही सामान्य नसलेल्या काळातली मी आहे. लाल डब्याच्या प्रवासाच ही अप्रूप वाटे तेव्हा कारण एकंदर प्रवास ही गोष्टच दुर्मिळ होती . ना प्रवासाची साधने होती ना खिशात प्रवासाला लागणारा पैसा होता. आमच्या मागच्या पिढ्या तर कधी कुलदेवतेच्या दर्शनाला म्हणून ही घरा बाहेर पडू शकल्या नाहीत. कोकणातून थेट आंबेजोगाई गाठणं म्हणजे आज परदेशात जाणं सोपं एवढं कठीण होतं .

विषय: 

उपक्रम - माझ्या घरातील महाराष्ट्र - रिदीत गोडबोले - रीया

Submitted by रीया on 24 September, 2026 - 02:55

पाल्याचे नाव - रिदीत गोडबोले
वय - ७ वर्षे

शशक स्पर्धा–शर्मिला.-सपान (रस-अद्भुत/ अलंकार- उत्प्रेक्षा)

Submitted by शर्मिला. on 24 September, 2026 - 02:04

सपान

आपली एक विच्छा हाये... सपान म्हना पाईजेलतर..

मान्साचा जनम उल्टी कडून चालू व्हाया पाईजे..

म्हंजे कसं.. समजा एकांद्याला सत्तर वर्सांचं आयुषं आसंल, तर त्याचा जनम डायरेक्ट सत्तराव्या वर्सी व्हावा.. म्हंजे.. आपलं..ते.. नानबायलॉजीकल!
म्हंजे.. डायरेक्ट म्याचुर-गिचुर होवुनच! आन् मंग ल्हान-ल्हान व्हत जावं..

डायरेक्ट सगंले प्राब्लेम सुटतील..!

तरुनपनी लगिन-बिगिन ईच्चाराने व्हईन.. शिक्शानबी आपल्या मनानं घेता येईन..
खून-आत्महत्या तर व्हनारच नाई मंग.. कारन की बाबा अकल आलरेडी आसन ना..!

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२६