गद्यलेखन

थ्रील थरार 3

Submitted by Abhishek Sawant on 1 December, 2015 - 21:06

थ्रील थरार ३
.
.
.
.
जय ला चांगलच माहिती होते की रोहित ची चांगलीच तंतरलेली असणार म्हणून तो रोहितला चिडवू लागला की “ तू फक्त gym च कर साल्या जरा काय झाले की तुझी फाटते, नुस्ता फुगलयस आंगात काय दम नाही “ मग रोहित ने पन चार अस्सल कोल्हापुरी शिव्या एकंदर जय ला आणि लांडग्याला हासडल्या आणि ईकडे तिकडे बघत तो लांडगा अजून त्यांच्या मागावर तरी नाही ना याची खात्री करून घेऊ लागला.

शब्दखुणा: 

थ्रील थरार 2

Submitted by Abhishek Sawant on 29 November, 2015 - 12:04

माफ करा मी पहील्यांदच लिहीत असल्यामुळे पहीला भाग खुपच चुकला.... हा भाग जमलाय का बघा आणि काही चुका झाल्या असतील तर सांगा....

थ्रील थरार २.

शब्दखुणा: 

ठुसके बार - कालखंड अनादिअंत

Submitted by घायल on 26 November, 2015 - 09:56

सूचना : वाचण्याआधी नियम व अटी मान्य असल्याचे संमतीपत्र देणे आवश्यक.

इसवी सन ००००

तेव्हां आकाशात तारा दिसू लागला. त्याकडे बघ बघत तीन घोडेस्वार मार्गस्थ झाले. त्या प्रवासाचा शेवट एका गोठ्यात झाला. तिन्ही प्रवाशांनी खाली उतरून पाहीले. एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला होता. देवकीने मेरीच्या बाळाला न्हाऊ घातले. तेव्हांच एका प्रवाशाने विचारले आपण इथे कशा ? त्यावर मेरी उत्तरली, वासुदेव भौजी बाळासाठी टोपली आणायला गेलेत. यावर एका प्रवाशाने तिथल्या तिथे एक रेघ जमिनीवर मारली आणि म्हणाला या रेघेच्या अलिकडे बीसी आणि पलिकडे ..

"फॉर्वर्ड ?" वासुदेवाने विचारले ?

शब्दखुणा: 

थ्रील थरार

Submitted by Abhishek Sawant on 26 November, 2015 - 07:14

रोहीत एक महाविद्यालयीन युवक, साधा सरल मनमिलाऊ. रोहीत कर्नाटकमधील विजापूर मध्ये त्याचे महाविध्यालयीन शिक्शन घेत होता. तो शहरात वाढल्याने त्याला ग्रामीण भागाविषयी कुतूहल असे, एका खासगी वस्तीग्रहात रहात असताना त्यची एका मुलाबरोबर मैञी झाली जय असं त्याचे नाव होते. जय हा तिथुनच १५-२० किमी वर असलेल्या गावात रहायचा. पावसाल्याचे दिवस हीते पण पाऊस काय झाला नव्हता, जय च्या गावात खुप चोरी होत होत्या एका विशिष्ट जातीचे लोक हे दरोडे घडवुन आणताहेत अशी अफवा पसरलेली होती. ते लोक खुप क्रुर आहेत आणि त्यांच्याकडे धारधार शस्त्र आहेत अश्या आणि काही भरपुर अफवा पसरवल्या जात होत्या.

शब्दखुणा: 

निसर्ग नियम

Submitted by salgaonkar.anup on 26 November, 2015 - 06:00

गोष्ट जुनी असली तरी विचार आजही झालाच पाहिजे. प्राणी आणि पक्षी यांच्या पाठीवर निसर्गाने पृथ्वीवर "मनुष्यप्राणी" जन्माला घातला. सगळ्या हुशार आणि बुद्धिमान असा हा मनुष्यप्राणी. निसर्गाने जे जे जन्माला घातलं त्या प्रत्येकासाठी केले काही नियम. निसर्गाचा ठेवा जपला जावा आणि निसर्ग सौंदर्य अबाधित राहावं म्हणून हे नियम. मनुष्य, प्राणी, पक्षी यांना जगण्यासाठी जे जे लागेल ते ते सारं निसर्गाकडूनच पुरवलं जायचं. मानवाच्या अन्न , वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांना निसर्गाने निस्वार्थीपणे तथास्तु म्हंटल.

शब्दखुणा: 

तडका - आमचे संविधान

Submitted by vishal maske on 25 November, 2015 - 22:03

आमचे संविधान

स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान

धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मनातले काही - ६

Submitted by बेफ़िकीर on 24 November, 2015 - 03:03

हा देश निर्माण झाला आहे गुलामगिरीसाठी आणि लुटला जाण्यासाठी! हा देश आज नकाशात दिसतो तसा आत्ताआत्तापर्यंत नव्हताच. येथे जो तो स्वतंत्र होता. सगळे एका परकीय छत्राखाली एक होण्याच्या प्रक्रियेमध्ये शेकडो फितुरांनी हातभार लावला. शेकडो अप्पलपोट्यांनी अयशस्वी झुंज दिली. हजारो भूमीभक्तांनी हौतात्म्य, हाल, शिक्षा, मानहानी ह्यातील काही ना काही पत्करले. पण हे भूमीभक्त पाठ्यपुस्तकांमध्ये बंदिस्त झाले आणि त्यांचे तळमळणारे आत्मे चौकातील पुतळ्यांमध्ये अडकून पडले कबूतरांना सुलभ शौचालये पुरवण्यासाठी!

शब्दखुणा: 

कालच्या पावसात

Submitted by Rajesh Kulkarni on 23 November, 2015 - 23:20

कालच्या पावसात
.
पूर्ण मॉन्सून संपून गेला, पण यावेळी पावसात भिजलोच नव्हतो. कालच्या पावसात मात्र ठरवून नखशिखांत भिजलो. पावसात भिजणे हे केवळ कपडे व शरीर ओले होण्यापुरते नसते. त्याचवेळी वाहणा-या थंडगार वा-यामुळे, तसेच पूर्ण भिजलेली विजार वा-यामुळे पोट-यांना चिकटली की पूर्ण अंगातून मधूनमधून जाणारी शिरशिरी या विसरू घातलेल्या व पावसाबरोबरच येणा-या मोफत पॅकेजचाही अनुभव त्याबरोबर आला.

नाही म्हटले, तरी मनावरचे मळभ थोडे कमी झाले असेलच. कोणत्या गोष्टीचे, ते हळुहळु कळेल.

कट्यारीबाबत काळजातले

Submitted by बेफ़िकीर on 22 November, 2015 - 09:26

कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटाने मनाचे प्रचंड समाधान झाले. मुळात कथानक अतिशय सकस असल्याने चित्रपट सरस होणारच होता. ह्या कथानकावर आजच्या काळात चित्रपट काढणे हे एक धाडस म्हणता येईल.

स्वस्तपणाला किंवा सवंगपणाला कणभरही जागा दिली गेली नाही. चित्रपटाचा वेग प्रेक्षकाच्या जवळपास नकळतच अगदी अचूक ठेवला गेल्यासारखे झाले. रटाळही होत नाही आणि समजण्यासाठी अधिक काळ हवा होता असेही वाटले नाही.

ह्या चित्रपटात बहितांशी गोष्टी जमेच्याच आहेत हे नक्की! काही किरकोळ गोष्टी वैगुण्यांसारख्या जाणवल्या. त्याही नसत्या तर हा चित्रपट सर्वश्रेष्ठ गणला गेला असता बहुधा!

फाटक ३

Submitted by घायल on 21 November, 2015 - 07:26

मागील भागासाठी येथे क्लिक करा

"आत येऊ का "
" या या , मिसेस कागाळे !"
" मुद्यालाच हात घाला इन्स्पेक्टर साहेब !"
" हं , काय घेणार चहा , कॉफी ? "
" नाही नको, धाकधुक होतेय हो. "
" गायकवाड, चहा वाल्याला आवाज दे, स्पेशल सांग दोन "
" अहो, खरंच नको हो "
" लांबून आला आहात. थेट इकडेच. तुमची अवस्था कळतेय मलाही. तुमच्या निमित्ताने माझाही चहा होऊन जाईल. जरा रिलॅक्स व्हा !"
" कालपासून जिवात जीव नाही. लवकर सांगा प्लीज "
" विशेष असं काही नाही. कुठून सुरूवात करू ? "

" तुमचे बाबा डायरी लिहायचे याची कल्पना आहे का ?"

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन