स्फुट ४२ - बांग्ला स्ट्रीट

Submitted by बेफ़िकीर on 12 January, 2017 - 10:50

फुकेतच्या बांग्ला स्ट्रीटवर
टेर्‍या उडवत चालतात पोरी
सव्वा कपड्यामधल्या

एकीकडे
एका व्हर्टिकली उभ्या चिकटवलेल्या कारखाली
फोटो काढून घेणारे दांपत्य
'आम्ही कार बोटावर धरू शकतो' दाखवणारे

एकीकडे
टॅटू काढुन घेत असते
एक स्थानिक मुलगी
तिच्या वक्षावर

एकीकडे
बारमध्ये
खिन्न नजरेने बसलेली
युरोपिअन माणसे
ज्यांच्या आयुष्यात काहीही मजा नसते
म्हणून
ते
आयुष्यात मजा असते
हे स्वतःला शिकवायला
फुकेतच्या बारमध्ये बसून बीअर घेतात

एकीकडे
अल कझार शो मधून
कधी कोण जाणे
सुटका झालेले
'स्त्रीमय'पुरुष
स्वतःच्या मर्यादा जाणून
आणि शरीर डचमळवून दाखवत
वाट पाहतात
एका पुरुषमय स्त्रीची

एक अमेरिकन जातो
हातात हात धरून
एका थाई कुमारिकेचा
भर रस्त्यात तिलला विचारतो
"सो यू आर व्हर्जिन"
आणि ती!!!!
मान डोलावते जणू भाग्यवान असल्यासारखी

भारतीय बायका
बघत असतात
विकायला ठेवलेल्या वस्तू
'स्त्री'वाचूनच्या

दोन कपड्यातल्या युवती
गराडा घालतात
एका बुभुक्षिताला
जो त्यांची शिकार होतो

असंख्य बीअर बार्स
असंख्य सेक्स शोज
असंख्य अत्तरे
असंख्य आव्हाने
असंख्य छेडछाडी, उलट्या दिशेच्या

आणि काही दरवाजे
ज्यावरच्या काचेत बसलेली असते
एक अर्धनग्न युवती
ज्या दरवाज्याच्या पाटीवर
रेंगाळतात सहस्त्रावधी आकर्षक किरणे
एकाचवेळी

त्या दरवाज्यांवर पाट्या असतात
इतक्यात इतके
तितक्यात तितके
आणि
इन्डिअन्स नॉट अलाऊड
===================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"इन्डिअन्स नॉट अलाऊड" अश्या पाट्या नाहीत कुठेही.
पण इंडियन येत असेल तर त्याची "ओन्ली फॉर मेम्बर्स" असं सांगून बोळवण केली जाते. अर्थात निवडक बारमधेच.