पक्षी
हिंदी शब्दकोडं - प्राणी आणि पक्षी
साहित्य : कर्तव्याची जाणीव (१ किलो), चिकाटी (५ किलो), भरपूर वेळ (काढता येईल तितका), होडी आणि वल्ही (मी दोन वल्ही वापरलीयेत.)
सध्या आमच्याकडे पाचवीचा अभ्यास सुरू झाला आहे. गृहकार्यात हिंदी टीचरनं प्राणी आणि पक्ष्यांची हिंदी नावं गुंफून एक शब्दकोडं बनवायला सांगितलं होतं.
भोवतालचे पक्षी
हे माझ्या घराभोवती दिसलेले काही....
यातले काही पुर्वी टाकले आहेत निग.त






सुप्रसिद्ध पशु-पक्षी
लहानपणी आपल्याला सगळ्यात पहिले भेटतात ते काऊ, चिऊ, माऊ आणि भुभु. मग विठुविठु पोपट येतो. 'साळुंकी साळकी, तुझी माझी पालखी' करत साळुंकी येते. रामाच्या देवळाला पाच फेर्या मारणारी घार भेटते. ससा, कासव भेटतात ...... हळूहळू हे संग्रहालय वाढायला लागतं.
पण या कोणाला अजून खास नावं आलेली नसतात. टिप्या, मोती अशी जेनेरिक नावं असली तरी त्यांना खास व्यक्तिमत्त्व आलेलं नसतं.
पण मग पुढच्या आयुष्यात एकसेएक सुप्रसिद्ध प्राणी-पक्षी भेटू लागतात. त्यांचं खास वैशिष्ट्य असतं, त्यांना व्यक्तिमत्व असतं आणि/किंवा त्यांनी एखादी लक्षात राहणारी भुमिका तरी बजावलेली असते.
मेळघाटातील पक्षी
मेळघाटातल्या चिलाटी गावात, १०० दिवसांच्या शाळेच्या निमित्त्ताने, मागच्या वर्षी घालवलेल्या, त्या ८-१० दिवसांच्या आठवणी माझ्या मनात आजही अगदी ताज्या आहेत.
माझ्या तिथल्या सोन्यासारख्या वास्तव्याला सुगंध देण्याचे काम, तिथल्या अंगण-वावरात दिसलेल्या, अगदी सहज व विनासायास दिसलेल्या पक्षांनी केले.
त्यांची काही प्रकाशचित्रे आज इथे टाकत आहे.
शुभशकूनी भारद्वाज

बुलबुल एकटा
अन् जोडीने
खंड्या..............रंगाचा पक्का !!!!!
प्रकाशचित्र १
प्रकाशचित्र २
प्रकाशचित्र ३
पक्षीदर्शन (कॅलटेक - २०१२-०१-३०)
मुख्य भुमिका नटालचा सुतारपक्षी आणि लाल मिशीवाला बुलबुल (लपंडाव खेळत असलेला)
पक्षीच पक्षी!! दक्षिण फ्लोरीडा, अमेरिका...
काही दिवसांपूर्वी फ्लोरीडाला ट्रिप मारण्याचा छान योग आला. तेव्हा एक छान कार भाड्याने घेऊन मायामीच्या दक्षिणेला समुद्रात असलेली बेटं म्हणजेच 'की वेस्ट', दक्षिण फ्लोरीडात असणारं सुमारे १५ लाख एकर एवढं मोठं अवाढव्य 'एव्हरग्लेड्स नॅशनल पार्क' आणि मायामी शहरापासून अगदी अर्ध्या तासावर, बहुतांश भाग समुद्राखाली असलेलं 'बिस्केन नॅशनल पार्क' ह्या तीन ठिकाणी जाऊन आलो. अनेक वेगळ्यावेगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी इथे मुक्तपणे वावरताना दिसतात, त्यातल्याच काही पक्ष्यांचे फोटो अपलोड करत आहे.
पक्षी
पक्षी
जीर्ण शीर्ण फ़ांदीवरचा
तो कोवळा पक्षी
अखेर उडालाच............
आम्ही त्याला
परत बोलावण्यासाठी
गाईलेली
आमच्या दृष्टीनं सुरेल
गाणी
त्यानं ऐकलीच नाहीत
त्याचे चकचकीत पंख
एकदोनदा हलले
आणि हलकेच तो
उडून गेला...........
या झाडावर
तशीही नव्हतीच
हिरवी पाने
आश्वासक फ़ांद्या.....
उमेश वैद्य २०११
घरटे प्रेमाचे
माध्यम : जलरंग
Please visit my blog at http://creativepearls.blogspot.com/
and my etsy store at http://www.etsy.com/shop/PearlyCreation
