गेले करायचे राहून - सामो

Submitted by सामो on 24 September, 2026 - 11:06

मला सकारात्मक आणि एकदम व्हायव्हॅशिअस आणि गर्विष्ठ , स्वाभिमानी, सुगरण, नवर्‍याची लाडकी, एक चांगली आई वगैरे वगैरे व्हायचे आहे.
त्याकरता मात्र नवीन जन्मच लागणार आहे.
मला तूळ लग्न (स्वाती नक्षत्र) - आमच्या श्रीपादांचे लग्न नक्षत्र.
सिंह रास (मघा नक्षत्र)
आताचाच शुक्र (अनुराधेचा, वृश्चिकेतला) हवा आहे.
आताचेच चंद्र-शुक्र आणि नेपच्युनचा त्रिकोण हवा आहे.
-----------------------------------------------------------------------
तर मी होणारे - एकदम सगळ्यात पॉप्युलर, खूप चार्मिंग, हसरी आणि सकारात्मक स्त्री (होय स्त्रीच व्हायचय पुढील जन्मी.) मैत्रिणींमधे पॉप्युलर असणार आहे.
मला आताचेच अ‍ॅनॅलिटीकल स्किल्स हवे आहेत. आताच्या स्किल्सवरती मी समाधानी आहे.
मला प्रेमविवाह करायचा आहे पण आत्ताच्या नवर्‍याशीच. आणि तो ही नीट कुंडलीत, कंपॅटिबल सिनॅस्ट्री असलेले चार्टस घेउन. म्हणजे आताचा त्याचा सिंह शुक्र आणि माझा वृश्चिक शुक्र कसे वेगवेगळे आहेत तसे नको. आमच्याकडे सिंह नखे काढतो आणि विंचू नांगी मारतो - असे जे होते ते टाळण्याकरता.
मला मेक अप शिकून एकदम सुंदर दिसायचे आहे. आत्ता मला काजळ आणि थोडे लिप्स्टिक व गालावरती थोडी लाली यापलिकडे गती नाही. तसे नको. मला फाउंडेशन, सेटर, बी बी क्रीम वगैरे काय काय असते ते सारे शिकायचे आहे. डोळे मोठे हवेत जेणेकरुन नीट मेक अप करता येइल. पापण्या लांबसडक हव्या आहेत.
मला कंटेंट क्रिएटर बनायला आवडेल. लोकांना हसवायचे आहे. एकंदर खूप चांगल्या व्हाईब्ज आणि उर्जेची व्यक्ती व्हायचे आहे. हे सारे झाले भौतिक प्रतलावरचे.
अध्यात्मिक प्रतलावरती, मला गोकर्ण महाबळेश्वरला जायचे आहे. मला मराठी आईच्याच पोटी जन्म घायचा आहे. मराठी शिकायचे आहे. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांत एम ए केले तर फारच मस्त. खूप शिकायचे आहे. खू-प!! त्याला पर्याय नाही.
मला बिंबो नाही बनायचे तर इन्टेलेक्च्युअल, सुसंस्कृत आणि खूप स्मार्ट स्त्री बनायचे आहे. जिला खूप मैत्रिणी असतील. Happy
---------------------------------------------
वेल!! यातील एखाद दुसरी गोष्ट आहे माझ्याकडे पण पॅकेज नाही तर असे पॅकेज हवे आहे. मी चित्रगुप्ताशी निगोशिएट करेन त्याकरता. Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नॅचरल सुंदर असून किती हुषार आहेस.घेतलेल्या शिक्षणाच्या पलीकडले कित्येक सुरेख लिखण आहे.

तरीही तुझ्या सर्व इच्छा फलद्रुप होवोत.

<<< मला कंटेंट क्रिएटर बनायला आवडेल. >> हे कश्याला राहून गेले किंवा पुढचा जन्म हवा... आध्यात्म विषयात होऊन जाऊ दे Happy

ऋन्मेष Happy करायला हवे.
.
प्रघा धन्यवाद. वृश्चिकेचा शुक्र लाडका आहे माझा. म्हणुनच म्हटले माझा बदलायचा नाहीये. नवर्‍याचा बदलायचाय. त्याचा मंगळ वृश्चिकेत (अनुराधा) पाठवायचाय. सध्याचा त्याचा सिंहेचा शुक्र फार फार सुरेख आहे. लॉयल, प्रिन्सिपल्ड, ग्लॅमरस, व्हायवॅशिअस, बिग-बिग-हार्टेड आहे. फक्त आमचा 'स्क्वेअर आस्पेक्ट' आहे. त्यामुळे तो उत्तरेला आणि मी पूर्वेला बघत असतो.

तुझं लेखन वाचून तू हुशार, आध्यात्मिक आवड असलेली आणि संवेदनशील व्यक्ती आहे हे कळतेच..
फोटो पाहून तू सुंदर आहे हे देखील माहित आहे ..
तुझ्या इच्छा पूर्ण होवोत. त्यासाठी खूप शुभेच्छा..!

सर्वांचे आभार.
--------
रुपाली सुंदर कसली डोंबल्याची . मी सुद्धा प्लेन जेन - गर्ल नेक्स्ट डोअर आहे.
पण हां या माझ्या काही इच्छा आहेत. ज्या या धाग्यात मांडलेल्या आहेत.
थँक्स फॉर युअर काईंड वर्डस.