उपक्रम - गेले करायचे राहुन - रीया

Submitted by रीया on 24 September, 2026 - 06:52

आयुष्यात मला खुप काही करायचं होतं. किल्ली सारखं माझं बीए करणे, टिचर बनणे राहुन गेलं, मामोंसारखी वारी करायची राहुन गेली. अबुवांसारखं आवडत्या गायकाचं कॉन्सर्ट बघायचं राहिलं, माझ्या दत्तक बाबांसारखं पाकॄ स्पर्धेत भाग घ्यायचं राहुन गेलं आहे पण मला त्यात काही फार इंटरेस्ट नाही. आशिका म्हणाली तसं काही व्यक्तींना थँक्स म्हणायचं राहुन गेलं. कविन म्हणते तसं काही गोष्टी काही वळणांवर मी सोडल्या तर काही गोष्टींनी मला सोडलं .
पण यांपैकी कशापेक्षाही जास्त दु:ख माझं एक स्वप्न पुर्ण न झाल्याचं आहे.

अनेक वर्षांपासुन जेंव्हा केड्रामा वॉज नॉट ईवन अ थिंग अगदी तेंव्हापासुन माझं एक स्वप्न होतं की मी बाजारात भाजी न्यायला गेले आहे. समोर एक उंचापुरा , जरासा सावळा, हँडसम मुलगा त्याच्या आई आणि बहीणीसोबत भाजी न्यायला आला आहे ( तिघे एक भाजी न्यायला का आले वगैरे प्रश्न विचारु नका. माय स्वप्न, माय कल्पना) .
तिकडुन एक गुंडांची टोळी येते आणि त्याच्या बहिणीची छेड काढते. आईच्या हातातुन बॅग हिसकावुन घेते ( का? नसेल त्यांच्याकडे भाजी. विकत घेण्याऐवजी हिसकावुन घेणं सोप्पं वाटलं असेल त्यांना. मला काय माहीत. मी थोडीच आहे गोष्टीतली गुंड!)
मग तो मुलगा हतबल होऊन गुंडांच्या मागे पळत जातो तेवढ्यात मी माझ्या हातातल्या भाजीच्या पिशवीने गुंडांच्या तोंडावर मारते. ते गाडीवरुन खाली पडतात आणि मग मी त्यांना धु धु धुते. तुम्ही तेलगु सिनेमे पाहिले असतील तर त्यात हिरो जसा गुंडांना धुतो तसाच!

मग तो मुलगा माझ्या प्रेमात पडतो आणि मग आम्ही हॅपीली लिव्ड आफ्टर!

पण कसलं काय! नशिबात अरेंज मॅरेजच होतं. हे स्वप्न स्वप्नच राहिलं. आता मला नव्या नवर्यात इंटरेस्ट नाही आणि आताचा जो आहे त्याने मला असं पब्लिकली मारहाण करताना पाहिलं तर काही इम्प्रेस वगैरे होणार नाही. उलट मलाच दहा गोष्टी ऐकवेल सेफ्टीबद्दल.

तसं ही आता पस्तिशी आल्यावर माझ्यामुळे वाचणारा बॉयफ्रेंड असण्यापेक्षा (सभ्य मार्गाने का होईना ) पण मला वाचवणारा नवरा जास्त हँडसम वाटतो हे ही खरंच म्हणा!

पण किमान मी त्याच्यासाठी नाही तरी त्याने तरी माझ्यासाठी मारामारी करायला हवी हे एकेकाळचे स्वप्न पुर्ण गेले करायचे राहुन!!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol
मी हसतेय कारण मी फुल्ल सीन विज्युअलाईज केला Lol

भारी Lol

तू मारामारी करशील याची खात्री आहे Happy

रिया
आवडलं य स्वप्न
मारामारी करायची असेल तर मला पण बोलव
मला फार आवडेल असं alpha बनून मारामारी करायला
जमेल का नाही ते बघू आपण.
पण नक्की करूया Lol

रीया Lol
किल्ली आणि तू मारामारी करणार असशील तर मी आजूबाजूला सर्कलमध्ये उभी राहून चीअर अप करायला यायचं म्हणत होते.

>>>>>>>>>आणि आताचा जो आहे त्याने मला असं पब्लिकली मारहाण करताना पाहिलं तर काही इम्प्रेस वगैरे होणार नाही. उलट मलाच दहा गोष्टी ऐकवेल सेफ्टीबद्दल.
हाहाहा

किल्ली , कुठल्या चौकात जायचं म्हणतेस ? आपल्या एरियात हँडसम पुरुष मिळणं अवघड आहे पण. ऊगाच मार वाया जायचा आपला.

भारीच आहे स्वप्न/ गेले करायचे राहुन...
मी पण सगळा सीन विज्युअलाईज केला.
तू कधी गटग साठी येणार असल्यास आधी कळवत जा.

ऋतुराज , तू हिरॉईनच्या साईड ने आहेस. तू नको घाबरुस Lol

सगळ्या प्रतिसाद देणार्यांचे आभार. तुम्ही सेफ आहात Lol

कुठला चौक वगैरे ठरवू नंतर
तू फक्त तयार राहा आणि मग मस्त मारूया कुणा गुंडाला आणि पुलिस शेवटी येईल त्याच्या हवाले करूया

किल्ली आणि तू मारामारी करणार असशील तर मी आजूबाजूला सर्कलमध्ये उभी राहून चीअर अप करायला यायचं म्हणत होते.>>>> मी पण आले मी पण आले Lol
त्याने मला असं पब्लिकली मारहाण करताना पाहिलं तर काही इम्प्रेस वगैरे होणार नाही. उलट मलाच दहा गोष्टी ऐकवेल सेफ्टीबद्दल.>>>> Lol घरोघरी मातीच्या चुली Wink