एक दिवस... फुलपाखरांसमवेत !!!

Submitted by भालचन्द्र on 3 July, 2011 - 13:27

माहुली परिसर........शहापूर येथील, एक दिवस... फुलपाखरांसमवेत !!!

दिनेशदा >> हे कोणते झाड आहे ज्याच्या सभोवती इतक्या प्रकारची फुलपाखरे भिरभिरत होती !!!

P1000618.JPGP1000629.JPGP1000657.JPGP1000665.JPGP1000670.JPGP1000671.JPGP1000700.JPGP1000708.JPGP1000721.JPGP1000737.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदरच. झाड निगडी / निरगुडी / दगडी चे आहे. (पण हे झाड काही फूलपाखरांसाठी फेमस नाही. कदाचित बाकिची फूले नसतील उमललेली म्हणून ) या दिवसात लिंबू, कढिलिंब या झाडावर माद्या, अंडी घालण्यासाठी भिरभिरत असतात.

हे निरगुडी/वनई चे झाड. फुलपाखरू होण्यापुर्वीच्या अळ्यांनी हे झाड भरलेले असते.
वाताचे दुखणे, मुरगळलेल्या भागावर हा पाला गरम करुन बांधून ठेवतात.
बाळाची पाचवी असते तेंव्हा सटवी पुजताना बाळाला ह्य झाडाच्या पानांवर झोपवतात व काही विधी करतात.
कुणी मुलगी, स्त्री जर ह्या झाडाच्या बाजुने जात असेल तर तिची पाने तोडून केसात माळायची नाहीतर ती शाप देते असा समज आहे. पुर्वी खुप ऐकायचे हे आणि बायकांच्या डोक्यात पण बघायचे.

मस्त