या विषयाने थोडा विचार करायला भाग पाडले.
माझं काय करायचं राहून गेलंय आठवतेय- आणि चक्क काही सुचतच नाहीये..
सगळं जगून बिगून झालं की काय असा एक डिटॅचमेंट मोड वगैरे ऑन झाल्याची शंका यायला लागली.
तसं म्हटले तर सगळ्यांप्रमाणे बादली यादी नक्कीच आहे - सोलो ट्रीप, गिटार शिकणे, स्विमिंग, डान्स, स्पॅनिश भाषा फाडफाड बोलता यावी (ईथे अमेरिकेत कोणी फाडफाड स्पॅनिश बोलायला शिका अशा जाहिरातच करत नाही...नो मोटीव्हेशन यु नो)
की तसं फक्त इंग्लिशच बोलता येतं देव जाणे असो ताडताड गुजराथी पण बोलायला शिकायचं आहे..
तर मुद्दा हा आहे की मी जरा आरंभशूर टाईप्स असल्याने वरच्या सगळ्याच्या एक ना धड भाराभर चिंध्या केलेल्या आहेत पण तेच बहुतेक माझं रोजचं जगणं आहे. आला दिवस काढणे, फार मोठे प्लॅन्स नाहीत, काही राहून गेल्याची टोचणी नाही.
समोर मांडलेल्या जेवणाच्या बफेट सारखं ... बरंच काही दिसतंय, काही ट्राय करायचं आहे, जे आवडलंय ते अजून परत चाखायचंय!
त्यातल्या त्यात डान्स मधे जरा जास्त आवड निर्माण झाल्याने गेली १० वर्ष बॉलिवूड स्टाईल शिकत कुठे कुठे स्टेज परफॉर्मन्स करत, कुठे लेझिमचा वर्कशॉपच घे, कुठे ढोल वाजव, कधी गरबा शिकायला जा अशी नाचाची आणि वादनाची हौस भागवून घेत आहे.
स्विमिंग शिकण्याचा एक प्रयत्न करून झाला आहे पण अजून म्हणावी तशी भिती गेली नाहीये, सोलो ट्रिप्सचं म्हणाल तर अगदी मोठे मोठे युरोप, हायकिंग टाईप्स प्लॅन्स नाहीयेत पण जिथे जमेल तिथे एकटीनेच आवडीच्या ठिकाणी खायला जाणे, कॉन्सर्ट, नाटकं, सिनेमे एकटीने पाहणे, मुलीला कॉलेजला सोडायच्या बहाण्याने लाँग ड्राईव्ह करणे या लहान सहान गोष्टी करते. मग मोठ्या ट्रिप्स न केल्याचं काही वाटत नाही.
गिटार चं आकर्षण होतं एकेकाळी की एखादी मुलगी गिटार वाजवते हे किती कुल आहे, जेव्हा संधी मिळाली तेव्हा क्लास वगैरे लावला, पण नाही जमलं, बोटं दुखायची, स्ट्रेस येऊन भलत्याच तारा डिवचल्या जायच्या!
मग कंटाळून नाद सोडून दिला.. पण अजूनही वाटतं थोडा पेशन्स ठेवून वेळ काढून तेवढं एक शिकावं.
स्पॅनिश ड्युओलिंगो अॅप वर शिकायला सुरू केलं पण खंड पडला, या लेखाच्या निमित्ताने परत आठवण झाली.
ते हल्लीच्या रील्स मधे दाखवतात तसं - इथे फिरले -चेक, हा पॉईंट बघितला - चेक, इथे फोटो काढला - चेक असं आयुष्य जगता येत नाही कदाचित मला.
काही गोष्टी अर्धवट आहेत, काही अधूनमधून सुरू आहेत, काही पुन्हा सुरू होतील आणि काही कदाचित कायमच्या तिथेच संपल्यात.
त्यामुळे गेले करायचे राहून या प्रश्नाचं माझ्याकडे ठोस काहीच उत्तर नाही.
>>>>>गेली १० वर्ष बॉलिवूड
>>>>>गेली १० वर्ष बॉलिवूड स्टाईल शिकत कुठे कुठे स्टेज परफॉर्मन्स करत, कुठे लेझिमचा वर्कशॉपच घे, कुठे ढोल वाजव, कधी गरबा शिकायला जा अशी नाचाची आणि वादनाची हौस भागवून घेत आहे.
वॉव!!
छान लिहीलेले आहे.
धन्यवाद सामो!
धन्यवाद सामो!
अंजली आवडलं.
अंजली आवडलं.
आवडलं.
आवडलं.
आवडलं.
आवडलं.
छान लिहिलंयस अंजली.
छान लिहिलंयस अंजली.
)
डान्सची आवड फक्त आवड न ठेवता प्रत्यक्षात आणल्याबद्दल विशेष कौतुक. मला डान्स जमणार्या लोकांबद्दल प्रचंड आदर आहे.
>>पण जिथे जमेल तिथे एकटीनेच आवडीच्या ठिकाणी खायला जाणे, कॉन्सर्ट, नाटकं, सिनेमे एकटीने पाहणे,
मला बोलाव पुढच्या वेळेस. (मी-टायमात घुसणे कधीतरी चालत असले तर
मस्त!
मस्त!
>>> फार मोठे प्लॅन्स नाहीत, काही राहून गेल्याची टोचणी नाही... समोर मांडलेल्या जेवणाच्या बफेट सारखं
हे बेस्ट आहे!
>>> एखादी मुलगी गिटार वाजवते हे किती कुल आहे
म्हणजे रावसाहेबांच्या लेडी सितारिष्टसारखं लेडी गिटारिष्ट व्हायचं होतं तुला.
वर्षा.. नक्कीच ! आपलं जमतंय
वर्षा.. नक्कीच ! आपलं जमतंय माहित आहे त्यामुळे वेलकम!!
लेडी गिटारिष्ट >>>> हाहा येस्स!
धन्यवाद मंडळी!
लेडी गिटारिस्ट
लेडी गिटारिस्ट
छान लिहिलंय Clear
छान लिहिलंय
Clear
मस्त. आवडल.
मस्त. आवडल.
वाचताना हसत होते.
तुमच्यासारखं(?) थोडी झलक किंवा एकेकदा करून बघितलेल्या गोष्टी आठवल्या. शाळेनंतर , नावाचा क्लास सुटल्यावर परत going back to dance - गणपती च्या निमित्ताने , Zumba, जिम, टेबल टेनिस, पेंटिंग, गार्डनिंग पण सगळ्याची एकेक फेज.
पण एकट नाटक, सिनेमा किंवा कुठेही जाणं यासारखं दुसरं स्वातंत्र्य नाही - कंपनी शोधत बसायला नको, नवऱ्याला/ घरातल्यांना गळ घालायला नको.. किंवा नंतर रिटर्न म्हणून त्यांच्याबरोबर आपल्याला n आवडणाऱ्या कार्यक्रमाला जायला नको.
अजून बरंच काही explore करायला शुभेच्छा!