वाकणकरांनी दिलेले पाणी ...........................

गोष्ट जुनीच माणसं नवीन (भाग ५ वा )

Submitted by मिरिंडा on 24 October, 2016 - 10:56

वाकणकरनी दिलेलं पाणी पिऊन सरला जरा स्वस्थ झाली. विस्कटलेले केस तिच्या घामेजलेल्या चेहेऱ्यावर ठिकठिकाणी चिकटले होते. अंगावर दुपट्टा नसल्याने ती अंग चोरून बाकड्यावर बसली होती. वसंताबरोबरच्या झटापटीत तिच्या ड्रेसचा वरचा हूक तुटला. तिच्या ते लक्षात आलं आणि तिचा एक हात तो भाग झाकण्याचा प्रयत्न करू लागला. वाकणकर गावातलाच असल्याने तिला ओळखत होता. सरलानी त्यातल्या त्यात केस सारखे करून कपडे ठीकठाक केले. आता ती भानावर आली. एवढ्या सगळ्या धडपडीत तिची बारकीशी पर्स कुठे हरवली, तिलाच आठवेना. तिला फारच विचलित झालेली पाहून वाकणकर तिला म्हणाला, " काय ग काय शोधत्येस? काही हरवलय का?

Subscribe to RSS - वाकणकरांनी दिलेले पाणी ...........................