विहंगम देवराई - १

Submitted by हरिहर. on 10 August, 2019 - 00:55

अंधश्रध्दा ही केंव्हाही वाईटच. या बद्दल कुणाचेच दुमत नाही. पण गेले काही वर्ष मी एका अंधश्रध्देची गोड फळे चाखतो आहे. मीच काय आमची सगळी सोसायटी या अंधश्रध्देमुळे खुष आहे.

पुणे जसजसे वाढत गेले तसतसे बिल्डरलोकांचे उपनगरांकडे जास्त लक्ष जावू लागले. अनेक शेतकऱ्यांनी आपली जमिन विविध बिल्डर्सला देऊ केली. आमच्याही जागेच्या मालकाने स्वतःची बरीच जमिन बिल्डरला डेव्हलप करण्यासाठी दिली. पण ही जमिन देताना जमिनमालकाने परंपरेने चालत आलेल्या श्रध्देला मात्र दुर लोटले नाही. या शेतकऱ्याच्या सलग काही एकरमधे पसरलेल्या शेताच्या मधोमध अगदी जुनी असलेली आंबा, लिंब, पिंपळ या सारख्या मोठ्या झाडांचे एक बेट आहे. त्यात कडेवर असलेल्या एका प्रशस्त लिंबाच्या झाडाखाली चिऱ्याचे बांधकाम केलेली छोटेखानी विहिर आहे. या विहिरीच्या शेजारीच गोल गरगरीत दगडाला शेंदूरलेपन केलेली एक देवता आहे. नाव असेच काहीतरी अगम्य आणि कुणाला शिवी देण्यासाठी वापरावे असेच आहे. या देवाच्या तिनही बाजुने आकर्षक आणि चमकदार टाईल्सने सजवलेल्या तिन-साडेतिन फुट उंचीच्या तिन भिंती आहेत. वरती छप्पर नाहीच. ते काम वृध्द लिंबाचा फांद्या आणि पानांचा संभार पार पाडतो. देवासमोर अगदी छोटीशी पितळी घंटा आहे. तिही झाडाच्याच एका आडव्या फांदीला देवासमोर येईल अशी टांगलेली आहे. समोर चांगला पन्नास फुट बाय चाळीस फुटांचा शहाबादी फरशीचा प्रशस्त आणि बसका ओटा आहे. हा देव येथे एकटाच बसलेला नाही. त्याच्या सोबत कुणाच्या तरी घरची भंगलेली लक्ष्मी आणि न लाभलेला एक गणपती देखील आहे. वृध्दाश्रमात किंवा अनाथालयात सोडावे तसे कुणीतरी त्यांना येथे आणून सोडलेले आहे. या गणपती व लक्ष्मीच्या मुर्तींवर असलेले डाग त्यांनी भोगलेले हळदी-कुंकवाचे, पंचामृत-नैवेद्याच्या सोहळ्यांची ग्वाही देतात. आता मात्र त्यांच्या इंचभर नैवेद्याची जबाबदारी न सांगताच आमच्या सोसायटीतील काही लोकांनी घेतली आहे. लिंबाच्या झाडाखाली गणपती व लक्ष्मीच्या जोडीने नांदणारा हा तेजस्वी शेंदरी देव आजुबाजूच्या शेतावर व पर्यायाने सोसायटीवर लक्ष ठेवून असतो. राखण करत असतो. त्याबदल्यात वर्षातुन चार महत्वाच्या सणाला त्याला चार बोटे व्यासांची पुरणपोळी, एखादे भजे, कुरडईच्या चार काड्या इत्यादी चालते. तसा हा देव स्वस्तात काम करणारा असला तरी आहे मात्र उग्र. टिचभर पुरणपोळीच्या बदल्यात बरकत देणाऱ्या या देवाच्या अवती-भोवती असलेल्या छोटेखानी देवराईतील एखादे झाड जर कुणी तोडले तर तो त्याच्या घरातील महत्वाच्या व्यक्तीला आयुष्यातून उठवतो. याचा अनुभव जमिन मालकाच्या पुर्वजांनी घेतला आहे असे मालकच सांगतात. “त्याचा निवद त्याला दिला की मग त्याचा आपल्याला काही त्रास नाही. उलट राखणच करतो तो सगळ्या बारदान्याची” असं म्हणत मालकांनी अगदी सहज एकर दिड एकर जमिनिवरील देवराई या देवासाठी सोडून दिली आहे. ‘पेरत नाही तो शेतकरी पापी’ अशीही एक अंधश्रध्दा या मालकांच्या मनात असल्याने देवराईतील काठोकाठ भरलेल्या विहिरीवर ते ‘पाप लागू नये’ म्हणून थोडी शेतीही करतात. बरं, या मालकाची मुलेही अशीच अंधश्रध्दाळू निघाल्याने त्यांनीही हीच परंपरा पुढे चालवत त्या जमिनिवरील देवराईला हात लावला नाही. त्यामुळे तिनही बाजुला असलेल्या दहा बारा मजली सोसायट्यांच्या मधे असलेले हे देवराई व लहान शेताचे हिरवे बेट उठून दिसते. या ओट्यावर सकाळी मॉर्निंग वॉक करणारे विश्रांतीसाठी बसतात. संध्याकाळी निवृत्त मंडळी गप्पा मारत बसतात. काही आया मुलांना येथेच खेळायला आणतात. झाडे, फुले, पक्षी, किडे दाखवतात. मुख्य रस्त्यापासुन अर्धा किलोमिटर आत असल्याने येथे ट्रॅफीकचा किंवा इतर कोणताही मानव निर्मित आवाज सहजी पोहचत नाही. येथे या देवराईच्या आश्रयाने पक्षांची, किड्यांची छान समृध्द अशी जीवनसाखळी सुखेनैव नांदत आहे. जोपर्यंत मालकांच्या मनातून किंवा त्यांच्या मुलांच्या मनातून ही अंधश्रध्दा जात नाही तोवर हे सगळे जीव येथे असेच सुखाने नांदतील. आता जर कुणी अंधश्रध्दा दुर करणारा मालकांना भेटला आणि त्याने या कुटूंबाच्या मनातील ही अंधश्रध्देची भिती दुर केली तर मात्र या देवराईचे काय होईल हे सांगता येणार नाही. जमिनीच्या मालकांना असाच कुणी ज्ञानामृत देणारा भेटत नाही तोवर नकोसे झालेले हे गणपती-लक्ष्मी आणि दहशतीच्या जोरावर नैवेद्य वसुल करणाऱ्या या शेंदऱ्या देवाच्या कृपेन ही जैवसाखळी न तुटता अशीच सुखेनैव चालत राहील. उद्याचे कुणी पाहीले आहे? दिसत असुनही कुणी उद्याचे पहात नाही. निदान निसर्गाच्या बाबतीत तरी नाही.

आजवर मला फक्त फुले निरखण्याचा, त्यांची स्केचेस बनवण्याचा छंद होता. पण जागूताई आणि वावे यांच्यामुळे मी प्रथमच या पक्षांकडे जरा बारकाईने पाहीले आणि मला पहिल्यांदाच या पक्षांचे सौंदर्य दिसले, डौल दिसला. त्यांना एक स्वभाव असतो हे समजले. पक्षी निरिक्षणातली गम्मत लक्षात यायला लागली. मला गेल्या दिड महिन्यात या देवराईभोवती दिसलेल्या रोजच्या पहाण्यातले काही पक्ष्यांचे फोटो येथे देत आहे. ऋतू बदलतील तसे वेगवेगळे पक्षी या देवराईत हजेरी लावतीलच. असो, फोटोंपेक्षा लेखच मोठा होईल त्यामुळे थांबतो. येथे फक्त फोटोच देत आहे. माहीती गुगलवर सहज उपलब्ध आहे.

(Camera: Nikon Coolpix P900, Canon EOS 60D, Sony PJ410)

चिरक (Indian Robin)
१ इंडीयन रॉबीन.jpg
.
EA06DBD3-5360-4AEF-B770-039347AD29A4.jpeg
राखी वटवट्या (Ashy Prinia)
2019-08-10 09.44.26.jpg
.
2019-08-10 09.44.37.jpg
.
2019-08-10 09.44.29.jpg
शिपाई बुलबुल (Red Whiskered Bulbul)
2019-08-10 09.44.32.jpg
.
2019-08-10 09.44.34.jpg
लालबुड्या बुलबुल(Red Vented Bulbul)
२लाल बुलबुल.jpg
.
३लाल बुलबुल२.jpg
खाटीक (Long Tailed Shrike)
2019-08-10 09.51.39.jpg
.
2019-08-10 09.51.47.jpg
दयाळ (Oriental Magpie Robin)
2019-08-10 09.51.57.jpg
राखी सातभाई (Large Grey Babbler)
2019-08-10 07.22.34.jpg
.
2019-08-10 07.22.36.jpg
खंड्या (White Throated Kingfisher)
2019-08-10 09.37.30.jpg
.
2019-08-10 09.38.12.jpg
हळदी-कुंकू बदक किंवा प्लवा बदक (Spot Billed Duck)
१०प्लवा बदक१.jpg
.
2019-08-10 09.51.52.jpg
मुनिया (Silverbill Muniya)
९मुनिया२.jpg
.
८मुनिया१.jpg
होला (Laughing Dove)
५होला.jpg
.
2019-08-10 10.12.26.jpg
कोतवाल (Black Drongo)
2019-08-10 07.22.18.jpg
वेडा राघू (Blue Tailed Bee Eater)
2019-08-10 07.22.41.jpg
वेडा राघू (Green Bee Eater)
2019-08-10 07.22.25.jpg
भारद्वाज (Greater Coucal)

तुर्की (Bronze Turkey)
2019-08-10 07.22.49.jpg
.
2019-08-10 07.22.46.jpg
.
2019-08-10 07.22.51.jpg
भांगपाडी मैना (Brahminy Starling)
५भांगपाडी मैना.jpg
पाणकावळा (Small Carmorant)
2019-08-10 09.43.58.jpg
(Crested Myna)
४मैना.jpg
मला समजेना मी येथे कोणकोणते पक्षी टाकले आहेत. गोंधळ व्हायला लागला आहे आणि धागाही जड होईल. त्यामुळे "देवराई"चा दुसरा भाग टाकेन. त्यात बाकीचे पक्षी देईन. जाता जाता हा 'मानव निर्मित' लोखंडी व कर्कश्श पक्षी.
2019-08-10 09.52.01.jpg(क्रमशः)
विहंगम देवराई - २

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी आहेत फोटो. खंड्या, कोतवाल, वेडा राघू, बुलबुल खूप भारी. तुर्की पाळलेली आहे का? देवराया हव्यातच. शहरात जास्त गरज आहे अशा नैसर्गिक हिरव्या बेटांची. धन्यवाद.

केवळ सुंदर प्र चि...
अनेक पक्ष्यांच्या पंखांची बारीक पिसेदेखील दिसताहेत... ग्रेट...

सुरेख शालीजी Happy
सकाळी सकाळी मन प्रसन्न झाले.

फारच छान!!
तुमच्या देवराईतल्या झाडांचेही फोटो टाका ना.

फोटो छान आहेत. पण हे फोटो पाहुन जरा निराशा झाली. Happy
देवराईचा, त्यातल्या देवाचा, झाडावेलींचे, विहीरीचा असे फोटो पहायला आवडलं असतं.
तुमचं घर जर १०-१२ व्या मजल्यावर असेल तर गॅलरी/खिडकीतुन काढलेला फोटो टाका की.
खरं तर शीर्षक वाचुन मला आता पुढे उंचावरुन घेतलेला देवराईचा फोटो दिसेल असंच वाटलं होतं.
म्हणजे विगंगम देवराईचा मी तसा अर्थ घेतला. Happy

सगळ्यांचे धन्यवाद!

झाडांचेही फोटो टाकेन अदीजो.

सस्मित खुप फोटो असल्याने जरा गोंधळ झाला. म्हणून क्रमश: लिहिले आहे. पुढच्या भागात झाडे, फुले, विहिर, गवतातले किडे यांचे फोटो टाकेन. मी पहिल्या मजल्यावर रहातो पण इमारतीच्या टेरेसवरून फोटो काढता येईल. पक्षांचे फोटो असल्याने विहंगम शब्द वापरला. तो सुट होत नाही पण टाकावा वाटला.
प्रतिसादासाठी धन्यवाद!

चैत्यन्य वॉचमनने काही बदके आणि दोन टर्की पाळले आहेत. त्यांचाच फोटो आहे वरती.

फोटो गॅलरी अप्रतिम.

खरं तर शीर्षक वाचुन मला आता पुढे उंचावरुन घेतलेला देवराईचा फोटो दिसेल असंच वाटलं होतं.
- माझं पण तसच काहीसं झालं. क्रमशः लेख आहे ना मग पुढे देवराई चे फोटो येतील.
- विहंगम शब्द चांगला सुट होतो ना !

छान आलेत सगळे फोटो.

देवराईचा, त्यातल्या देवाचा, झाडावेलींचे, विहीरीचा असे फोटो पहायला आवडलं असतं. >>>>> सस्मितशी सहमत.

अर्थात तुम्ही टाकालचं पुढच्या भागात

खूप सुंदर फोटो आहेत, ते पाहून तुमचा हेवा वाटला . खरोखर अशी निसर्ग देणगी आपण जपली पाहिजे.
शेवटी, कुछ दाग अच्छे होते है च्या चालीवर म्हणावसं वाटतं कुछ अंधश्रद्धा अच्छी होती है !

क्या बात है! सुरेख! कुठला फोटो जास्त आवडला हे सांगणं कठीण आहे. तरी त्यातल्या त्यात वेड्या राघूचा उभा फोटो खूपच सुंदर दिसतोय.

(धाग्यात माझा उल्लेख वाचून आनंद झाला. धन्यवाद Happy )

अंधश्रद्धेमुळे कुणाची पिळवणूक, कुणाचं शोषण होत नसेल आणि उलट पर्यावरणाचा आणि माणसाचाही फायदा होत असेल तर चांगलंच आहे!!

कृपया ही त्या शेतमालक कुटुंबाची श्रद्धा आहे. आपण तिला अंधश्रद्धा संबोधणे बरोबर आहे का? मला तर ती चांगली श्रद्धा वाटते. Happy

फोटो चांगले आलेत . वॉटरमार्कही अनोखा आहे .
कॅमेरा कोणता होता ? देवराईचेही फोटो अवश्य टाका

देवरायांना सगळ्यात मारक ठरलेली एक गोष्ट म्हणजे राईपेक्षा देवाला जास्त महत्व येणं. मग ज्या देवतेची ती राई आहे तिचं जुनं ठाणं पाडून तिथे प्रशस्त, चकचकीत देऊळ बांधलं जातं.. हळूहळू राई नष्ट होते आणि बिनकामाचं देऊळच मिरवत बसतं. ज्या काही देवराया शिल्लक आहेत, तिथे असं होऊ नये हे पाहण्याची / प्रयत्न करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

फोटो आवडले.
राखी वटवट्या सहसा फोटोत सापडत ना, उडुन जातो म्हणून अधिक आवडला.
----
लोणावळा पेठ शहापुर लायन पॉइंट पुढे रस्त्याकडच्या झाडीत भरपूर छोटे पक्षी आहेत.

अरे वा मस्त फोटो आहेत.
पाणकावळा आणि टर्की पक्षी आवडले नाही मला पण बाकी सगळे छानेत.

देवराईचे आणि इतर फोटोंसाठी पु भा प्र.
देवाचा फोटोदेखील टाका. आणि नावदेखील लिहा.

छान फोटो आहेत. खूप आवडले. वर्णनही अगदी चित्रदर्शी आहे. आवडलंच. याचा पुढचा भाग लवकर टाका Happy

छान.
देवराईचे फोटो येऊ देत. +१

Pages