गद्यलेखन

पाणीपुरी

Submitted by फूल on 17 January, 2013 - 20:31

भैय्याच्या घागरीत त्याने बुचकाळलेल्या हाताचा आवाज आणि आंबट गोड पाण्याने लडबडलेलं ते सुखाचं छोटसं गाडगं... खाल्ल्यानंतर जीभेच्या अगदी अंग प्रत्यंगाला चव देऊन जातं. मग पुन्हा भैय्या त्याच्या घागरीतलं पाणी त्या लांब दांड्याच्या चमच्याने ढवळतो आणि पुन्हा तेच सारं. पाणी पुरी... माझं सगळ्यात लाडकं आणि जीवाभावाचं खाणं. भैय्याने देत रहावं आणि मी खात जावं.

शब्दखुणा: 

मोह...

Submitted by बागेश्री on 17 January, 2013 - 08:41

एखाद्या भावनेने उच्चांक गाठला,
की मेंदूवरची पकड सुटण्याचीच भिती जास्त!

ते क्षणच मोहक.
कधी आनंदाचे, कधी निराशेचे..

कधी हा मोह इतका लोभसवाणा की,
सारासार विचारांना तेव्हा सरळ बाजूला सारून आनंदाने त्यापुढे शरण जावं..

तर कधी,
काळवंडलेली उदासीनता व्यापून उरते...
तिचा गडदपणा घेरून टाकतो,
अशा वेळी त्यातून बाहेर पडण्याची उसनी धडपडही न करण्याचा मोह!!

मात्र हा 'मोह' आपल्यापासून वेगळा होताना काहीतरी घेऊन जातो... काहीतरी खूप जपलेलं!

मग वाटतं,
असे मोहाचे क्षण टोलवता आले पाहीजेत..

शब्दखुणा: 

टेडी बेअर____ भाग २

Submitted by जाई. on 16 January, 2013 - 12:17

भाग पहिला http://www.maayboli.com/node/40267

सरुताईपाठोपाठ समीर आत आला. मूळचाच देखणा असा तो अधिकच छान दिसत होता. डोळे पाणावलेलेच होते. नुकताच रडला असावा. शेवटी ममी त्याच्या सख्या आई होत्या. दुख वाटण साहजिकच होत. तो समोर येताच आम्ही तिघेही व्याकूळ झालो. ममी सावत्र असल्या तरी त्यांनी आईची जागा घेतली होती.ताण सहन न झाल्यामुळेच रात्री अक्षरश मी थकले होते.पपांनी आम्हाला हळूवार पणे थोपाटल. आम्ही तिघेही हॉलमध्ये आलो. ममीचा मोठा फोटो तिथे लावण्यात आला होता. त्या फोटोवरचा हार पाहून समीर कोसळलाच. पपांनाही गदगदून आलं. त्यांना सावरण्याची जबाबदारी आता माझी होती.

मी, अन्या आणि लग्न वगैरे... - संपूर्ण

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

ही कथा जुन्या मायबोलीतलीच आहे. बर्‍याच काळाने धूळ झटकून, जरा ठाकठीक करून नवीन मायबोलीवर आणत आहे.
**************************

तो घरात ज्या पद्धतीने आला ते पाहूनच मला जाणवलं स्वारी अस्वस्थ आहे आज. पायातले फ्लोटर्स त्याने भर्रकन काढून कोपर्‍यात भिरकावले. डोक्यावरची कॅप काढून टीपॉयवर फेकली आणि खिडकीजवळच्या दिवाणावर धप्पकन येऊन बसत त्याने फर्मावलं, "देवू, पाणी आण गार." आणि लगेच माझ्याकडे चमकून पाहात "ओह, तू ऑलरेडी पाणी घेऊनच आलीयेस की!" म्हणून पाण्याची बाटली हिसकावून घेत घटाघटा पाणी प्यायला.

"कुठे उनाडक्या करून येतोयस?" मी त्याच्याशेजारी बसत म्हणाले.

प्रकार: 

अवतार

Submitted by शैलेंद्रसिंह on 15 January, 2013 - 22:52

महानता त्याच्या रोमारोमात भिनलेली आहे... अशक्य असं काही नाहीच....खरंतर जगाचे सगळे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर व्हावे.... पण त्याचे त्याला काहीही अप्रुप नाही.......डेक्कन क्वीन फ़ुल स्पीडने डोंबिविली स्टेशनवर येत असते....त्याच दिशेच्या टोकाला हा उभा असतो....गाडी आली तेव्हाच हा रेस सुरु करतो....आणि पळत सुटतो....गाडी स्टेशन पार करण्याच्या आधी ह्याने दुसऱ्या टोकाचा ब्रिज चढुन....दुसऱ्या प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन तिथुन धावत डेक्कन क्वीनच्या आधी प्लॅटफ़ॉर्म पार करुन....खाली रुळावर उतरतो आणि डेक्कन क्वीन जाण्याच्या आधी तिला क्रॉस करतो....

शब्दखुणा: 

१ फेब्रुवारीपासून गुलमोहरात झालेले बदल

Submitted by बेफ़िकीर on 15 January, 2013 - 14:47

दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेरापासून गुलमोहर लेखनात बदल करण्यात येत आहेत.

लेखक, कवी, मधले, पलीकडचे, रसिक, कळप, छायाचित्रकार, पाककृतीकार, मुलाखतकार व खालील सदस्यः

आंबा (या दोन अक्षरांपुढील आकडा कारवाई केलेल्या आकड्याच्या पुढचा धरावा)

गाय वासरू छाप गोमुत्र

भारतीय

डँबिस (भारतीय व डँबिस हे दोन भिन्न सदस्य असून भारतीय हे डँबिसचे विशेषण मानले जाऊ नये)

गा मा (हे हवे ते बोलून 'आपले नम्र' असतात अश्या तक्रारी आलेल्या आहेत)

देवपूरकर

या सर्वांनी या बदलांची नोंद घ्यावी.

==========================

विवाहसंस्था मर्यादीत केल्यास...

Submitted by बेफ़िकीर on 15 January, 2013 - 06:48

सद्य परिस्थितीत ढवळून निघालेले वातावरण, मायबोलीवर अश्या स्वरुपाचे काही धागे येणे यातून मनात जे आले ते लिहीत आहे. उत्स्फुर्त भावनेतून लिहीत असल्यामुळे आगापीछा ( / मेरिट्स - डिमेरिट्स) चा विचार केलेला नाही. तो विचार चर्चेतून होईलसे वाटत आहे.

आशीर्वाद

Submitted by विजय देशमुख on 15 January, 2013 - 05:57

घराचं फाटक उघडून मी आत शिरलो. कॅप्टन झाडांना पाणी घालण्यात मग्न होते. मी जिन्यावर चार पावलं चढलो न चढलो, तोच मागून आवाज आला,
“या विजयराव, चहा घेऊ.”
त्यांची ती विनंती म्हणजे ऑर्डरच. ती मोडण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी ‘अबाउट टर्न’ केलं आणि खाली आलो. कॅप्टनच्या हातातला पाण्याचा पाइप घेतला, तोंडावर गार पाण्याचे शिबके मारले, आणि रुमालानं तोंड पुसत हॉलमध्ये शिरलो. कॅप्टन शिर्के ग्रीन रंगाचा टी-शर्ट अन रंगीबेरंगी बर्मुडा घालून बहुदा माझीच वाट बघत बसले होते.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन