मायबोली गणेशोत्सव २०२६

पाककृती स्पर्धा क्रमांक ३ : पेय - फळ + फूल + मसाला : जयु : जश्न - ए - बहार

Submitted by जयु on 23 September, 2026 - 13:41

मायबोलीकर रसिकहो नमस्कार.
सादर आहे : चवींचा त्रिवेणी संगम :- पेय - फळ + फूल + मसाला : जश्न - ए - बहार.
सादरकर्ते : जयु

विषय: 

लेखन स्पर्धा - पाककृती लेखन + पाककृती स्पर्धा क्रमांक ३ - जयु - जश्न -ए- बहार - एकपात्री प्रयोग

Submitted by जयु on 23 September, 2026 - 13:28

मायबोलीकर रसिकहो नमस्कार.
सादर आहे एकपात्री प्रयोग : चवींचा त्रिवेणी संगम :- पेय - फळ + फूल + मसाला : जश्न - ए - बहार.
सादरकर्ते : जयु

पाककृती स्पर्धा क्रमांक ३- चवींचा त्रिवेणी संगम- Pink Lady & Blue Gentleman - कविन

Submitted by कविन on 23 September, 2026 - 09:36

Pink Lady & Blue Gentleman च का? कारण दुसरं नाव सुचलं नाही, नाव जुने असले तरी non alcoholic हे नाविन्य आहे म्हणता येईल Proud . तसं काही वेगळही नाही रेसिपीत पण प्रत्येक ठिकाणी वेगळच कशाला हवय? वेगळं हवं, वेगळं हवं म्हणणाऱ्या पालकांनी ठेवलेली नावे आणि बारशाचे मीम काय कमी फिरतायत आजकाल? त्यात अजून कशाला ती भर म्हणून राहूदेत हेच नाव.

विषय: 

शशक स्पर्धा - चीकू - स्फूर्ती

Submitted by चीकू on 23 September, 2026 - 07:56

'या वर्षी तरी शशक स्पर्धेत बक्षीस मिळायला हवं. पण काही सुचत नाहीये.' ती वैतागाने म्हणाली.

'अगं सुचेल काहीतरी नक्की. मी काही मदत करू का?' पत्नीला प्रत्येक बाबतीत शंभर टक्के साथ देणाऱ्या तिच्या प्रेमळ कर्तव्यदक्ष नवऱ्याने विचारले.

'इतका वेळ विचार करतेय. मला रस आणि अलंकार हवेत. त्याशिवाय काही नाही जमणार.'

'हात्तिच्या! एवढंच ना? आधीच सांगायचंस की!' प्रेमळ नवऱ्याने लगेच आत जाऊन ग्लासभरून ऑरेंज ज्यूस आणून तिच्यापुढे ठेवला. आणि एका मखमली पेटीतला मोत्यांचा सर तिच्या गळ्याभोवती प्रेमाने घातला.

विषय: 

लेखन उपक्रम :- माझा पहिला विमान प्रवास, अतरंगी

Submitted by अतरंगी on 23 September, 2026 - 07:27

Present Day...

आपला पहिला विमान प्रवास यावर लिहावे की नाही, हा मला गहन प्रश्न पडलाय, कारण त्याला आता पंचवीस वर्षे झाली. अनेक डिटेल्स आठवत नाहीत. तपशिलात चुका रहायची शक्यता आहे, काही आठवणी धूसर आहेत. तरीही म्हणले लिहावेच, माबो कर आपलेच आहेत. काही चुकले असेल तर सांगतीलच आपुलकीने....

तर Flash back

सकाळी सकाळी फोन वाजल्यावर सोळा वर्षाच्या मी ने धावत जाउन फोन उचलून हैलो म्हणल्यावर, हैलो वगैरे न म्हणता गजा काका तिकडून फोन वर गरजला "मन्या, बाबाला फोन दे"

" बाबा बाहेर गेलेत."

विषय: 

शशक स्पर्धा . अनन्त्_यात्री. - "ज़िन्दगी इक सफर.."

Submitted by अनन्त्_यात्री on 23 September, 2026 - 07:18

"आयडे, परवा आपण दोघी रस्ता क्रॉस करताना ते गाणं म्हणत होतीस ना "जिंदगी इक सफर है सुहाना".. त्याची दुसरी ओळ सारखी सारखी विसरतेय मी. ए सांग ना मला. "

"बाबाला विचारलं तर इतक्या भसाड्या आवाजात म्हणेल की मी हसेन आणि तो चिडून माझा गालगुच्चा घेईल. "

" ए आयडे सांग ना मला"

" आणि आई, ही दिवाळीची पणती दुपारीच का लावून ठेवलीय? गणपतीत कोण दिवाळी करतं का?"

" ए आयडे, काही बोलतच का नायैस तू? आयडे.... तू आपली सारखी त्या पणती समोरच्या फोटोकडेच बघतीयेस."

"एवढं कायै त्यात...?"

" अगं ...हा फोटो.. तर..
मा..
..झा?"

विषय: 

गेले करायचे राहून- कविन

Submitted by कविन on 23 September, 2026 - 05:48

आपण ५ नंबर प्लॅटफॉर्मवर वेळेत जावं, पण नेमकी शेवटच्या क्षणी अनाऊन्समेंट व्हावी आणि काही ॲक्षन घ्यायच्या आत आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर ३ वरुन निघून जावी.
तशा असतात काही गोष्टी... ठरवतो करायचय करायचय म्हणून, पण नाही जमत करायला काही ना काही कारणांनी.

शशक स्पर्धा - मॅगी - अहम् अहम् अस्मि (भयानक, अपन्हुती)

Submitted by मॅगी on 22 September, 2026 - 05:24

डोळे उघडले. कालच्या सक्सेस पार्टीमुळे दोघेही अस्ताव्यस्त झोपलो होतो. सरकून तिच्या गळ्यात हात टाकले. माझ्याकडे पहाताच ती किंचाळली. "कोण आहेस तू? "

मी तुझा नवरा, बिझनेस पार्टनर हे पुनःपुन्हा सांगितले. तरीही "नाही. तू दुसराच कोणी आहेस."

थोड्या वेळाने पोलिस आले. माझे id चेक केले, तिला समजावले. तरीही नाहीच. रात्री तिच्या हातात सुरी दिसली. कसेबसे तिला बेडरूममध्ये ढकलून लॉक केले.

विषय: 

पाककृती स्पर्धा क्रमांक १ - जिन्नस एक पदार्थ अनेक - मूगडाळीचा महिमा - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 22 September, 2026 - 04:11

मूगडाळीचा महिमा

मुगडाळ पौष्टिक आणि पचायला सोपी असली तरी चणाडाळी एवढी ती लोकप्रिय नाहीये. तरी ही मुगडाळ वापरून सौम्य चवीची तरी ही स्वादिष्ट अशी थाळी तयार केली आहे.

१) शेपूची भाजी : भिजवलेली मुगडाळ , कांदा , हिरवी मिरची आणि जिरं घालून .

२) काकडीच्या कोशिंबिरीत भिजवलेली मुगडाळ घातली आहे. नारळाचा चव, लिंबू आणि फोडणी गार करून घातली. डाळ अजिबात कच्ची लागत नाही. अशी पडवळाची ही छान लागते. नक्की करून बघा.

३) आम्ही रोजच तूर, मूग मसूर मिक्स डाळीचं वरण करतो आज फक्त मूग डाळीचं. टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता थोडी लसूण फोडणीत घातली. आणि गोडा मसाला घातला आहे.

विषय: 

शशक स्पर्धा - चीकू - बिग बॉस

Submitted by चीकू on 21 September, 2026 - 18:51

नोकरीचा पहिला दिवस. तो उत्साहाने बॅज स्वाईप करून आत आला. सगळीकडे शुकशुकाट. तो गोंधळला. दिवस बरोबर होता. आज सुट्टीही नव्हती. सांगितलेल्या वेळीच आला होता. बॅजही चालत होता.

अचानक एक महिला सिक्युरिटी ऑफिसर त्याच्या दिशेने येताना दिसली.

'बाहेर निघा!' तिने फर्मान सोडले.

'अहो नोकरीचा पहिला दिवस. बॅज बघा, बॉसना बोलवा.'

'कोणीच नाहीये इथे!'

'म्हणजे? गेलेत कुठे सगळे?'

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२६