Submitted by शर्मिला. on 24 September, 2026 - 02:04
सपान
आपली एक विच्छा हाये... सपान म्हना पाईजेलतर..
मान्साचा जनम उल्टी कडून चालू व्हाया पाईजे..
म्हंजे कसं.. समजा एकांद्याला सत्तर वर्सांचं आयुषं आसंल, तर त्याचा जनम डायरेक्ट सत्तराव्या वर्सी व्हावा.. म्हंजे.. आपलं..ते.. नानबायलॉजीकल!
म्हंजे.. डायरेक्ट म्याचुर-गिचुर होवुनच! आन् मंग ल्हान-ल्हान व्हत जावं..
डायरेक्ट सगंले प्राब्लेम सुटतील..!
तरुनपनी लगिन-बिगिन ईच्चाराने व्हईन.. शिक्शानबी आपल्या मनानं घेता येईन..
खून-आत्महत्या तर व्हनारच नाई मंग.. कारन की बाबा अकल आलरेडी आसन ना..!
पुडे आनखीन सान झाल्यावं माय-बाप बी निवडता येतीन..आपल्या पसंतीन... कुशीत शिरांले..
हे पोट्ट्याले सांगलं तवा त्यो म्हंतो कसा का, “काऊन ..? माय-बापबी तं आपलं पोरंग निवडूनश्यान घेतीन नं..!”
आपलं का भूत व्हईन मंग..?
********
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला नीट कळली नाही.
मला नीट कळली नाही.
आई वडील लहान असतील आणि पोरच ७० वर्षाचे असेल ना.
आई वडील लहान असतील आणि पोरच
आई वडील लहान असतील आणि पोरच ७० वर्षाचे असेल ना.>> नाही.
सत्तर वर्षांचे लहान लहान होत आईची कुस शोधतील. ..
त्यांचे आई बाप त्यांच्या मागून जन्माला येतील. डायरेक्ट ६०-७० वर्षांचे.... सगळेच नॉन बायोलॉजिकल.
कुल!!! वेगळीच कल्पना. पचनी
कुल!!! वेगळीच कल्पना. पचनी पडत नाहीये
पण लिहीण्याची स्टाइल फार आवडली.
डोक्यातली कल्पना फसली बहुतेक.
डोक्यातली कल्पना फसली बहुतेक.
चलता है! दर वेळेला सिक्सरच
चलता है! दर वेळेला सिक्सरच मारत येत नाही.
छान
छान
The Curious Case of Benjamin Button आठवला