निरोप...

Submitted by मुग्धमानसी on 12 February, 2013 - 02:07

तुझा निरोप आला तेंव्हा मी पावसात चिंब भिजलेले होते!
तसेच ओलेते कपडे... निथळणारं अंग... आणि चिंब ओले केस...

तुझा प्रश्न जरा हळवासा...
’बरेच दिवस निरोप नाही... विसरलीस का मला?’ - अशाच काहिश्या अर्थाचा.

मी प्रसन्न हसले!

ओले केस पंचाने खसखसून पुसताना मनात आलं...
मला खरंच भिजवलं होतं पावसानं... की...
कि तुझ्या आठवानं?

आपल्या खुपश्या प्रश्नांची उत्तरं नसतातच एकमेकांकडे...
पण उत्तरादाखल धाडलेला माझा हा निःशब्दाचा निरोप... कधी पोचेल का तुझ्यापर्यंत?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे .. short and sweet

<आपल्या खुपश्या प्रश्नांची उत्तरं नसतातच एकमेकांकडे...>> .आवडेश

छानच.

वा..