ग्राहक राजा, जागा हो

Submitted by उपाशी बोका on 7 December, 2022 - 00:49

सध्या दिवसेंदिवस ग्राहकाची गळचेपी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची थोडक्यात माहिती देण्यासाठी हा प्रपंच.

१. किंमती स्पष्ट आणि सुलभ पद्धतीने दाखवल्या जात नाहीत, खूप फसवाफसवी केली जाते. हे प्रकार विशेषतः ऑनलाईन खरेदीत जास्त दिसतात. शिपिंगला किती पैसे लागतील ते मुद्दाम सांगितले जात नाही वगैरे.
२. कुठलीही वस्तू किंवा सुविधा मालकी तत्त्वावर विकण्याऐवजी, भाड्याने विकली जाते. उदा. बरीचशी ई-पुस्तके. किण्डलवरील, तुम्ही विकत घेतलेली पुस्तके अ‍ॅमेझॉन त्यांच्या मर्जीनुसार उडवू शकते.
३. फक्त एकदाच माल विकण्याऐवजी subscription model ग्राहकाच्या गळ्यात मारले जाते. बर्‍याचदा हा प्रकार नकळत केला जातो.
४. हे subscription model ग्राहकाला सहजपणे रद्द करता येऊ नये, म्हणून त्याला जास्तीत जास्त त्रास दिला जातो. उदा. न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्र.
५. ग्राहकाने विकत घेतलेली वस्तू त्याला स्वतःला किंवा इतरांकडून दुरुस्त करता येऊ नये म्हणून Right-to-repair ला विरोध केला जातो. उदा. अ‍ॅपल, जॉन डिअर (ट्रॅक्टर कंपनी)
६. Dark patterns वापरले जातात. उदा. अकाउंट सहजासहजी बंद करता येत नाही.
७. वस्तू विकत घेण्यापूर्वी तुलना करता येऊ नये म्हणून एकच प्रॉडक्ट वेगवेगळ्या नावाने विकले जातात किंवा छापील किमतीपेक्षा कमी किमतीत विकायला रिटेलर्सना बंदी केली जाते. बर्‍याच लक्झरी प्रॉडक्टसाठी हा प्रकार केला जातो.
८. खूपश्या टेक कंपन्यांनी, व्यक्तीबरोबर प्रत्यक्ष बोलून सपोर्ट देण्याचा मार्ग बंद केला आहे. फक्त ईमेलवरच उत्तर मिळते. खूप त्रास झाला तर ग्राहकाला सोशल मिडियाचा आधार घ्यावा लागतो आणि आरडाओरडा करून कंपनी मदत करेल याची वाट बघावी लागते.
९. बहुतेक सगळीकडे लवाद (arbitration)चाच पर्याय असतो, कंपनीला कोर्टात खेचता येत नाही.
१०. कंपन्या मात्र कुठलेही कारण न देता तुमचे अकाउंट बंद किंवा पूर्णपणे रद्द करू शकतात आणि त्याबद्दल कुणाकडेही दाद मागण्याचा पर्याय ग्राहकाला उपलब्ध नसतो. गूगल, अ‍ॅपल, फेसबुक, ई-बे, पेपाल (PayPal), स्ट्राईप (Stripe पेमेंट गेटवे), अ‍ॅमॅझॉन आणि अशा अनेक कंपन्यांनी हे उद्योग केले आहेत आणि अजूनही करतात.
११. आता काही कंपन्या ग्राहकांना "स्कोअर" देतात. जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळते, नाही तर चांगली सर्व्हिस मिळत नाही उदा. तुम्हाला फोनवर मुद्दाम जास्त वेळ होल्डवर ठेवले जाते वगैरे.
१२. स्वतःच्या मर्जीने नियम बनवू शकतात आणि ग्राहकाला पटत नसूनही गरजेस्तव ते मान्य करावे लागतात. उदा. एक कंपनी आता भाडेकरूंना प्रत्यक्ष किल्ली देत नाही, फक्त मोबाईल अ‍ॅप वापरूनच प्रवेश मिळेल अशी जबरदस्ती करते. काही ठिकाणी Bio-metric (हाताचे ठसे, डोळे, Face recognition) इ. माहिती वापरावी लागते.

त्यामुळे कुठल्याही कंपनी बरोबर व्यवहार करताना वरील गोष्टींचा विचार नक्की करा. तुमचे असे काही अनुभव असतील तर इतरांच्या माहितीसाठी जरूर लिहा. धन्यवाद.

चित्रसौजन्यः Creative Commons License Attribution-NonCommercial (CC BY-NC 2.0)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धाग्याबद्दल धन्यवाद. क्र (२) मुद्दा. स्टीव जॉबची ॲपल पुढे येण्याचं कारण म्यूझिकवाल्यांची गाणी कॉपी होऊ नये म्हणून आइफोनमध्ये ( आइट्यूनस )केलेली व्यवस्था. ही एक नवीन विक्री पद्धत ज्यामध्ये ग्राहकाने विकत घेतलेली वस्तू कशी वापरायची हे विक्रेताच ठरवतो.

किंडलमध्ये डाउनलोड फाईल दिसत नाही. तर पाठवणार कशी.

DRM काढणे अ ति श य सोपे आहे. पण व्यक्तिशः मी DRM असणारे प्रॉडक्ट विकतच घेत नाही. non-DRM विकत घेतो, नाही तर वापरत नाही. (DRM हा वेगळा विषय आहे.)

मला टी. व्ही. चँनल व एफ. एम. वरील जाहिरातींच्या अतिरेका बद्दल सांगायचे आहे.
काही मराठी टी. व्ही चँनल तर आता नियमितपणे त्यांच्या सिरियल मध्येच छुप्या जाहिराती दाखवून वैताग आणतात. शिवाय त्यांच्या जुन्या सिरियल मधले भाग वारंवार दा़खवून भंडावून सोडतात.
एक बरे झाले की त्यामुळे माझा टी. व्ही. चा वापर आता बराच मर्यादित झाला आहे व त्यामुळे पैसेही वाचतात.

अगदी योग्य मुद्दे आहेत .
१)वातावरण निर्मिती ह्या मध्ये भीती दाखवणे हा प्रकार असतो.
सूर्यप्रकाश पासून कॅन्सर होतो अशा बातम्या आणि नंतर sun screen बाजारात.
२) किंमत कमी ऑनलाईन शॉपिंग मध्ये सुरवातीला खरेच किंमत कमी होती
अशी लालाच दाखवून सवय लावणे.
आणि नंतर फक्त लूट करणे हा प्रकार मोठ मोठ्या कंपन्या सर्रास करत आहेत.
मीडिया पैसे देवून manage होते.
किंवा मीडिया ह्यांच्याच मालकीची असते.
त्या मुळे असे सर्रास दरोडो खोरी च्या प्रकार. ची प्रसिध्दी होत नाहीं

MRP हा प्रकार लोकांना कोणी समजून सांगत नाहीत.
माझ्या माहिती नुसार एमआरपी.
म्हणजे जास्तीतजास्त किंमत.
त्या पुढे ती वस्तू विकायची नसते.
MRP मध्ये च सर्व घटकांचे कमिशन असते अगदी भरपूर.
एमआरपी आणि वस्तू ची खरी किमंत ह्या मध्ये ४० ते ५० टक्के चा फरक असतो अशी मला शंका आहे.
Production करणाऱ्या कंपनीची विक्री किंमत सोडून.
मी हे खात्री नी बोलू शकतो कारण तसे एक उदाहरण माझ्याकडे आहे.
जे मी स्वतः अनुभवले आहे

आम्ही 'बोट' चे इअरफोन्स घेतले. थोडे दिवस छान चालले. मग एका कानाने ऐकायला येणं बंद झालं Happy सुरुवातीला एका कानाने ऐकता ऐकता अचानक दुसऱ्या कानानेही ऐकू यायला लागून दचकायला व्हायचं Proud कस्टमर केअरला फोन केला. त्यांनी 'रिसेट' करायला सांगितले. त्याप्रमाणे केले, पण काही उपयोग नाही. मग आम्ही 'घेऊन जा आणि दुरुस्त करून आणून द्या' हा पर्याय निवडला. त्यानुसार त्यांनी ते नेले. पण 'व्यवस्थित चालू आहे' असा शेरा मारून परत आणून दिले. प्रत्यक्षात मात्र एकाच कानाने ऐकू येतंय अजूनही. परत तक्रार नोंदवली तर म्हणाले की आता सर्व्हिस सेंटरला तुम्हीच आणून द्या. ते सेंटर काही जवळ नाही. तिकडे जायला वेळ होत नाहीये आणि हे काम तसंच बाजूला पडलं आहे.
वॉरंटी पिरियड एक वर्ष आहे. घेऊन सहा महिनेच झालेत.

Product त्याच कंपनीचे देत नाहीत.
Redmi चा head फोन मी मागवला होता
तो कोणत्या तरी उत्तर प्रदेश मधील मागास भागातून येणार होता.
ते बघून ऑर्डर कॅन्सल केली आणि दुकानात जावून घेतला.
पैसे पण कमी गेले आणि warranty suddha.
आणि दुकानदार पण ओळखीचा.
Amazon हे धंदे करते.
फ्लिपकार्ट विषयी न बोलणेच उत्तम

>>उदा. बरीचशी ई-पुस्तके. किण्डलवरील, तुम्ही विकत घेतलेली पुस्तके अ‍ॅमेझॉन त्यांच्या मर्जीनुसार उडवू शकते.>> हे माहित नव्हते. म्हणजे किंडलवर खरेदी केलेली पुस्तके आपल्या मालकीची नसतात का?

एकाच वस्तूची दुकानाच्या साईटवर ऑनलाईन खरेदी, दुकानात पिकअप असे केल्यास वेगळी किंमत आणि तिच वस्तू डायरेक्ट दुकानात खरेदी केल्यास वेगळी किंमत असेही बघितले. असे का विचारले असता ऑनलाईन स्पेशल ऑफर असे उत्तर मिळाले.

खरं आहे. पण दुसरी बाजू बघितल्याने ज्या नफ्याच्या मार्जिनवर प्रॉडक्ट विकले जाते त्यात विक्री पश्चात सपोर्ट इ. परवडणे अशक्य असते. श्रिक्फ्लेशन, अगम्य वजनाच्या वस्तू विकणे ३६१ गॅमचा बिस्किटचा पुडा आता ३३२ ग्रॅमचा होणे यात काही फसवणूक नसते. ग्राहकाला किंमत न वाढवता खूष ठेवुन प्रॉफिट मार्जिन सांभळून इन्वेस्टरना खूष ठेवावे लागतेच.
सहज काहीच रद्द करता येऊ नये यातही काही फसवणूक नाही हातचलाखी आहे.
भाड्याने विकण्यात ही किंमत कमी ठेवणे हेच तत्त्व आहे. विकत दिलं तर चारपट किंमत वाढेल, तो ऑप्शन असतोच. कोणी निवडत नाही.
अर्थात नफ्याचं मार्जिन कमी म्हणून सपोर्ट कमी समजू शकतो ... पण वस्तू चालत नसेल तर बदलुन देणे, पैसे परत देणे हे मात्र तत्त्परतेने केलेच पाहिजे.

तुम्ही का तक्रार करत आहात. सध्या जी सिस्टीम आहे तिला आपली संमती आहे. हे आपण दर ४/५ वर्षांनी दाखवून देत आहोत. जेव्हा आपण फसतो तेव्हाच आपण आरडा ओरड करतो. बिचारा बरणी
संडर्स. आपण काय म्हणतो? तो वेडा आहे. खर आहे ना ?

ब्लू टूथ इअरफोन्स, हेडफोन्स मध्ये फार अपेक्षा ठेवायच्या नसतात. का? याविषयी लेख सापडतील. मग आपण इअरफोन्स का घेतो? कमी जागा आणि प्रवासात सोय. हेडफोन्स मोठ्या बॅगेतच ठेवता येतात. ओडिओतील काही भाग गाळला जाणे यांचे कारण 2.5 giga h frequency. Dual 2.5 +5 giga चे कमी असतात.
बाकी लेखात शेवटचे वाक्य फोन्स रिपेर होत नाहीत, अपग्रेड करा .(नवीन घ्या!)

वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी किंमत, लॉयल कस्टमरला जास्त डिस्काऊंट यात फसवणूक नाही.
कन्झ्युमर प्रॉडकट्स मध्ये ह्युज डिस्काउंट नसतोच.
इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट्स मध्ये ४०% डिस्काउंट फार कॉमन आहे.
वार्षीक उलाढाल अथवा सिंगल ऑर्डर वॅल्यू मोठी असेल तर ८०% पर्यंत डिस्काउंट आणि एक्स्टेंडेड वारंटी, तक्रार केल्यावर किती तासात ती अटेंड होईल याची कमिटमेंट असते.
याचा अर्थ ज्याला ४०% पेक्षा कमी डिस्काउंट त्याची फसवणूक होतेय असा नाही.

इथे मुद्दा आपल्याला कितीला पडणार यात सष्टता नसते, नंतर अमुक फी, तमुक फी, अमुक चार्ज करत शेवटी असा मुद्दाम जाळ्यात ओढतात त्याचा आहे असे मला वाटते.

काही मोजक्याच कंपन्या सोडल्या तर service आफ्टर सेल चे आऊटसोर्सिंग केलेले असते .
त्या. उप कंपन्यांना ग्राहक टिकावे किंवा टिकू नयेत ह्याच्या शी काही देणे घेणे नसते.
Service आफ्टर सेल अगदी मोजक्याच कंपन्यांची चांगली आहे
त्या मध्ये सिमेन्स हे नाव घेण्यासारखे आहे .
लिफ्ट मध्ये . ओटीस हे नाव घेण्यासारखे आहे.
बाकी खूप कंपन्या फक्त फसवणूक करतात.

srd, ब्लू टूथ ज्या रेंज (अंतरांत) चालतं, आणि जी बँडविड्थ अपेक्षित आहे, आणि फ्रिक्वेंसी हॉपिंग इतकी रोबस्ट टेक आहे की २.४जी वर चालण्यात काहीही अडचण नाही. ते चालत नाही याचं कारण २.४जी वि. ५जी जे वायफायला आहे तसं अजिबात नाही.
माझ्या माहिती प्रमाणे ब्लूटूथ २.४जी मध्येच चालते. ५जी स्टँडर्ड ब्लूटूथला नाही. पण ब्लूटूथवर काम करुन काळ लोटला त्यामुळे बदल झाला असेल तर माहित नाही. ब्लूटूथ मध्ये ५/ ५.१ दिसते ती फ्रीक्वेंसी नाही तो ब्लूटूथ स्टँडर्डचा नंबर आहे.

एक काळ असा होता कि जेव्हा सिगारेट मल्टीनॅॅशनल्स सिगारेट ही कशी आरोग्य वर्धक आहे ह्याच्या जाहिराती करत होत्या (1950-१९६०). त्या मानाने तुमचे किस्से कीस झाड की पत्ती. वाचा
https://www.healthcare-administration-degree.net/10-evil-vintage-cigaret...