गद्यलेखन

सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - १२

Submitted by Suyog Shilwant on 22 January, 2017 - 21:30

रस्त्यावरचे आकस्मिक भांडण: एक प्रचंड मन:स्ताप...

Submitted by एक मित्र on 20 January, 2017 - 02:27

काल एक प्रसंग घडला. असे प्रसंग माझ्या आयुष्यात काही महिन्यातून एकदा घडतातच. पण त्याचे मनावर इतके वाईट डाग पडतात कि अनेक दिवस त्यातून बाहेर येता येत नाही. ते आठवले तरी मनाची प्रचंड चरफड होते. एरवी ज्यांची आपले जोडे सुद्धा पुसायची लायकी नाही असले नीच आणि हलकट लोक आपल्याला सहजगत्या अपशब्द बोलून गेले आणि आपण काहीच करू शकलो नाही हे आठवल्याने मनाचा संताप संताप होत राहतो.

आपण काय करता ? जरा मराठीत सांगाल ?

Submitted by कुमार१ on 16 January, 2017 - 21:33

आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपला अनेकांशी सबंध येतो. त्यापैकी काहीजण मराठी भाषिक असतात. बोलण्यासाठी समभाषिक माणूस मिळाल्यास आपल्याला आनंद होतो व त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याला हुरूप येतो. एखाद्याची नव्याने ओळख झाल्यास आपण प्रथम त्याचे नाव व गाव विचारतो. त्यानंतरचा स्वाभाविक प्रश्न असतो, ‘’आपण काय करता?’’ त्यातून आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या नोकरी अथवा व्यवसायासंबंधी जाणून घ्यायचे असते. माझा अनुभव असा आहे की वरील प्रश्नाचे उत्तर हे बहुतांश वेळा सरळ मराठीतून मिळत नाही.

"विश्वनाट्य सूत्रधार"

Submitted by अमेय२८०८०७ on 12 January, 2017 - 13:31

एका मित्राच्या फेसबुकवरील थंडी व नाट्यगीतांच्या पोस्टमुळे काही रम्य स्मृती जागृत झाल्या.

बाबांना नाट्यगीतांचे फार वेड. त्यांच्यामुळे टू इन वन वर वसंतराव, अभिषेकीबुवा, प्रभाकर कारेकर, प्रसाद सावकार, अजित कडकडे इत्यादी मंडळी नेहमी आ वासून कार्यमग्न असायची. कुचभल्ली वक्षाला...वगैरेचा तंतोतंत अर्थ उमगला नाही तरी हे काहीतरी चावटपणाकडे झुकणारे प्रकरण आहे इतपत समज आली होतीच.

स्फुट ४२ - बांग्ला स्ट्रीट

Submitted by बेफ़िकीर on 12 January, 2017 - 10:50

फुकेतच्या बांग्ला स्ट्रीटवर
टेर्‍या उडवत चालतात पोरी
सव्वा कपड्यामधल्या

एकीकडे
एका व्हर्टिकली उभ्या चिकटवलेल्या कारखाली
फोटो काढून घेणारे दांपत्य
'आम्ही कार बोटावर धरू शकतो' दाखवणारे

एकीकडे
टॅटू काढुन घेत असते
एक स्थानिक मुलगी
तिच्या वक्षावर

एकीकडे
बारमध्ये
खिन्न नजरेने बसलेली
युरोपिअन माणसे
ज्यांच्या आयुष्यात काहीही मजा नसते
म्हणून
ते
आयुष्यात मजा असते
हे स्वतःला शिकवायला
फुकेतच्या बारमध्ये बसून बीअर घेतात

एकीकडे
अल कझार शो मधून
कधी कोण जाणे
सुटका झालेले
'स्त्रीमय'पुरुष
स्वतःच्या मर्यादा जाणून
आणि शरीर डचमळवून दाखवत
वाट पाहतात

आंटी मत कहो नाऽऽ

Submitted by सई केसकर on 11 January, 2017 - 07:25

परवाचीच गोष्ट. मुलाला आजी आजोबा घेऊन गेल्याचा फायदा घेऊन मी दिवा उजेडी खाली पाळायला गेले. व्यायाम हा हक्काचा मी टाइम मला अगदी काल परवापर्यंत मिळायचा. पण अमीर खाननी घोळ घातला. दंगल बघून आल्यापासून नवऱ्याला महावीरसिंग फोगट बनण्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली. त्यामुळे आम्हाला पहाटे आणि रात्री असे व्यायामाचे स्लॉट वाटून घ्यावे लागतात. नवऱ्यानी व्यायाम केलाच पाहिजे या भूमिकेतून, मला काय फरक पडतो? त्याचं हृदय; आणि आता, 'नाही केला तर उत्तम, मला जास्त करता येईल' इथवर मला माझ्या परिस्थितीने आणून ठेवलंय. त्यामुळे मधेच हा रणवीर पेशवा किंवा दंगल खान येऊन माझी स्थिरावलेली मानसिक बैठक बिघडवून जातात.

माझा प्रवास ....... मनाचा

Submitted by आनन्दिनी on 11 January, 2017 - 04:56

माझ्या मनाच्या प्रवासाची ही गोष्ट. खूप पूर्वीपासून मी अनिरुद्ध बापूंना ओळखत असले तरी मधल्या काळात मी त्यांना विसरून गेले होते. ताई ने बळे बळे मला तिथे पुन्हा नेलं आणि जणू विसरलेली ओळख नव्याने झाली.....

फोटो

Submitted by आनन्दिनी on 9 January, 2017 - 19:52

सकाळीच  फोन वाजला . "परवाच्या पार्टीचे फोटो पाहिलेस का ?" भारतातून ताईने मोठ्या उत्सुकतेने विचारलं . "हो, काल रात्री निवांतपणे वाचत होते"
"अमेरिकेत फोटो वाचतात वाटतं?" ताईने हसून म्हटलं.
"नाही ग ताई, बहुतेक लोक फोटो नुसते पाहतात. पण साड्यांचे रंग, कपड्यांचे ब्रॅण्ड यापेक्षा अधिक लक्ष लोकांच्या बॉडी लँग्वेज कडे दिलं ना की फोटो वाचता येतात.

बघ ना लोकं हनीमूनचे फोटो फेसबुकवर टाकतात. नुकतंच लायसन्स मिळाल्यावर बेफाम गाडी चालवणाऱ्या तरुणाईसारखं , धबधब्यासारखं उसळणारं प्रेम त्या फोटोंमध्ये सुद्धा वाहत असतं.

शब्दखुणा: 

स्फुट ४१ - शेगांवचे महाराज

Submitted by बेफ़िकीर on 9 January, 2017 - 09:08

महाराज,

काल तुमचे मुखदर्शन करताना
जिवंत होत्या
माझ्यातील वासना, अपेक्षा, स्वार्थ

महाराज,

तुमच्या मुखदर्शनाला रांग
प्रत्यक्ष दर्शनाला झुंबड
आतमध्ये कुठेतरी तुम्ही
गुदमरलेले
भीतीने थिजलेले

महाराज,
त्या अद्ययावत सुविधा
कंप्यूटराईझ्ड पावत्या
सीसी टीव्ही
गणवेषातील कर्मचारी
ती शिस्त, भक्तीतून आलेली
सगळेच गजब

महाराज,
तो विठ्ठलनामाचा गजर
ते पारायण करणारे
२१ अध्याय पाठ असणारे
घोडा, गाय, ऊस, विहीर, मधमाश्या
सगळी प्रतीके मुखोद्गत असणारे

महाराज,
ते सेल्फि काढणारे
ते तोकड्या कपड्यात आलेले
ते हजारोंच्या पावत्या फाडणारे
कार्ड स्वाईप करणारे

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन