रहस्य भाग १

Submitted by बेधुंद on 9 January, 2013 - 03:00

डॉ.देसाई आपल्या अलिशान दालनात आरामखुर्चीत बसले होते .मुंबईच्या फोरेन्सिक प्रयोगशाळेची सुत्रे नुकतीच त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.एका कर्त्बगार व्यक्तीकडे ही जबाबदारी आल्याने तेथील व्यवस्थेत एक प्रकारची नवीन उर्जा संचारली होती.या आधीचे तेथील प्रमुख देखील अत्यंत नावाजलेले फोरेन्सिक तज्ञ होते पण ते सेवानिव्रुत्त झाले आणी जबाबदारी डॉ.देसाईंकडे सोपविण्यात आली.खरे तर ही प्रयोगशाळा पाश्चात्य देशांच्या तुलनेत सोयी सुविधांच्या बाबतीत मागासच होती पण सगळया अड्चणींवर मात करुन तेथील तज्ञ आपले काम चोखपणे बजावत होते.प्रयोगशाळेत विविध प्रकारचे विभाग होते ज्यात वेगवेगळे तज्ञ काम करीत होते ,त्यात पिण्याच्या पाण्याच्या तपासणी पासुन तर विविध विषारी पदार्थ ,रसायने ,ज्वलनशील पदार्थ्,विस्फोटके,हत्यारे यांच्या विशेष तपासणीसाठींच्या विभागांचा समावेश होता.याच प्रयोगशाळेत आणखी एक विभाग होता जो विशेष दर्जाचा होता ज्यात संशयास्पद अपघात,हत्या,यांसारख्या प्रकरणांवर फोरेन्सइक तज्ञांचा अभ्यासपुर्ण रिपोर्ट दिला जात असे. हे तज्ञ म्रुताच्या शरीरावरील जखमांचा शास्त्रीय अभ्यास करुन आपला रिपोर्ट देत असत्.कुठल्याही संशयास्पद व गुंतागुंतीच्या प्रकरणांवर इथला रिपोर्ट अत्यंत महत्वाचा असे व बर्याचदा यावरुन आरोपीचा शोध लावण्यात पोलीसांना यश येत असे.हा रिपोर्ट पोस्ट्मार्टंम अर्थात शवविच्चेदनाच्या अहवालापेक्षा कधी कधी जास्त महत्वाचा ठरत असे....
डॉ.देसाई आपल्या अलिशान दालनात आरामखुर्चीत बसले होते.ते कुठल्याश्या फाईल अभ्यासणात मग्न होते तेव्हड्यात त्यांच्या टेबलावरचा इंटरकोम खणखणला .त्यांनी फोन उचलुन कानाला लावला ,पलीकडे त्यांची सेक्रेटरी त्यांना इन्पेक्टर प्रताप शिन्देंचा फोन त्यांच्या नंबरला जोडण्यासाठी परवानगी मागत होती,ईन्स्पेक्टर शिन्देंना डॉ.देसाईशी महत्वाचे बोलायचे होते. परवानगी मिळताच कॉल जोडला गेला.

ईन्स्पेक्टर शिन्दे पलीकडुन बोलु लागले,
"देसाई सर, नमस्कार! मी क्राईम ब्रान्च मधुन इन्स्पेक्टर शिन्दे बोलतोय,तुम्हाला फोनवर तसदी दिल्या बद्दल माफ़ करा,पण आमच्या कडे अत्यंत विचित्र अशी एक केस आलीये,ज्यात आम्हाला "फोरेन्सीक एक्स्पर्ट" ची मदत हवीये,आणी तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज आहे ","सर ,मला माहिती आहे कि, कुठल्याही लहान सहान केस साठी द्यायला तुम्हाला वेळ नाहीये पण या केस मध्ये तुमच्या ज्युनियर एक्स्पर्ट ऐवजी तुम्ही थोडा वेळ दिला तर खुपच बरं हॊईल"

देसाईंनी क्षणभर विचार केला,आणी त्यांना भेटण्याची वेळ सांगीतले व केस संदर्भातील सर्व डिटेल्स सोबत आणायला सांगीतली..

भेटायच्या वेळेला ईन्स्पेक्टर् शिन्दे ,सब इन्स्पेक्टर राऊत डॉ.देसाईंच्या वातानुकुलीत दालनात पोहोचले.
डॉ.देसाईंना नमस्कार करुन खुर्चीत बसले ,ईन्स्पेक्टर् शिन्दे त्या नवीन केस संबधी सांगु लागले

"सर,झाले असे की,काल सकाळी आमच्या कडे एक नवीनच केस आलीये,ज्यात एका तरुण महिलेचा बेवारस म्रुतदेह काही मच्चीमार तरुणांना खाडीच्या पाण्यात तरंगतांना आढळुन आला,सुरुवातीला या तरुणातील एकाला पाण्यावर पांढर्या रंगाचे कपडे तरंगतांना दिसुन आले ,जवळ जाऊन बघताच त्याला तो म्रुतदेह असल्याचे लक्षात आल्यावर त्याने त्याच्या सहकार्याना ओरडुन त्याची माहीती दिली,सर्वांनी मिळुन तो म्रुतदेह पाण्याबाहेर आणला..पाण्यात तो म्रुतदेह पुर्णपणे सडला होतो ,चेहरा तर ओळ्खु न येण्याइतपत खराब झाला होता.ओळख पटविण्यात अत्यंत अवघड असा तो म्रुतदेह त्यांनी बाजुला ठेवला तोपर्यंत तेथे बरिच गर्दी जमा झाली होती,त्यातल्याच कुणी तरी स्थानीक पोलीस स्टेशनला ही माहीती कळवली.त्यानंतर आमचे पोलीस तेथे पोहोचले"

ईन्स्पेक्टर शिन्दे पुढे सांगु लागले.
"सर,बॉडी च्या पंचनाम्यासाठी सबईन्स्पेक्टर राऊत गेले होते,तुम्हाला अधीक माहीती ते सांगतील"
डॉ.देसाईंनी राऊतांकडे नजर वळवली आता राऊत पुढची माहीती सांगु लागले

"सर मी आणी माझे सहकारी जेव्हा त्या ठिकाणी गेलो तेव्हा ,ती बॉडी तिथल्या लोकांनी जमीनीवर आकाशाकडे तोंड असेल अशा स्थितीत ठेवलेली होती,बॉडीची अवस्था खुपच खराब होती,चेहरा ओळखु न येण्याच्या स्थितीत होता ,चेहर्यावर मारहाण केल्याचे चिन्ह दिसत होते ,मानेवर गळा आवळ्ल्याचे चिन्ह स्पष्ट्पणे दिसत होते.मानेच्या उजव्या व डाव्या बाजुला हातांच्या बोटांचे अगदी ताकद लावल्यावर उमटतील अशे ठसे होते जे दर्शवित होते कि त्या स्त्रीचा गळा आवळुन खुन करण्यात आला होता,त्या बॉडीचे कपडे ही जागोजागी फाटलेले होते ,पण तिच्या डाव्या पायाजवळ एका ठिकाणी तिचे कपडे जरा जास्तच फाटले होते जो कदाचीत फाडुन तिच्या तोडात बोळा करुन कोंबण्यात आला होता,मी तिच्या तोंडात तपासल्यावर मला तो बोळा आढळुन आला,त्यानंतर मी बॉडीचा पंचनामा करुन ती पोस्ट मॉर्‍ट्म साठी होस्पिट्ल ला पाठवली .त्याचा अहवाल ही आलाय ज्यात ती स्त्री २५-२६ वर्ष वयाची असावी व गळा आवळुन तिचा खुन झाल्याचे नमुद आहे .त्यात म्रुत्युचा कालावधी ३-४ दिवसांपुर्वीचा असावा असा अंदाज आहे,ती गरोदर नसल्याचीही खात्री करुन घेतलीय,तसेच तिच्या वर बलात्कार झाला नसल्याचेही समोर आलयं"

डॉ.देसाई सगळी माहीती लक्षपुर्वक एकत होते..राऊत बोलायचे थांबले तसे,डॉ.देसाई म्हणाले..

"वेल्,तुम्ही मला जी माहीती दिलीय्,त्यात सगळ्या गोष्टी तर तुम्हीच क्लियर केल्यात कि त्या स्त्री चा गळा आवळुन खुन करण्यात आलाय मग तुम्हाला माझ्या कडुन कसली मदत हवी आहे?"

तसे ईन्स्पेक्टर शिन्दे म्हणाले ,"सर,खरा प्रोब्लेम तो नाहीये ,त्या बॉडीची ओळ्ख पटवणं खुपच जिकरीचे काम आहे त्या साठी फोरेन्सिक चाचण्या कराव्या लागतील,आता हे काम आम्ही तुमच्या ज्युनियर एक्स्पर्ट कडुन करुन घेतले असते पण या केस मध्ये कुठलीही रिस्क मला घ्यायची नाहीये कारण आम्ही जेव्हा या संबधात तपास सुरु केला व त्या वर्णनाशी कुणी मिळती जुळती मुलगी बेपत्ता आहे का हे बघीतले तेव्हा अशा वर्णनाच्या ३ मुली बेपत्ता असल्याचे आढळले व त्यातील १ मुलगी ग्रुहमंत्र्यांच्या खाजगी सचिवाची आहे .त्यामुळे या प्रकरणात आम्ही कुठलीही रिस्क घेउ शकत नाही,तसा ऑफीशीयली आम्ही अजुन कोणाला या बाबतची माहीती दिलेली नाही,पण जास्त वेळ आम्ही ही माहीती लपवुन ठेवु शकत नाही"

शिन्देंनी आपली परिस्थीती देसाईंना सांगितली

तसे देसाई म्हणाले "म्हणजे मी या केस वर फोरेन्सिक ओपिनिओन द्याव असे आपल्याला वाटते,आनी तेही ऑफ द रेकॉर्ड ?"

तसे शिन्दे व राऊत दोघे एकदम म्हणाले "यस सर"!!!

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय भाउ.....फोन कनेक्ट व्हायच्या आधीच डिसकनेक्ट केला.......
लवकर जोडा.........:)

अमित

मा.बो. वर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे,२ दिवसांपुर्वी सदस्य झालो आणी लिहायला घेतले पण टाईप करतांना काहीतरी गड्बड झाली आणी अर्धा भाग उडाला त्यामुळे होता तेव्ढाच पोस्ट केलाय,क्षमस्व
दुसरा भाग ही टाकलाय लगेच

@विनायक -प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@त्रुष्णा-ही कथाच आहे .ललित मला अजुन लिहिता येत नाहे ,क्षमस्व्,धन्यवाद
@अमित साहेब -फोन लगेचच कनेक्ट केलाय्,धन्स