माझा पहिला विमानप्रवास
माझ पहिला विमान प्रवास हा विषय लयच भूतकाळातला आहे. तरी पहिला म्हणून अजून लक्षात आहे. विमान काय साधा एष्टीचा प्रवास ही सामान्य नसलेल्या काळातली मी आहे. लाल डब्याच्या प्रवासाच ही अप्रूप वाटे तेव्हा कारण एकंदरच प्रवास तसा दुर्मिळच होता. ना प्रवासाची साधने होती ना खिशात प्रवासाला लागणारा पैसा होता. आमच्या मागच्या पिढ्या कधी कुलदेवतेच्या दर्शनाला ही बाहेर पडल्या नाहीत. कोकणातून थेट आंबेजोगाई गाठणं म्हणजे आज परदेशात जाणं सोपं एवढं कठीण होतं .
आमच्या वेळी नवीन लग्न झालेली हौशी लोकं हनिमूनला विमानाने बंगलोरला जात असत. पण आम्ही बंगलोर वगैरेला न जाता कोकणातच गेल्याने तिथे ही यष्टी शिवाय पर्यायच नव्हता. अर्थात त्या बद्दल तेव्हा काही वाटत ही नव्हतं. कारण हे सगळं आपल्यासाठी नाहीच ही मनाची ठाम समजून होती.
पण नंतर एकदा मला विमानाने जाण्याला पर्यायच नव्हता. मला लग्नाला जायचं होतं नातेवाईकांच्या मुलीच्या. घरातली जबाबदारी आणि ऑफिस दोन्हीचा विचार करता ट्रेन ने जाऊन घराबाहेर जास्त दिवस राहणं शक्य नव्हतं म्हणून विमानाचा पर्याय निवडला. ऑफिसच्या एजंटने आणून दिलेलं ते चेक बुक सारखं तिकीट हातात घेताना एकदम थ्रिल्ड वाटलं पण त्याच वेळी मी एकटीच जाते आहे, फॅमिली बरोबर नाही म्हणून थोडं गिल्टी ही वाटलं.
माझ्या प्रत्येक विमान प्रवासाच्या वेळी अपूर्वाई माझ्या मनात अखंड वाजत असते. विमान प्रवासाचा अनुभव घेतलेल्या ( ते तसे हाताच्या बोटावर मोजण्याऐवढेच होते. ) आणि न घेतलेल्या ही परिचितांनी जेव्हा मला सल्ले दिले तेव्हा तर ते जरा जास्तच रिलेट झालं. लग्नाच्या साड्या वगैरे व्यवस्थित पॅक करून बॅग भरली आणि आयत्या वेळी " बॅगेला खुणेसाठी एखादी रिबीन बांधच " हा सल्ला इतक्या ठामपणे आला की तो डावलणे अशक्य होते. पण घरात रिबीन पटकन सापडली नाही. म्हणून ऑड वाटलं तरी त्याकाळी घरोघरी हमखास असणारा पुडीचा दोराच थोडा जाड करून हॅण्डल ला बांधून टाकला.
मला एकटीला कुठे ही जायची सवय असली तरी विमानतळावरच झगमग वातावरण आणि सगळ नीट साधेल ना ही मनातली शंका ह्यामुळे प्रवासा ची थोडी उत्सुकता आणि थोडा ताण ह्यामुळे मी इतक्या लवकर पोचले विमानतळावर की तेव्हा काउंटर सुरू ही झाला नव्हता. पण नंतर वाटलं होतं त्यापेक्षा सगळ बरंच सुरळीत झालं सगळ आणि आपण उगाच टेन्शन घेतलं ह्या विचारात स्वतःलाच बक्षीस म्हणून विमानतळावरची महाग कॉफी घेतली आणि विमानाची वाट बघत बसले. मोबाईल नसताना आपण वेळ कसा घालवत होतो हा प्रश्न हल्ली मला नेहमीच पडतो . बरं विमानतळावर स्टँड सारखं " खंय , कित्या " करत शेजारच्या बाईशी गप्पा मारण्याची ही सोय नाही. त्यामुळे बहुत करून मी आजूबाजूचं निरीक्षणच करत बसले असावे.
आमच्या विमानाची अनाउन्समेंट झाली आणि बसने आम्ही विमानापर्यंत पोचलो. विमानाची शिडी चढताना टीव्हीवर अनेकदा बघितल्यामुळे मी पण कोणीतरी vip आहे असं वाटत होतं.
विमानाची खिडकीची सीट गैरसोयीची असते हे तेव्हा माहित नसल्याने बस ट्रेन प्रमाणे मुद्दाम मागून घेतलेल्या खिडकीच्या सीटवर बसले आणि हुश्श केलं. विमान सुरू झालं, खिडकीतून मुंबईचा नजारा बघताना खूप मजा वाटली. अर्थात फॅमिलीला मिस ही करत होतेच.
थोड्याच वेळात तो प्रसिद्ध गोळ्या आणि गार नॅपकिन असलेला ट्रे हवाई सुंदरीने माझ्या पुढ्यात धरला. हल्ली असे नॅपकिन कॉस्ट कटिंग मुळे फक्त बिझनेस क्लास मध्येच देतात. ह्या एवढ्या गोड चेहऱ्याच्या मुलीच्या हातून आपण काय सेवा करून घ्यायची हे माझ्या मनातले विचार बहुदा तिला कळले असावेत , म्हणून तिने पुन्हा एकदा गोड आवाजात घ्या म्हटले. मी तो उचलला खरा पण त्याचे नक्की काय करायचे आहे हे लक्षात न आल्याने पुन्हा पु. ल. आठवले आणि बाकीचे काय करतायत ते बघितलं.
बाकी प्रत्यक्ष प्रवास तसा छोटाच होता. विमानात दिलेलं फ्री जेवण आणि कॉफी घेईपर्यंत आणि जरा खिडकीतून ढग वगैरे बघेपर्यंत प्रवास संपून आमच विमान टेकलं ही जमिनीला. हत्ती गेला होता आणि आता शेपूट तेवढं राहीलं होतं. पट्ट्यावरून बॅग घेतली की मी बाहेर असा विचार करत आले त्या पट्ट्याजवळ आणि बॅग यायची वाट पाहत बसले.
बराच वेळ बॅग आली नाही म्हणून मी थोडी काळजीतच होते तेवढ्यात माझ्या बॅगेसारखी बॅग घेऊन एक माणूस जाताना दिसला म्हणून नीट पाहिलं तर बॅगेला बांधलेली दोऱ्याची खूण ही दिसली. मी धावत धावत त्या माणसाजवळ गेले आणि त्याला ही माझी बॅग असल्याचं सांगितलं. त्याने ही दोरा बघितला आणि ओशाळून चार वेळा सॉरी म्हणत बॅग माझ्या हातात दिली. त्या दोऱ्याने त्या दिवशी मला चांगलच वाचवलं होतं. बॅग बदलली गेली असती तर दुसऱ्याच दिवशी असलेल्या लग्नात माझी किती पंचाईत झाली असती हा विचार भयानक वाटला.
त्यानंतर ऑफिसच्या कामासाठी, ऑफिसच्या एलएफसी कृपेने एकटीने, फॅमिलीबरोबर असे अनेक प्रवास झाले पण हा पहिला म्हणून लक्षात आहे. त्या दोऱ्याशी प्रामाणिक राहण्यासाठी आज ही माझ्या बॅगेला पुडीचा दोराच बांधलेला असतो आणि लाल पिवळ्या रिबिनींच्या इंद्रधनुष्यात माझी बॅग अगदी यासम हीच अशी सहज ओळखता येते.
हेमा वेलणकर
वाह! ममो मस्त लिहीलेय
वाह! ममो मस्त लिहीलेय
धन्यवाद कविन ह्या पहिल्या
धन्यवाद कविन ह्या पहिल्या प्रतिसादाबद्दल
मस्त आठवण पहिल्या विमान
मस्त आठवण पहिल्या विमान प्रवासाची
ये धागा पक्का है!! मस्त ममो
ये धागा पक्का है!! मस्त ममो ताई
ये धागा पक्का है!! मस्त ममो
ये धागा पक्का है!! मस्त ममो ताई
अरे वा मस्त की
अरे वा मस्त की
अरे मस्तच!!
अरे मस्तच!!
पहिले दोन paragraph तर अगदी मनातलेच.
धन्यवाद आशिका, भ्रमर ,किल्ली
धन्यवाद आशिका, भ्रमर ,किल्ली आणि शर्मिला..
पहिले दोन प्यारे >> शर्मिला, तेव्हा हिच परिस्थिती होती सगळीकडे
ये धागा पक्का है!! >:हहगलो: हो ना !
भारी आठवणी ममो!
भारी आठवणी ममो!
माझ्याही बॅगला कायम धागा असतो
रीया तू पण l दोरावाली !
रीया तू पण दोरावाली !
सुरेख लिहिलं आहे.
सुरेख लिहिलं आहे.
मस्त!
मस्त!
- अशी माहिती मागच्या पिढीकडून मला मिळालेली.
<< आमच्या वेळी नवीन लग्न झालेली हौशी लोकं हनिमूनला विमानाने बंगलोरला जात असत >>> आणि बरेचदा त्यात जाताना किंवा येताना असे एके वेळचाच विमान प्रवास असे
एवढे दिवस या विषयावर फार कोणी लिहित नव्हते पण आज अचानक दणादण सारे विमान प्रवासाचे धागे कसे एकत्र उडायला लागले
>>>>>त्या दोऱ्याशी प्रामाणिक
>>>>>त्या दोऱ्याशी प्रामाणिक राहण्यासाठी आज ही माझ्या बॅगेला पुडीचा दोराच बांधलेला असतो आणि लाल पिवळ्या रिबिनींच्या इंद्रधनुष्यात माझी बॅग अगदी यासम हीच अशी सहज ओळखता येते.
मस्त आहे हे वाक्य. डाऊन टु अर्थ
लेख खूप आवडला.
पहिल्या विमान प्रवासाची मस्त
पहिल्या विमान प्रवासाची मस्त आठवण
सुरेख लेख...
छान लेख..!
प्रत्येक स्पर्धा आणि उपक्रमात हिरीरीने भाग घेता तुम्ही..
तुमच्या उत्साहाला मनापासून सलाम..!
मस्त
रिबिनी .. आईबाबांचां कटाक्ष असतो, भडक रिबीन बांधायचा.
आणि मी म्हणते.. नाव असत ना टॅग वर. खात्री करायला. त्याची ठाणं झाली.
मस्त ते तीन चार पानांचे
मस्त
ते तीन चार पानांचे अगम्य गिचमिड वाटणारे बुकलेट टाइप तिकीट आठवते. विमानतळावर गेल्यावर नक्की काय प्रोसेस असे काही कळत नव्हते. सुरूवातीला ग्रूपनेच गेल्यामुळे आपोआप इतर करतील तसे करत गेलो, हे ही आठवते.
भारीच लिहिलंय.
भारीच लिहिलंय.
पुडीचा दोरा...अजूनही आमच्याकडे ठेवतात.
दोरा एक उपयोग अनेक...पण हा उपयोग आज कळला
छान लिहिलंय ममो
छान लिहिलंय ममो


आमच्याकडे पण रिबिनी बांधा प्रकार असतो. मी आता सगळ्या रिबीन कापून टाकल्या आहेत. बॅगा नाही सापडल्या तरी चालेल, काय त्या रंगबिरंगी रिबिनी लावायच्या! सो मिडलक्लास!
गेल्यावेळी बॅग पट्ट्यावरून दोनदा फिरल्यावर ती आपली आहे हे मला समजलं. पण काय हरकत आहे थोडं थांबायला!
क्युट लिहिलय गं!
क्युट लिहिलय गं!
सो मिडलक्लास!>> That's me!!!
सो मिडलक्लास!>> That's me!!!
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
@एवढे दिवस या विषयावर फार कोणी लिहित नव्हते पण आज अचानक दणादण सारे विमान प्रवासाचे धागे कसे एकत्र उडायला लागले Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 24 September, 2026
May be.. "गेले करायचे राहून" मध्ये भर नको असेल.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
आणि बरेचदा त्यात जाताना किंवा येताना असे एके वेळचाच विमान प्रवास असे >> बरोबर , एकदाच विमान भाडं ही भारी पडत असे खिशाला.
प्रत्येक स्पर्धा आणि उपक्रमात हिरीरीने भाग घेता तुम्ही..
तुमच्या उत्साहाला मनापासून सलाम..! >> थँक्यु रुपाली.. सगळ्यात जमतं असं नाही पण जास्तीत जास्त प्रयत्न तोच असतो.
नाव असत ना टॅग वर. खात्री करायला. >> नाव असत टॅगवर पण त्या आधीच कोणी माझी उचलली होती तशी उचलली तर.. लांबून आपली बॅग ओळखण्यासाठी काही तरी खूण असलेली बरी असते. आम्हा सिनियर सिटीझन ना लागते रिबीन बॅगेला.
बरं, तिथे कोण कोणाची बॅग घेतय ह्यावर कोणाची ही सुपर व्हिजन नसते . सगळा भोंगळा कारभार असतो.
सो मिडलक्लास! Lol >> हाहाहा , होय आहोतच आम्ही नुसते मध्यम वर्गीय नाही तर मराठी माध्यम वर्गीय.
आमच्याकडे पण आला का आईचा दोरा , कशाला लागतो तुला दोरा वगैरे चालू असतं. तिकीटाची हार्ड कॉपी घ्यायला पण विरोध असतो त्यांचा.
दोरा एक उपयोग अनेक...पण हा उपयोग आज कळला >> हाहाहा.. हल्ली वाण्याच्या पुडीला येत नाही, फक्त इस्त्री च्या कपड्यांचा मिळतो, त्यामुळे पुरवून वापरावा लागतो.
May be.. "गेले करायचे राहून" मध्ये भर नको असेल. Happy मृण्मयी, मस्तच.