समाज

ऑलिंपिकोत्सव

Submitted by पराग१२२६३ on 13 July, 2021 - 15:32

जगभर 2020 मध्ये पसरलेल्या आणि अजूनही चिंताजनक स्थिती असलेल्या ‘कोव्हीड-19’ महासाथीच्या पार्श्वभूमीवर अखेर 2021 मध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोक्यो ऑलिंपिक स्पर्धा होत आहेत. या महासाथीमुळे वर्षभर लांबलेल्या या स्पर्धांच्या आयोजनाबाबत अगदी महिन्याभरापूर्वीपर्यंत अनिश्चितता होती. हो-नाही-हो-नाही या वादावर अखेर पडदा पडला आहे.

भारतात सामाजिक, सरकारी आणि राजकीय पातळीवर ऑलिंपिकबाबत निराशाजनक वातावरण असूनही गेल्या पाच-सहा ऑलिंपिकमध्ये खासगी क्रीडा प्रशिक्षण संस्थामध्ये घडलेल्या आणि पदके जिंकणाऱ्या भारताच्या ऑलिंपिकपटूंचा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्यांपेक्षा जास्त अभिमान वाटत आहे.

विठ्ठल वारकरी......

Submitted by ASHOK BHEKE on 27 June, 2021 - 11:28

*महेशदादा थोरात...* या गृहस्थाला त्याच्याच हितचिंतकाने बाजारातून एक किलो दु:ख दिले. अर्धांगिनी सविताची पूर्ण ताकीद, काहीपण घरी आणायचं नाही. त्यामुळे गडी विवंचनेत होता. पण पिशवी घेऊन रस्त्याने येताना एकेक हितचिंतक, मित्र भेटत गेला आणि पिशवीतून काही अंश तो मुठ भरून घेऊन गेला. घरी जाईपर्यंत त्याची पिशवी रिकामी झाली होती. तुला कशाला त्रास.... म्हणत सहकारी मित्र त्याच्याकडचा दु;खाचा प्याला ते रिचवितात , आणि सुखाचा प्याला मात्र त्याच्या वाट्याला देतात. ही त्या स्वामी नुनियानंद यांची किमया...! असे अनेक मित्र आहेत. दुसऱ्यांची दु:ख वाटून घेतात. सुखात सहभागी होतात.

विषय: 

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे नाव का देण्यात यावे?

Submitted by उरणकर on 26 June, 2021 - 02:52

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन करुन लेखाची सुरुवात करत आहे...

कधी ,कधी सरतील ह्या भयानक विषाणूचे दिवस चार?

Submitted by kavyarshi_16 on 24 June, 2021 - 05:23

कधी ,कधी सरतील ह्या भयानक विषाणूचे दिवस चार?
भगवंता तुझ्या ह्या लेकरांना शक्तीची गरज आहे फार

आता या आभासी(virtual) दुनियेचा आला आहे कंटाळा
पोरंही विचारू लागली आहेत कोणती असती ती शाळा?

हा विषाणू जणू कली आहे या विचारात वेळ चाललाय व्यर्थ
भगवंता तुझ्या कल्की अवताराचे चे दाखव बरं सामर्थ्य

इतके तर कळाले धन,दौलत ,पद, पैसा निष्फळ आहे सर्व
त्यामुळेच तर उमगले माणसातला,धवल, खाकीतला देव

हे भगवंता,कित्येकांनी श्वास सोडला, कित्येकांचा घास पळाला
त्यामुळेच त्यांच्या जीवलगांचा रडून रडून डोळ्यांचा ही बांध फुटला

इरॉटिका, कि पॉर्न ?

Submitted by स्वेन on 9 June, 2021 - 04:23

इरॉटिका आणि पॉर्न यांच्यात फरक काय असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर फार कठीण आहे असे नाही. पॉर्न (अश्लील) साहित्य, गाणी, प्रतिमा किंवा चित्रपट म्हणजे स्त्री आणि पुरूष यांच्या शारीरिक जवळीकीचा संपूर्ण देखावा. स्त्री आणि पुरुषाच्या समागमाचे मादी आणि नरात झालेल्या संभोगाचे हीन रूपांतर, ज्यात आपल्या जोडीदाराबद्दल वाटणारी आपुलकी, प्रेम, भावना किंवा अगदी खोलवर वाटणारी काळजी याचा संपूर्ण अभाव असून केवळ प्राणीजन्य मैथुनाचा तो एक भाग होऊन जातो. यात भाग घेणारे सर्व स्त्री पुरूष एका विवक्षित क्षणी अपमानित केले जातात, खास करून स्त्री पात्राला तर अगदी नेहमी तसे केले जाते.

शब्दखुणा: 

जियो पारसी

Submitted by स्वेन on 28 May, 2021 - 10:42

गेल्या वर्षी आणि या वर्षी कोविड -१९ च्या उद्रेकादरम्यान एक नाव टीव्ही, वर्तमानपत्रे आणि  इतर माध्यमामध्ये सातत्याने घेतले जात होते,  आणि तेही भारताच्या अगदीच नगण्य अल्पसंख्याक समुदायातील असलेल्या व्यक्तीचे. ते म्हणजे पारसी समाजातील अदार पूनावाला यांचे.

निर्वासितांना सांधणारे भाषांचे पूल

Submitted by ललिता-प्रीति on 3 May, 2021 - 01:35
निर्वासित आणि परकीय भाषा

‘मी पहिला तुर्की शब्द शिकलो तो म्हणजे ‘सू’... घशाला कोरड पडली होती, प्यायला पाणी हवं होतं... अरबी भाषेत पेय या अर्थी शराब असं म्हणतो आम्ही... पण तो शब्द ऐकून त्या तुर्की माणसाने दारू आणून दिली... मी खाणाखुणा करून कसंबसं शेवटी तुर्की भाषेतलं सू म्हणजे पाणी मिळवलं’...

शब्दखुणा: 

कोरोना,निवडणूक आयोग, आणि न्यायालय।

Submitted by ashokkabade67@g... on 27 April, 2021 - 03:22

कोरानान भारतात आपले रौद्ररुप दाखवत अनेकांचे बळी घेतले ,तर आरोग्य सेवेलाच आक्सिजनवर नेऊन ठेवले कुठे आँक्सिजन नाही तर कुठे बेडच शिल्लक नाही तर ईंजक्षणची अभावी ईंजेक्षणचाच काळाबाजार सुरु आहे दररोज रूग्णांची संख्या वाढत आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप करत आहेत तर विरोधीपक्ष राजकारण करीत आहे, देशातील जनता मात्र वाऱ्यावर दैवाधिन आहे.

"लोक"down

Submitted by गणक on 15 April, 2021 - 12:27

"लोक"down

मंत्री संत्री बिजनेसवाले कुणाला फरक नाय
पण जे "लोक"झाले त्यांनी करायचं काय...
कुणी कुणी चमचमीत अन्न रोज पोटभर खाय
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...

पडली बंद रोजनदारी नाही हाताला काम
मरण यातना उपवासाने कधी मिळेल हो दाम
पोट आहे हातावर ज्यांचे त्यांचा सवाल हाय...
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...

हायवेवरती गर्दी कसली मजुरांची ही लाट
शहर आता ते पडले मागे धरली गावाची वाट
कधी आपल्या घरी पोहचू चालून थकले पाय...
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...

हरवलेल्या प्रेमाचा गाव.

Submitted by मन मानस on 12 April, 2021 - 06:49

शब्द दाराजवळी येऊनि वाट विसरले काही ।
हरवलेल्या शब्दांचा तो गाव दूरच राही ।
गावामध्ये सगळे होते सोडूनि शब्द काही ।
त्या गावाची खासियत त्या गावाच्या लोकांमध्येच येई ।
सुख दुःख होते सोबती शेजारीच घर त्यांचे ।
मध्ये येऊनि वसली नियती दोघांवर हुकूम जिचे ।
जय पराजय एकामागे एक वसले होते ।
गर्वाचे घर आडवे येता घर पराजयाचे भासे मोठे ।
आपले सगळे सोबती आनंदाने नांदती ।
अहंकार शिरता मध्ये मी आणि ते आपल्यातून वेगळे होती ।
माया मोह यांचे घर गावात उठून दिसे ।
आपुलकी मात्र त्या घरासमोरी तळ ठोकून बसे ।

Pages

Subscribe to RSS - समाज