अनुबंध
माणसामाणसात अनुबंध
असे जुळावे
जसे फुलपाखरू
पानांफुलांवर खेळावे
अलगद उतरावे
कुठल्याही पानाफुलावर
ना पानांना वेदना
ना जखमा फुलांना
गाजावाजा न करता
द्यावे जे द्यायचे
घ्यावे जे घ्यायचे
ना कोणी दाता
ना कोणी याचक
सगळ कसं कोमल
आणि नितळ
© दत्तात्रय साळुंके